शहरं
Join us  
Trending Stories
1
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
3
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
4
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
5
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
6
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
7
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
8
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
9
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
10
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
11
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
12
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
13
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
14
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
15
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
16
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
17
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
18
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
19
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
20
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
Daily Top 2Weekly Top 5

ब्रेक्झिट प्रक्रियेसाठी ब्रिटनच्या संसदेत मतदान

By admin | Updated: February 3, 2017 01:50 IST

ब्रिटनमधील संसद सदस्यांनी बे्रक्झिट प्रक्रिया सुरु करण्यास मोठ्या प्रमाणावर मतदान केले आहे. यूरोपीय संघातून ब्रिटनने बाहेर पडण्याच्या दिशेने टाकलेले हे महत्वपूर्ण पाऊल मानले जात आहे.

लंडन : ब्रिटनमधील संसद सदस्यांनी ब्रेक्झिट प्रक्रिया सुरु करण्यास मोठ्या प्रमाणावर मतदान केले आहे. यूरोपीय संघातून ब्रिटनने बाहेर पडण्याच्या दिशेने टाकलेले हे महत्वपूर्ण पाऊल मानले जात आहे. हाऊस आॅफ कॉमन्सच्या सदस्यांनी हे विधेयक पुढे नेण्यासाठी ११४ च्या तुलनेत ४९८ मतदान केले. यूरोपीय संघ सोडण्यासाठी व लिस्बन कराराच्या कलम ५० ची अंमलबजावणी करण्यास हे विधेयक ब्रिटनच्या पंतप्रधान टेरीजा मे यांना अधिकार देणार आहे. कॉमन्स आणि हाऊस आॅफ लॉर्डसमध्ये समीक्षेनंतर या विधेयकाचा कायदा बनणार आहे. यापूर्वी टेरीजा मे यांनी स्पष्ट केले होते की, ब्रेक्झिट धोरणावर लवकरच एक श्वेतपत्रिका सादर करण्यात येईल. संसद सदस्य मारिया मिलर यांच्या प्रश्नाच्या उत्तरात टेरीजा मे यांनी हाउस आॅफ कॉमन्समध्ये सांगितले की, मी या सभागृहाला सूचित करु इच्छिते की, श्वेतपत्रिका प्रकाशित करण्यात येईल. विधेयकाच्या समर्थनार्थ व्हिप, पण कोणीच पालन करणार नाही- ब्रिटनचे विदेश मंत्री बोरिस जॉन्सन यांनी मतदानानंतर व्टिट केले की, इतिहास रचला गेला आहे. लिबरल डेमोक्रेट आणि स्कॉटिश नॅशनल पार्टीच्या नेत्यांनी या विधेयकाच्या विरुद्ध मतदान केल्यानंतरही सरकार जिंकण्याची शक्यता होतीच. - लेबर पार्टीचे नेते जेरेमी कॉर्बिन यांनी या विधेयकाच्या समर्थनार्थ संसद सदस्यांसाठी तीन ओळींचा व्हिप जारी केला होता. अर्थात, भारतीय वंशाचे संसद सदस्य वीरेंद्र शर्मा यांच्यासह लेबर पार्टीच्या अनेक सदस्यांनी असा संकेत दिला होता की, ते व्हिपचे पालन करणार नाहीत.