शहरं
Join us  
Trending Stories
1
निशिकांत दुबेंना घेराव घातल्यानं राज ठाकरेंकडून वर्षा गायकवाड यांचे कौतुक, म्हणाले...
2
महापालिका निवडणुकीत आघाडी असणार की नाही, त्वरीत सांगा! पुण्यातून शरद पवार गटाची जाहीर मागणी
3
"महाराष्ट्राकडे 'बुद्धी आणि बळ' दोन्ही ओतप्रोत, ते जेव्हा..."; राज ठाकरेंकडून दिव्या देशमुखचं कौतुक
4
Pune Crime: 'छातीत दुखतंय', इंजिनिअर तरुण मीटिंग रुममधून उठला अन् सातव्या मजल्यावरून मारली उडी
5
चिनी मालाने दिला दगा, पहलगाम हल्ल्यानंतर तब्बल ९६ दिवस लपलेले दहशतवादी असे सापडले
6
Nitin Shete: नितीन शेटे यांच्या मृत्यूचे कारण वेगळेच? पोलीस अधीक्षकांनी केला महत्त्वाचा खुलासा
7
'अर्थव्यवस्था बंद करावी का?' रशियाकडून स्वस्त तेल खरेदी करण्याच्या वादाला भारताचे प्रत्युत्तर, आरसा दाखवला
8
Divya Deshmukh: बुद्धिबळाच्या पटावर नव्या 'क्वीन'चं राज्य! 'महाराष्ट्राची लेक' दिव्या देशमुख 'वर्ल्ड चॅम्पियन'; कोनेरु हम्पी उपविजेती
9
"ऑपरेशनला सिंदूर नाव देणं म्हणजे भावनांशी खेळ, एकाही देशाने साथ दिली नाही’’, अरविंद सावंत यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
10
'लाडकी बहीण योजनेला सुद्धा भ्रष्टाचारातून सुट्टी नाही'; रोहित पवारांचा अजित पवारांवर पलटवार, आदिती तटकरेंच्या खात्याचं प्रकरण काढलं
11
'शत्रूची किती विमानं पाडली, हे त्यांनी कधीच विचारलं नाही'; राजनाथ सिंह यांचा लोकसभेत राहुल गांधींवर निशाणा
12
थायलंड आणि कंबोडियामध्ये अखेर युद्धविराम! संघर्ष थांबला, या देशाची मध्यस्थी ठरली निर्णायक
13
टाटा ते HDFC बँक.. बाजाराच्या घसरणीतही 'हे' ५ स्टॉक करणार बंपर कमाई! एक्सपर्टने दिले टार्गेट प्राईज
14
बापरे! भारतात दहा रुपयांना मिळणारे पाणी 'या' देशात १ हजार रुपयांना मिळते; कारण काय?
15
कुठे फेडशील हे पाप? मैत्रिणीसोबत फिरायला गेल्याचा जाब विचारला म्हणून पत्नीला पेटवून दिले!
16
कश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांविरोधात 'ऑपरेशन महादेव'चे तांडव! कसे ठरते ऑपरेशनचे नाव?
17
अवघ्या १९व्या वर्षी 'वर्ल्ड चॅम्पियन', विजयानंतर दिव्या देशमुखची आईला घट्ट मिठी, आनंदाश्रू अनावर (Video)
18
भारताला नकोय चीनचा पैसा; दरवाजे बंदच ठेवण्याचे संकेत, ड्रॅगनसाठी काय संदेश?
19
"आज आम्ही सत्तेत आहोत, पण कायमच सत्तेत राहू असे नाही"; सरंक्षण मंत्री राजनाथ सिंह संसदेत काय म्हणाले?
20
Nag Panchami 2025 Upvas: भावाच्या रक्षणासाठी करतात नागपंचमीचा उपास; पूजेच्या वेळी टाळा 'ही' एक चूक!

युद्धाची चाहुल ! उत्तर कोरियात 47 लाख लोकांना व्हायचंय सैन्यात भरती

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2017 18:33 IST

कोरियन द्विपकल्पात गेल्या काही दिवसांपासून युद्धाचं वादळ घोंगावतं आहे. अमेरिका आणि उत्तर कोरियामधला तणाव जागतिक स्तरावरचं मोठं संकट बनत चाललंय. अमेरिकेच्या दबावाला न जुमानता वारंवार अण्वस्त्र चाचणी करणारा उत्तर कोरिया हा देश जागतिक समुदायाच्याही निशाण्यावर आहे.

