Syria President Al-Sharaa warning Israel : सीरियाची राजधानी दमास्कसला इस्रायल सातत्याने लक्ष्य करत आहे. बुधवारी संध्याकाळी इस्रायलने दमास्कसवर हल्ला केला. या इस्रायली हल्ल्यामुळे सिरियातील ड्रुझ समुदायातील तणाव वाढला. त्यामुळे इस्रायलच्या हल्ल्यादरम्यान, सीरियाचे अध्यक्ष अहमद अल-शरा यांनी निवेदन जारी केले आणि इस्रायलला स्पष्ट शब्दात ठणकावले की, आम्ही युद्धाला घाबरत नाही, आम्ही आमचे संपूर्ण आयुष्य आव्हानांशी लढण्यात घालवले आहे.
अल-शरा यांच्या पहिल्या सार्वजनिक निवेदनात, त्यांनी इस्रायलवर सीरियामध्ये जातीय फूट पाडण्याचा आरोप केला आणि इशारा दिला की एका आघाडीवर विजय मिळणे म्हणजे सर्वत्र विजय निश्चित असे होत नाही. त्यांनी स्पष्ट केले की, सीरिया कोणताही बाह्य हस्तक्षेप स्वीकारणार नाही. विशेषतः ड्रुझच्या बाबतीत काहीही ऐकणार नाही.
VIDEO: घाबरलेली अँकर Live शो सोडून पळाली... स्फोटांनी हादरलं सिरिया; हल्ल्याने दाणादाण
ड्रुझ समुदाय देशाचा आत्मा: अल-शरा
अल-शराने म्हटले आहे की, ड्रुझ समुदाय हा आपल्या देशाचा आत्मा आहे. त्यांच्या हक्कांचे रक्षण करणे आपले कर्तव्य आहे. सरकारवरील वाढत्या हल्ल्यांमध्ये आणि अंतर्गत संघर्षांमध्ये, त्यांनी संघर्षापेक्षा संवादाला अधिक महत्त्व देणे गरजेचे आहे. अमेरिका, अरब आणि तुर्कीच्या मध्यस्थीमुळे परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाण्यापासून रोखली गेली आहे. बाहेरील हस्तक्षेप होऊ देणार नाही. आम्ही युद्धाला घाबरत नाही, परंतु सीरियाला विनाशाच्या आगीत जाऊ देणार नाही.
भयानक!! इस्रायलचा सीरियाच्या संरक्षण मंत्रालयावर मोठा हल्ला; संपूर्ण इमारतीच्या चिंधड्या (VIDEO)
इस्रायल IDF चा दावा काय?
इस्रायली संरक्षण दलांनी (IDF) दावा केला आहे की, त्यांनी सीरियाच्या स्वेदा प्रदेशात सीरियन सरकारी दलांवर हल्ले सुरू ठेवले आहेत. एका निवेदनात, आयडीएफने या हल्ल्यांचा एक नवीन व्हिडिओ देखील जारी केला आहे, ज्यामध्ये लष्करी तळ आणि वाहनांना लक्ष्य केले जात असल्याचे दिसून येते. सूत्रांच्या माहितीनुसार, या ताज्या हल्ल्यांमध्ये इस्रायली हवाई दलाने जड मशीन गनने सुसज्ज बख्तरबंद वाहने आणि पिकअप ट्रकला लक्ष्य केले.
स्वेदा हे शहर बहुसंख्य ड्रुझ समुदायाचा गड मानले जाते आणि सध्या तेथेच गंभीर संघर्ष सुरू आहेत. IDF ने म्हटले आहे की, दक्षिण सीरियामध्ये केवळ लष्करी वाहनेच नव्हे तर सीरियन सैन्याच्या चौक्या, शस्त्रास्त्रे डेपो आणि इतर मोक्याच्या ठिकाणांनाही लक्ष्य करण्यात आले आहे. हे हल्ले अशा वेळी होत आहेत.