शहरं
Join us  
Trending Stories
1
या सुंदर प्रदेशावर हिंसाचाराची सावली पडलेली; पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरमध्ये, म्हणाले...
2
Aishanya Dwivedi : Video - "BCCI पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर विसरलं; आपण पाकिस्तानला ही संधी का देतोय?"
3
'या' देशाने मंत्रिमंडळात आणला AI मंत्री ! राजकारणाच्या इतिहासात पहिल्यांदाच असा प्रयोग
4
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
5
वर्गमित्रांचा प्रताप! झोपेत असताना डोळ्यात टाकलं फेविक्विक; ८ विद्यार्थ्यांचे चिकटले डोळे अन्...
6
पत्नीला ५ गोळ्या घातल्या, क्राइम सीनवरून फेसबुक लाईव्ह केलं; पती म्हणाला, "हिचे बॉयफ्रेंड पळून गेले..." 
7
शुबमन गिलच्या फोटोपेक्षा हातातल्या घड्याळ्याची रंगली चर्चा, किंमत ऐकाल तर अवाक् व्हाल...
8
क्रूरतेचा कळस! मिठाई ताजी नाही हे ऐकताच दुकानदार संतापला; १० वर्षांच्या मुलाला बेदम मारहाण
9
पितृपक्ष २०२५: पितृपक्षात जन्मलेल्या बाळांचे भविष्य कसे असते? शुभ की? ज्योतिष शास्त्राने केला उलगडा!
10
४०००० कोटींचे उत्पन्न, ७० लाख नोकऱ्या; नितीन गडकरींनी दिला कमाईचा नवा मंत्र, कुणाला फायदा?
11
उमेश सहकलाकार नसता तर मी हा सिनेमा केला नसता, प्रिया बापटने सांगितलं कारण
12
२, ३, ४BHK घर बांधायचेय? जीएसटीचा किती फायदा होणार? सिमेंट, सळ्या, टाईल्स कितीने स्वस्त झाल्या
13
गर्लफ्रेंडने ब्लॉक केलं, प्रेमभंग जीवावर बेतला, तरुणाने उचलले टोकाचे पाऊल; उपचारादरम्यान मृत्यू
14
१०% नं घसरलाय हा शेअर, पण अजूनही IPO च्या किंमतीपेक्षा ६०% नं अधिक; काय म्हणाले एक्सपर्ट?
15
सचिन तेंडुलकरच्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग, केनियामध्ये जंगल भागात अडकला...
16
एक काळ होता..., स्मार्टफोन पाण्यासारखे विकले जात होते...; शाओमीचा सेल कमालीचा घसरला
17
ऑपरेशन मध्यातच सोडून पाकिस्तानी डॉक्टर झाला गायब! नर्सने दुसऱ्या रूमचा दरवाजा उघडताच दिसला धक्कादायक प्रकार
18
अंकिता लोखंडेचा नवरा रुग्णालयात दाखल; हाताला ४५ टाके अन्... मित्राने शेअर केली पोस्ट
19
प्रेम कहाणीचा दुर्दैवी अंत! ६ महिन्यापूर्वी प्रियकरासोबत लग्न केलेल्या युवतीने उचललं टोकाचं पाऊल
20
'दोन्ही पायही तुटले असते...', करिश्मा शर्माने धावत्या ट्रेनमधून मारलेली उडी, आता तिने सांगितलं नेमकं काय घडलं?

नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा खरंच रद्द झाली का? काय आहे या दाव्याचं सत्य? जाणून घ्या...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2025 12:51 IST

१६ जुलै रोजी निमिषाला फाशी होणार होती. मात्र, भारताचे ग्रँड मुफ्ती आणि सुन्नी नेते कंथापुरम एपी अबू बकर मुसलियार यांच्या हस्तक्षेपामुळे फाशी स्थगित करण्यात आली होती.

