शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

Ukraine Russia War : युक्रेनला शस्त्रास्त्रे दिल्याने भडकला रशिया; युरोपला दिली धमकी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2022 21:49 IST

Ukraine Russia War : युक्रेनला शस्त्रास्त्रे पोहोचवणे युरोपच्या सुरक्षेसाठी धोकादायक ठरेल, असे रशियाने गुरुवारी म्हटले आहे.

रशिया आणि युक्रेनमधील युद्धाला (Russia Ukraine War) 64 दिवस पूर्ण झाले आहेत. तरीही युक्रेनवरील संकटाचे (Ukraine Crisis) ढग कमी होण्याचे नाव घेत नाही. रशियाच्या हल्ल्याने युक्रेनमधील अनेक शहरे उध्वस्त झाली आहेत, तर अनेक शहरे ढिगाऱ्याखाली आहेत. कोणताही देश माघार घ्यायला तयार नाही. दरम्यान, युक्रेनला शस्त्रास्त्रे पोहोचवणे युरोपच्या सुरक्षेसाठी धोकादायक ठरेल, असे रशियाने गुरुवारी म्हटले आहे.

क्रेमलिन प्रवक्ते दिमित्री पेस्कोव्ह यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, इतर देशांकडून युक्रेनला अवजड शस्त्रास्त्रांचा पुरवठा करणे ही एक अशी प्रवृत्ती आहे, ज्यामुळे भविष्यात युरोपची सुरक्षा धोक्यात येऊ शकते. युद्धादरम्यान युक्रेनला शस्त्रे पोहोचवणे युरोपच्या सुरक्षेत अस्थिरता निर्माण करते. दरम्यान, दिमित्री पेस्कोव्ह यांनी बुधवारी ब्रिटनचे परराष्ट्र सचिव लिझ ट्रस यांनी केलेल्या टिप्पणीवर प्रतिक्रिया देताना ही माहिती दिली. युक्रेनला अवजड शस्त्रांचा पुरवठा सुरू राहिल्यास युरोपच्या सुरक्षेला धोका निर्माण होऊ शकतो, असे ते म्हणाले.

विशेष म्हणजे, रशियाच्या हल्ल्यानंतर युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लाडोमिर झेलेन्स्की हे रशियन सैनिकांवर कारवाई करण्यासाठी जगभरातील सर्व शक्तिशाली देशांकडून शस्त्रांची मागणी करत आहेत. परंतु युक्रेनला मदत करणारे सर्व देश अशी परिस्थिती टाळू इच्छितात, ज्यामुळे नाटो आणि मास्को यांच्यात थेट संघर्ष होऊ शकेल.

रशियाकडून कारवाईचा इशाराक्रेमलिनच्या प्रवक्त्यापूर्वी बुधवारी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनीही इशारा दिला की, युक्रेन आणि रशियन युद्धात हस्तक्षेप करतील किंवा हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न करतील, अशा देशांविरुद्ध तत्काळ कारवाई करण्याचे सर्व मार्ग रशियाकडे आहेत. यासोबतच अमेरिकेने युक्रेनला शस्त्रे पाठवू नयेत असेही रशियाने सांगितले आहे.

टॅग्स :Russia Ukrainयुक्रेन आणि रशियाrussiaरशिया