शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

भूतानच्या सीमेचे आम्ही उल्लंघन केले नाही, चीनचा दावा

By admin | Updated: June 29, 2017 23:12 IST

भूतानच्या सीमेचे आम्ही उल्लंघन केलेले नाही, असे चीनने गुरुवारी म्हटले.

ऑनलाइन लोकमतबीजिंग, दि. 29 - भूतानच्या सीमेचे आम्ही उल्लंघन केलेले नाही, असे चीनने गुरुवारी म्हटले. चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीने (पीएलए) आमच्या सीमेचे उल्लंघन केल्याचा आरोप भूतानने केला होता. आमचे सैन्य ‘चीनच्या भूभागातच’ तैनात असून भारताने ‘स्वत:च्या चुका’ दुरुस्त करून घ्याव्यात, असे चीनच्या संरक्षण मंत्रालयाच्या प्रवक्त्याने म्हटले. चीनच्या सैनिकांनी भुतानच्या भूभागात प्रवेश केल्याचे तुमचे म्हणणे मला दुरुस्त करायचे आहे. चीनचे सैनिक चीनच्याच भूभागात तैनात आहेत, असे हा प्रवक्ता प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाला. भारताच्या सैनिकांनी सिक्कीम सेक्टरमधील डोंगलोंग भागातील चीनच्या बाजूकडून प्रवेश केल्याचा आरोपही त्याने केला. भारतीय जवानांनी नित्याची कामे थांबवण्याचा प्रयत्न केला. चीनने स्वायत्तता सुरक्षित राखणे आणि भूभागाची एकात्मता जपण्यासाठी या कामांना योग्य तो प्रतिसाद दिला, असेही त्याने म्हटले. भारताने केलेल्या चुकीच्या गोष्टी दुरुस्त करून घ्याव्यात आणि चीनच्या भूभागातून सगळ्या सैनिकांना काढून घ्यावे, असे आम्ही स्पष्ट केले आहे, असे प्रवक्ता म्हणाला. भूतानने त्याच्या डोंगलांगमधील झोंपलरी भागात असलेल्या लष्करी छावणीकडे चीन बांधत असलेल्या रस्त्याला बुधवारी आक्षेप घेत बांधकाम थांबवून तत्काळ पूर्वीसारखी परिस्थिती निर्माण करण्यास सांगितले होते. भूतानने हा आक्षेप येथील दूतावासामार्फत घेतला होता. डोंगलांग भागातील झोंपलरी येथील भूतानच्या लष्करी छावणीकडे जाणाऱ्या रस्त्याचे काम चीनच्या लष्कराने नुकतेच सुरू केले व त्यामुळे दोन देशांतील (चीन व भूतान) कराराचे उल्लंघन होते, असे भूतानचे भारतातील राजदूत वेटसोप नामग्याल यांनी नवी दिल्लीत म्हटले होते. डोंगलांग हा चुम्बी खोऱ्यानजीक तीन सीमा एकत्र येणारा भाग असून तो चीनच्या नियंत्रणात आहे. भूतानने त्या भागावर हक्क सांगितलेला आहे.