शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

"भारतासाठी आम्ही पाकिस्तानला...", रशियाच्या राजदूतांचं मोठं विधान!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2023 09:25 IST

पाकिस्तानमुळे आपले भारतासोबतचं संबंध खराब करण्याची रशियाची अजिबात इच्छा नाही.

नवी दिल्ली-

पाकिस्तानमुळे आपले भारतासोबतचं संबंध खराब करण्याची रशियाची अजिबात इच्छा नाही. नवी दिल्लीतील रशियाचे राजदूत डेनिस अलीपोव यांनी भारत आणि पाकिस्तानसोबतच्या नातेसंबंधांवर भाष्य केलं आहे. रशियानं भारतासाठी पाकिस्तानसोबतच्या संरक्षण संबंधांचा गळा घोटला आहे, असं मोठं विधान डेनिस अलीपोव यांनी केलं आहे. तसंच भारताचं नुकसान होईल असं कोणतंही पाऊल रशिया उचलणार नाही, असंही ते म्हणाले. 

रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव यांनी पाकिस्तानबाबत केलेल्या विधानानंतर रशियन राजदूत डेनिस अलीपोव यांनी हे विधान केलं आहे. नियमित सैन्य कारवाईत रशिया पाकिस्तानचं समर्थन करत राहील, असं विधान सर्गेई लावरोव यांनी केलं होतं. याआधी पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो देखील रशियाच्या दौऱ्यावर होते. या दौऱ्यात पाकिस्तान आणि रशियातील संरक्षण, व्यापारी संबंध अधिक मजबूत करण्याचं लक्ष्य ठेवलं होतं. 

भारतासाठी तेलाचा पुरवठा सुरूच राहणारनवी दिल्लीत आयोजित पत्रकार परिषदेत अलीपोव यांनी रशिया आणि भारतमधील तेलाच्या व्यापारावरही भाष्य केलं आहे. कच्च्या तेलावरील पाश्चिमात्य देशांकडून लावण्यात आलेल्या प्राइस कॅपनंतरही रशिया भारताला तेलाचा पुरवठा करत राहील, असं अलीपोव म्हणाले. तसंच सर्वच पातळीवरील निर्यात स्तर कायम राखला जाईल आणि भारतासोबतच्या संबंधांमध्ये आणखी दृढता आणण्याचा मानस असल्याचं रशियाकडून सांगण्यात आलं आहे.

टॅग्स :russiaरशियाNarendra Modiनरेंद्र मोदी