प्योंगयांग, दि. 28 - कोरियन द्विपकल्पात गेल्या काही दिवसांपासून युद्धाचं वादळ घोंगावतं आहे. अमेरिका आणि उत्तर कोरियामधला तणाव जागतिक स्तरावरचं मोठं संकट बनत चाललंय. अमेरिकेच्या दबावाला न जुमानता वारंवार अण्वस्त्र चाचणी करणारा उत्तर कोरिया हा देश जागतिक समुदायाच्याही निशाण्यावर आहे.अमेरिका आणि उत्तर कोरियामधील शाब्दिक चकमकीमुळे युद्धाचे ढग दाटू लागले आहेत. त्यातच आता उत्तर कोरियात 47 लाख लोक सैन्यात स्वेच्छेनं सहभागी होण्यास तयार झाले आहेत. एकाच वेळी एवढ्या लोकांनी सैन्यात भरती होण्याची इच्छा व्यक्त केल्यानं उत्तर कोरिया युद्धाची तयारी तर करत नाही ना, अशी साशंकता व्यक्त केली जातेय. किम जोन ऊन यांच्या सरकारमधील बातम्या फक्त राज्यातील नियंत्रित मीडियातूनच बाहेर येतात. उत्तर कोरियाच्या सरकारची वृत्तसंस्थेनं स्वेच्छेनं लोक सैन्यात भरती होण्यास तयार असल्याची माहिती दिली आहे. रोडोंग सिनमन दैनिकाच्या रिपोर्टनुसार, विद्यार्थी आणि कामगारांसह 12.2 लाख महिलांचाही सहभाग आहे. उत्तर कोरियाच्या नागरिकांना गेल्या 6 दिवसांपूर्वी कोरियन पीपल्स आर्मीत सहभागी होण्याचं आवाहन करण्यात आलं होतं.काही दिवसांपूर्वी चीननंही अमेरिका आणि उत्तर कोरियाच्या वादात उडी घेतली होती.जर कोरियन द्विपकल्पात युद्ध झालं, तर कोणीही जिंकणार नाही, असं विधान चीननं केलं होतं. विशेष म्हणजे उत्तर कोरियाचे परराष्ट्र मंत्री यांच्या इशा-यानंतर चीननं विधान केलं होतं. त्यामुळे चीनच्या भूमिकेला महत्त्व प्राप्त झालं आहे. उत्तर कोरियाचे परराष्ट्र मंत्री म्हणाले होते, ट्रम्प यांच्या विधानवरून त्यांनी युद्धाची घोषणा केली असून, उत्तर कोरिया या युद्धाला सामोरं जाण्यासाठी तयार आहे. त्यानंतर चीननंही या वादात युद्ध झाल्यास कोणीही जिंकणार नाही, असं स्पष्ट केलं होतं. अमेरिका व उत्तर कोरियाचे राजकर्त्यांना कदाचित हे माहिती असेल की, सैन्याच्या माध्यमातून युद्ध करणं ही व्यवहार्य पद्धत नाही, असं चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त लू कांग म्हणाले होते.उत्तर कोरियाच्या विदेश मंत्र्यांच्या विधानानंतर व्हाइट हाऊसचे प्रेस सचिव साराह सेंडर्स यांनीही नवं प्रसिद्धीपत्रक जारी केलं होतं. या पत्रकात अमेरिकेनं कोणत्याही पद्धतीच्या युद्धाची घोषणा केली नाही, उत्तर कोरियाचे आरोप बिनबुडाचे आणि निराधार असल्याचंही या प्रसिद्धीपत्रकात म्हटलं होतं. हुकूमशहा किम जोंग-उनच्या कारवायांमुळे उत्तर कोरिया आणि अमेरिकेमध्ये निर्माण झालेला तणाव दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी किम जोंग-उनचा रॉकेट मॅन असा उल्लेख केल्यानंतर खवळलेल्या उत्तर कोरियाने डोनाल्ड ट्रम्प हे आत्महत्या करण्याच्या मोहिमेवर निघाले आहेत, अशी प्रतिक्रिया दिली होती.संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेला संबोधित करताना उत्तर कोरियाचे परराष्ट्रमंत्री रि योंग हो म्हणाले, डोनाल्ड ट्रम्प यांनी किम जोंग उन यांचा उल्लेख रॉकेटमॅन असा केला होता. त्यामुळे अमेरिकेच्या मुख्य भूमीच्या दिशेने रॉकेट सोडणे अनिवार्य झाले होते. दीर्घ आणि कठीण संघर्षानंतर आम्ही अणुऊर्जा निर्मिती करण्याच्या शेवटच्या टप्प्यावर पोहोचलो आहोत. त्यामुळे विरोधकांनी आमच्यावर निर्बंध घातल्याने आमच्या भूमिकेत बदल होईल असे मानणे चुकीचे ठरेल." गेल्या काही दिवसांपूर्वी अमेरिकी वायूसेनेची बी-1बी ही बॉम्बवाहू विमाने उत्तर कोरियाच्या पूर्व किनाऱ्यावरून घिरट्या घालून गेली होती. तसेच संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेला संबोधित करताना ट्रम्प यांनी उत्तर कोरियावर अधिकचे निर्बंध घातले होते. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी उत्तर कोरियाला ‘पूर्णपणे नष्ट’ करण्याचा आणि शस्त्रास्त्रे कार्यक्रमावरून इराणच्या प्राणघातक राजवटीशी संघर्ष करण्याचा अत्यंत कठोर इशारा दिला होता. संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत ट्रम्प यांनी आपल्या पहिल्या कडक भाषा वापरलेल्या भाषणात उत्तर कोरियाला अणू क्षेपणास्त्रांचा कार्यक्रम सुरू न ठेवण्याचा इशारा दिला. उत्तर कोरियाचे नेते किम जोंग-ऊन यांचा उल्लेख ‘रॉकेट मॅन’ असा करून त्याचा देश नष्ट करण्याची धमकी दिली. ‘अमेरिकेकडे प्रचंड शक्ती आणि संयम आहे; परंतु आम्हाला स्वत:चे व किंवा आमच्या मित्रदेशांचे संरक्षण करणे भाग पडले तर उत्तर कोरियाला पूर्णपणे नष्ट करण्याशिवाय आमच्याकडे दुसरा मार्ग नसेल,’ असे ट्रम्प म्हणाले.