शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

'मोदी है तो मुमकिन है', अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांची मोदींवर स्तुतिसुमनं

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2019 09:25 IST

अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माइक पॉम्पिओ यांनी भाजपाच्या निवडणुकीतील घोषणा 'मोदी है तो मुमकिन है' याचा उल्लेख करत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांच्यावर स्तुतिसुमनं उधळली आहेत.

वॉशिंग्टनः अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माइक पॉम्पिओ यांनी भाजपाच्या निवडणुकीतील घोषणा 'मोदी है तो मुमकिन है' याचा उल्लेख करत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांच्यावर स्तुतिसुमनं उधळली आहेत. पॉम्पिओ 24 जून रोजी भारताच्या दौऱ्यावर येत आहेत. तत्पूर्वीच त्यांनी मोदींवर स्तुतिसुमनं उधळल्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. पोम्पिओ बुधवारी झालेल्या भारत-अमेरिका व्यापार परिषदेच्या बैठकीत म्हणाले, मोदी दोन्ही देशांचे द्विपक्षीय संबंध कशा प्रकारे मजबूत करणार आहेत हे मी पाहणार आहे. एस. जयशंकर हे माझे साथीदार आहेत, त्यामुळे त्यांना भेटण्यासाठी मी आतुर आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गेल्या काही दिवसांपूर्वीच निवडणुकीच्या अभियानात म्हटलं होतं की, मोदी है तौ मुमकिन है, तर मी जाणू इच्छितो, भारत आणि अमेरिकेमध्ये काय शक्य आहे. आता त्यांनी जनतेला दिलेली आश्वासनं आणि जगातल्या इतर देशांशी कशा प्रकारे संबंध प्रस्थापित करतात हे पाहायचं आहे. मला आशा आहे की, अमेरिकेबरोबरच द्विपक्षीय संबंध आणखी मजबूत करण्यासाठी मोदी प्रयत्नशील राहतील. भारत दौऱ्यात ट्रम्प प्रशासनाच्या महत्त्वांच्या मुद्द्यांवर बातचीत होणार आहे. दोन्ही देशांमध्ये व्यापारावरून काही वाद आहेत. परंतु आम्ही चर्चेसाठी नेहमीच तयार आहोत. दोन्ही देशांकडे हिंद-प्रशांत सागर आणि जगाच्या भवितव्यासाठी एकत्र येऊन पुढे जाण्याची संधी आहे. पोम्पिओ भारताबरोबरच श्रीलंका, जपान आणि दक्षिण कोरियाचाही दौरा करणार आहेत.संयुक्त राज्य अमेरिका आणि चीनमध्ये सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर पोम्पिओ यांच्या या दौऱ्याला विशेष महत्त्व प्राप्त झालं आहे. मोदींनी संरक्षण क्षेत्रात अमेरिकेला समर्थन दिलं आहे. पण जेव्हापासून ट्रम्प प्रशासनानं भारतावर व्हेनेझुएला आणि इराणकरून तेल खरेदी करण्यासाठी दबाव बनवला, तेव्हापासून दोन्ही देशांमध्ये व्यापारावरून तणाव निर्माण झाला आहे. ट्रम्प प्रशासनानंही भारताला जीएसपी यादीतून बाहेरचा रस्ता दाखवला आहे.  

टॅग्स :Americaअमेरिका