यमनच्या तुरुंगात बंद असलेल्या भारतीय नर्स निमिषा प्रियाला तेथील न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली होती. न्यायालयाने दिलेल्या या निर्णयानंतर १६ जुलै रोजी निमिषाला फाशी होणार होती. मात्र, भारताचे ग्रँड मुफ्ती आणि सुन्नी नेते कंथापुरम एपी अबू बकर मुसलियार यांच्या हस्तक्षेपामुळे फाशी स्थगित करण्यात आली होती. त्यानंतर, मंगळवारी काही वृत्तांमध्ये दावा करण्यात आला की, यमनमध्ये निमिषाची फाशीची शिक्षा रद्द करण्यात आली आहे. पण, या संदर्भात भारत सरकारने अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही.

निमिषाची शिक्षा रद्द झाल्याच्या वृत्तांमुळे अद्यापही गोंधळ कायम आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, यमनच्या अधिकाऱ्यांनी निमिषाची शिक्षा रद्द केलेली नाही. जे दावे केले जात आहेत, ते सर्व खोटे आहेत. भारत आणि यमन सरकारच्या वतीने या संदर्भात अद्याप कोणतेही अधिकृत निवेदन आलेले नाही. त्यामुळे, निमिषा प्रिया प्रकरणात पुढे काय होणार, हे स्पष्ट नाही.

शिक्षा रद्द झाल्याचा दावा कोणी केला?

भारताचे ग्रँड मुफ्ती आणि सुन्नी नेते कंथापुरम एपी अबूबकर मुसलियार यांनी निमिषाची फाशीची शिक्षा स्थगित करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्यांनी यमनमधील धर्मगुरूंशी चर्चा केली, त्यानंतर मृत्यूची शिक्षा काही दिवसांसाठी पुढे ढकलण्यात आली होती. याच ग्रँड मुफ्तींच्या कार्यालयाने दावा केला होता की, यमनने निमिषाची फाशीची शिक्षा रद्द केली आहे. यासंदर्भात सना येथे उच्चस्तरीय बैठक घेण्यात आली होती, त्यानंतरच हा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी म्हटले होते.

सरकारकडून अद्याप कोणतेही विधान नाही!

या प्रकरणी भारत सरकारही दीर्घकाळापासून प्रयत्न करत आहे. मात्र, शिक्षा रद्द झाल्याच्या दाव्यांवर सरकारकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. त्यामुळे, निमिषाची फाशीची शिक्षा अद्याप रद्द झालेली नाही, हे स्पष्ट आहे. आता सरकार या अफवांवर कधी आपले निवेदन जारी करते, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

प्रकरण नेमकं काय आहे?

केरळच्या पलक्कड जिल्ह्यातील रहिवासी असलेली निमिषा प्रिया २००८ मध्ये एक नर्स म्हणून यमनला गेली होती. तिथे पोहोचल्यावर निमिषाने अनेक रुग्णालयांमध्ये काम केले. २०१५ मध्ये निमिषाने यमनमध्ये राहणाऱ्या तलाल अब्दो महदी यांच्यासोबत एक मेडिकल क्लिनिक सुरू केले. दोन वर्षांपर्यंत दोघांमध्ये सर्व काही ठीक चालले होते. त्यानंतर मात्र त्यांच्या संबंधांमध्ये बिघाड सुरू झाला.

२०१७मध्ये निमिषाचा पार्टनर महदीचा मृतदेह एका पाण्याच्या टाकीत सापडला होता. निमिषाने त्याला झोपेच्या औषधांचा जास्त डोस दिल्याचा आरोप आहे. हत्येनंतर एका महिन्याने निमिषा प्रियाला यमन-सौदी अरब सीमेवरून अटक करण्यात आली. २०२० मध्ये सना येथील न्यायालयाने निमिषाला मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली. २०२३मध्ये यमनच्या सर्वोच्च न्यायालयानेही ही शिक्षा कायम ठेवली. सध्या निमिषा प्रिया सना तुरुंगात बंद आहे.

टॅग्स :KeralaकेरळInternationalआंतरराष्ट्रीय