शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

व्लादिमीर पुतिन यांना गंभीर आजार, लवकरच राष्ट्रपतीपद सोडणार?

By बाळकृष्ण परब | Updated: November 6, 2020 09:54 IST

Vladimir Putin News : गेल्या २० वर्षांपासून रशियामध्ये सत्तेत असणारे मातब्बर नेते व्लादिमीर पुतिन हे पुढील वर्षाच्या सुरुवातीला आपल्या पदाचा राजीनामा देण्याची शक्यता आहे.

ठळक मुद्देपुतिन हे पार्किसन्स आजाराशी झुंजत असून, त्यांच्या हल्लीच्या फोटोंमधून त्यांना झालेल्या या आजाराची लक्षणे दिसत आहेतपुतीन यांची प्रेयसी आणि त्यांच्या दोन मुली पुतिन यांच्यावर राजीनामा देण्यासाठी दबाव आणत आहेतपुतिन हे जानेवारी महिन्यात सत्ता अन्य कुणाकडे तरी सोपवून कार्यमुक्त होऊ शकतात

मॉस्को - जगातील सर्वात शक्तिशाली नेत्यांपैकी एक असलेले आणि गेल्या २० वर्षांपासून रशियामध्ये सत्तेत असणारे मातब्बर नेते व्लादिमीर पुतिन हे पुढील वर्षाच्या सुरुवातीला आपल्या पदाचा राजीनामा देण्याची शक्यता आहे. पुतिन यांनी रशियाच्या राष्ट्रपतीपदाचा राजीनामा द्यावा, असे आवाहन पुतिन यांची गर्लफ्रेंड अलिना कबाइला आणि पुतिन यांच्या दोन मुलींनी केले आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. पुतिन हे पार्किसन्स आजाराशी झुंजत असून, त्यांच्या हल्लीच्या फोटोंमधून त्यांना झालेल्या या आजाराची लक्षणे दिसत आहेत.मॉस्कोमधील राजकीय विश्लेषक वलेरी सोलोवेई यांनी ब्रिटिश वृत्तपत्र द सन ला सांगितले की, रशियन राष्ट्रपतींची प्रेयसी आणि त्यांच्या दोन मुली पुतिन यांच्यावर राजीनामा देण्यासाठी दबाव आणत आहेत. पुतिन यांचे कुटुंब असून, कुटुंबातील सदस्यांचा त्यांच्यावर प्रभाव आहे. त्यामुळे पुतिन हे जानेवारी महिन्यात सत्ता अन्य कुणाकडे तरी सोपवून कार्यमुक्त होऊ शकतात. रशियन राष्ट्रपती पार्किसन्सने ग्रस्त असून, हल्लीच्या छायाचित्रांमधून त्यांच्यामध्ये आजाराची लक्षणे दिसत आहेत, असेही त्यांनी सांगितले.हल्लीच एका व्हिडिओमध्ये पुतिन हे आपल्या पायांची हालचाल इकडून तिकडे करताना दिसून आले होते. द सनच्या तज्ज्ञांच्या मते रशियन राष्ट्रपती वेदनेने पीडित होते. रशियाचे खासदार पुतिन यांना फौजदारी कारवाईपासून आजन्म सूट देण्यासंबंधीचे विधेयक संसदेत दाखल करण्याचा विचार करत असतानाचा पुतिन यांच्या राजीनाम्याचा वावड्या उठल्या आहेत.हे नवे विधेयक स्वत: पुतीन यांनी सादर केले होते. या विधेयकानुसार पुतिन जिवंत असेपर्यंत त्यांना कायदेशीर कारवाईपासून सूट दिली जाईल. तसेच सरकारकडून त्यांना सर्व सवलती दिल्या जातील. रशियाची सरकारी वृत्तवाहिनी असलेल्या आरटीनुसार हे विधेयक म्हणजे सत्तेच्या हस्तांतरणाचे संकेत आहेत. पुतीन यांना पार्किंसन्स आजार असल्याची शक्यता पहिल्यांदाच वर्तवण्यात आलेली नाही. दरम्यान, सोलोवेई यांनी सांगितले की, लवकरच एक नवा पंतप्रधान नियुक्त केला जाईल. त्याला पुतिन यांच्या संरक्षणाखाली प्रशिक्षित केले जाईल.

टॅग्स :Vladimir Putinव्लादिमीर पुतिनrussiaरशियाInternationalआंतरराष्ट्रीय