अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ग्रीनलँड हा भाग आपल्या अखत्यारित आणण्याचा इरादा जाहीर केल्यापासून या बर्फाच्छादित प्रदेशातील वातावरण चांगलंच तापलेलं आहे. सध्या ग्रीनलँडमध्ये हाडे गोठवणारी थंडी पडलेली असताना डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात हजारो लोक रस्त्यावर उतरले आहेत. ग्रीनलँडमध्ये होत असलेलं अशा प्रकारचं हे आतापर्यंत पहिलंच मोठं आंदोलन असल्याचेही सांगितले जात आहे.
रस्त्यावर उतरलेले ग्रीनलँडचे नागरिक डोनाल्ड ट्रम्प यांच्या ग्रीनलँडला आपल्या नियंत्रणाखाली आणण्याच्या प्रयत्नांना विरोध करत आहेत. बऱ्यापैकी निर्मनुष्य आणि विरळ लोकसंख्येचा प्रदेश असलेल्या ग्रीनलँडमधून नेहमी वातावरणातील बदल, हिमनगाचं वितळणं अशा पर्यावरणाशी संबंधित बातम्या येत असत. मात्र ग्रीनलँडवर कब्जा मिळवण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांनी या भागावर नियंत्रण असलेल्या डेन्मार्कसह युरोपियन युनियनवर दबाव आणण्यास सुरुवात केल्यापासून डोनाल्ड ट्रम्प आणि अमेरिकेच्या विरोधात आवाज उठू लागला आहे. तसेच रस्त्यावर उतरलेले आंदोलक ग्रीनलँड हे ना विकलं जाणार, ना अमेरिकेचा भाग बनणार, असे ठणकावून सांगत आहेत.
दरम्यान, ग्रीनलँडची राजधानी असलेल्या नूक येथे अमेरिकेच्या धोरणाचा विरोध करण्यासाठी हजारो लोक रस्त्यावर उतरले होते. त्यांच्या हातात राष्ट्रीय ध्वज आणि फलक होते. ग्रीनलँड विक्रीसाठी नाही आहे, अशा आशयाच्या घोषणा या फलकांवर होत्या. घोषणाबाजी करत हे आंदोलक अमेरिकेच्या वाणिज्य दूतावासापर्यंत धडकले. त्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव अमेरिकेच्या दुतावासाच्या परिसरात पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला होता. आता अमेरिकेच्या राजधानीप्रमाणेच अशी आंदोलने ग्रीनलँडमधील इतर भागांमध्येही होत असल्याचे सांगण्यात येत आहे.
Web Summary : Greenlanders protest Trump's attempts to control their territory, supported by Denmark. Thousands rallied in Nuuk, rejecting American influence and declaring Greenland is not for sale. Demonstrations spread, opposing US policy and asserting Greenland's independence.
Web Summary : ग्रीनलैंडवासियों ने ट्रम्प के नियंत्रण के प्रयासों का विरोध किया, डेनमार्क का समर्थन मिला। नूक में हजारों लोगों ने रैली निकाली, अमेरिकी प्रभाव को खारिज किया और घोषणा की कि ग्रीनलैंड बिक्री के लिए नहीं है। प्रदर्शन फैले, अमेरिकी नीति का विरोध किया।