शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
4
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
5
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
6
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
7
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
8
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
9
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
10
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
11
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
12
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
13
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
14
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
15
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
16
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
17
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
18
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
19
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
20
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."

Pakistan Finance Minister : 'चोर चोर'च्या घोषणा अन् शिविगाळ! पाकच्या अर्थमंत्र्याचा अमेरिकेत झाला अपमान, Video

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2022 09:14 IST

व्हिडीओत विमानतळावर डार यांना काही लोक ‘खोटारडा’ आणि ‘चोर’ म्हणताना ऐकू येत आहे.

पाकिस्तानचे (Pakistan) अर्थमंत्री इशाक डार (Ishaq Dar) अमेरिकेतील वॉशिंग्टन येथील ड्युलेस आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचले असता त्यांना अज्ञात लोकांनी शिवीगाळ केल्याची घटना घडली. पूरग्रस्त देश पाकिस्तानसाठी जागतिक कर्ज देणाऱ्या संस्थांकडून आर्थिक मदत घेण्यासाठी ते आले होते. ट्विटरवर यासंदर्भातील एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. या व्हिडीओत विमानतळावर डार यांना काही लोक ‘खोटारडा’ आणि ‘चोर’ म्हणताना ऐकू येत आहे. त्यांच्यासोबत अमेरिकेतील पाकिस्तानचे राजदूत मसूद खान आणि अन्य अधिकारीही उपस्थित होते. 

व्हिडीओमध्ये अज्ञात लोकांकडून त्यांना चोर चोर असे म्हटल्याचेही ऐकू येत आहे. “तुम्ही खोटारडे आहात, चोर आहात,” असं एक व्यक्ती म्हणत असल्याचं येत आहे. यावर डार यांनीदेखील प्रत्युत्तर देत तुम्ही खोडाटरडे आहात असं म्हटलं. डार यांच्यासोबत उपस्थित पाकिस्तान मुस्लीम लीग-नवाज पक्षाच्या व्हर्जिनिआचे प्रमुख मणी बट यांनी अज्ञातांशी वाद घातल्याचं व्हिडीओमध्ये ऐकू येत आहे. यामध्ये दोन्ही बाजूंनी अपशब्दांचा वापर करण्यात आल्याचं पाकिस्तानी वृत्तपत्र द डॉननं म्हटलंय. नुकताच डार यांनी आपल्या मंत्रिपदाचा पदभार सांभाळला आहे. त्यांची मिफ्ताह इस्माइल यांच्या जागी नियुक्ती करण्यात आली आहे. डार आयएमएफच्या वार्षिक बैठकांमध्ये सहभागी होण्यासाठी वॉशिंग्टन येथे पोहोचलेत. पाकिस्तानात आलेल्या महापूरानंतर ते आंतरराष्ट्रीय संस्थांकडे कर्जाच्या अटी शर्थींमध्ये बदल करण्याची मागणी करण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Pakistanपाकिस्तानAmericaअमेरिका