शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

गाझा रिकामे करायचेय...! डोनाल्ड ट्रम्प यांचा प्लॅन, गाझाच्या लोकांची कुठे सोय करणार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2025 17:24 IST

गाझात परतत असलेल्या लोकांना पुन्हा गाझाबाहेर करण्याचा विचार ट्रम्प यांनी व्यक्त केला आहे. या लोकांनी शांतता, हिंसामुक्त राहण्यासाठी गाझाबाहेर रहावे, असे मत ट्रम्प यांनी व्यक्त केले आहे. 

ज्या अमेरिकेच्या शस्त्रांच्या जिवावर इस्रायलने गाझा पट्टीची चाळण केली त्या गाझामध्ये आता लोक परतू लागले आहेत. या लोकांकडे पुन्हा घर उभारणीचे पैसे तर नाहीत परंतू, आपल्या घराची हालत पाहण्यासाठी हे लोक धडपडू लागले आहेत. इस्रायल-हमासमध्ये युद्धबंदी झालेली आहे. हे लोक गाझात परतत असताना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे वक्तव्य आले आहे. 

गाझात परतत असलेल्या लोकांना पुन्हा गाझाबाहेर करण्याचा विचार ट्रम्प यांनी व्यक्त केला आहे. या लोकांनी शांतता, हिंसामुक्त राहण्यासाठी गाझाबाहेर रहावे, असे मत ट्रम्प यांनी व्यक्त केले आहे. 

इस्रायलला अमेरिकेतूनच शस्त्रास्त्रे मिळत होती. माजी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन एका मागोमाग एक इस्रायल आणि युक्रेनला करोडो डॉलर्सचे पॅकेज जारी करत होते. यातून अमेरिकेची शस्त्रास्त्रे या दोन्ही देशांना पुरविली जात होती. गाझाच्या या परिस्थितीमागे कुठे ना कुठे अमेरिकेचाही हात आहे. आता अमेरिका या गाझावासियांना त्यांच्या हक्काच्या भागातूनच बाहेर काढण्याची तयारी करत आहे. 

जेव्हा आपण गाझापट्टीकडे पाहतो तेव्हा असे वाटते की ती कित्येक वर्षांपासून नरकासारखी आहे. या जमिनीवर अनेक मानवजाती राहिल्या आहेत. हे काही आताच सुरु झालेला नाही. याची सुरुवात हजारो वर्षांपूर्वी झाली होती  व नेहमी हिंसाचार याच्याशी जोडलेला आहे. आम्ही तुम्हाला अशा ठिकाणी घेऊन जाऊ शकतो जे याच्यापेक्षा आरामदायी आणि सुरक्षित असतील, असे ट्रम्प यांनी म्हटले आहे. या लोकांना जॉर्डन आणि इजिप्तने येऊन घेऊन जावे. आपण त्या पूर्ण जागेला रिकामे करू, असे आवाहन ट्रम्प यांनी केले होते. 

संयुक्त राष्ट्रांनुसार गाझातील ९० टक्के लोक आता विस्थापित झाले आहेत. काही लोकांना तर १० पेक्षाही अधिक वेळा विस्थापित व्हाले लागले आहे. ट्रम्प यांनी जॉर्डन आणि इजिप्तच्या राष्ट्र प्रमुखांशी चर्चा झाली आहे. आता हे दोन्ही देश ट्रम्प यांच्या या प्लॅनबाबत काय भूमिका घेतात, यावर या गोष्टी अवलंबून असणार आहेत. 

टॅग्स :Donald Trumpडोनाल्ड ट्रम्पIsrael-Hamas warइस्रायल - हमास युद्धIsrael Palestine Conflictइस्रायल पॅलेस्टाईन संघर्ष