बगदाद : इसिस किंवा इस्लामिक स्टेट या दहशतवादी संघटनेने इराक व सिरियाचा मोठा भाग गिळंकृत करून तिथे इस्लामी राजवट स्थापन केली. जगभरातील मुस्लिम लोकांना तिथे येण्याचे निमंत्रण दिले. या निमंत्रणावरून हजारो युवक जिहादी कारवायांसाठी तिथे थडकत असले तरीही या साम्राज्यात पिण्याच्या पाण्याचीही वानवा आहे. नागरी सेवा विस्कळीत झाल्या असून, कोसळण्याच्या बेतात आहेत, किमती भरमसाट वाढत असून, औषधे तर मिळणेही कठीण आहे. या साम्राज्यात नागरिकांचे राहणीमान घसरत आहे. इसिस ही जगातील सर्वात श्रीमंत संघटना आहे; पण इसिसचे सर्व स्रोत लढण्यासाठी वापरले जात आहेत. इसिसच्या ताब्यात असणाऱ्या मोसूल शहरातील क्लोरिनचा साठा संपला आहे. त्यामुळे पिण्याचे स्वच्छ पाणी मिळणे दुरापास्त आहे. गव्हाचे पीठ दुर्मिळ झाले असून, त्यामुळे ब्रेड मिळणे कठीण झाले आहे.
इसिसच्या साम्राज्यात पाण्याची वानवा
By admin | Updated: December 29, 2014 04:05 IST