शहरं
Join us  
Trending Stories
1
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
2
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
3
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
4
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
5
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
6
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
7
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
8
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
9
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
10
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
11
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
12
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
13
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
14
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
15
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
16
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
17
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
18
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
19
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
20
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या

हिंसक व्हिडीओ गेममुळे मुलांना होतेय बंदूक चालविण्याची इच्छा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2022 08:27 IST

अमेरिकेतील पाहणीचा निष्कर्ष; मानसिक निराशा हेही महत्त्वाचे कारण

ह्युस्टन : अमेरिकेत अनेक मुले हिंसक व्हिडिओ गेम सातत्याने खेळत असतात. त्यातील ६० टक्के मुलांना आपणही बंदूक चालवून पाहावी, अशी इच्छा होते. त्यातून व मानसिक तणावामुळे शाळा, तसेच सार्वजनिक ठिकाणी अंदाधुंद गोळीबारासारख्या घटना घडतात, असे एका पाहणीच्या अहवालात म्हटले आहे. अशी हत्याकांडे घडण्याच्या कारणांमध्ये हिंसक व्हिडिओ गेम हेदेखील महत्त्वाचे कारण असल्याचे अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीदेखील म्हटले होते. 

उवाल्डे येथील प्राथमिक शाळेत मंगळवारी झालेल्या गोळीबाराच्या घटनेने सारी अमेरिका शोकाकुल झाली आहे. अशा घटनांसंदर्भातील एका पाहणीच्या अहवालात म्हटले आहे की, गोळीबाराच्या घटनांचे हिंसक व्हिडिओ गेम खेळणाऱ्या मुलांच्या बंदूक चालवून पाहण्याची इच्छा प्रबळ होते. जर्नल ऑफ दि अमेरिकन मेडिकल असोसिएशन या नियतकालिकामध्ये या अहवालाचे निष्कर्ष प्रसिद्ध झाले आहेत. या पाहणीत २०० मुलांचा समावेश करण्यात आला होता. त्यातील निम्म्या मुलांना हिंसेचा लवलेशही नसलेले व अन्य मुलांना हिंसक व्हिडिओ गेम देण्यात आले. मुलांपैकी ६० टक्के मुलांच्या मनात बंदूक चालवून पाहण्याची इच्छा जागी झाली. त्याबद्दलच्या अहवालात म्हटले होते की, पालकांनी हिंसक व्हिडिओ गेमपासून आपल्या मुलांना दूर ठेवले पाहिजे. 

‘गोळीबार रोखण्यासाठी हव्या ठोस उपाययोजना’अमेरिकेतील उवाल्डे येथील शाळेत घडलेला गोळीबार अत्यंत भीषण स्वरूपाचा आहे. अशा घटनांवर केवळ शोक व्यक्त करून थांबू नये. ही हत्याकांडे रोखण्यासाठी ठोस उपाययोजना केल्या पाहिजेत, असे प्रख्यात अभिनेत्री प्रियांका चोप्रा हिने म्हटले आहे. बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा आता हॉलिवूड चित्रपटसृष्टीत अधिक कार्यरत आहे. शाळेतील गोळीबाराच्या घटनेचा सेलेना गोमेझ, टेलर स्विफ्ट, आर. माधवन, आदी सेलिब्रिटीजनी तीव्र शब्दांत निषेध केला आहे.

यंदा अंदाधुंद गोळीबाराच्या २७ घटनायंदाच्या वर्षी अमेरिकेत अंदाधुंद गोळीबाराच्या २७ घटना घडल्या आहेत. २०२१ साली शाळांमध्ये झालेल्या गोळीबाराच्या घटनांत १०३ जण ठार झाले होते. २०१८ ते २०२१ सालापासून असे ११९ प्रकार घडले आहेत. २०२०पेक्षा २०२१ साली अशा घटनांत ५० टक्के वाढ झाली.

एप्रिल १९९९- अमेरिकेतील कोलोरॅडो येथील लिटलटॉन येथे शाळेत दोन विद्यार्थ्यांनी केलेल्या गोळीबारात बाराजण ठार झाले होते. मार्च २००५ - १६ वर्षे वयाच्या एका विद्यार्थ्यांने आपल्या आजोबा व त्यांच्या एका सहाकाऱ्याला ठार मारले व तो जवळच्या रेड लेक हायस्कूलमध्ये गेला. तिथे त्याने केलेल्या गोळीबारात ५ विद्यार्थी, एक शिक्षक, सुरक्षारक्षक मारला गेला. एप्रिल २००७ - व्हर्जिनिया टेक येथे २३ वर्षे वयाच्या व्यक्तीने केलेल्या गोळीबारात ३२ जणांचा मृत्यू झाला होता. डिसेंबर २०१२ - कनेक्टिकट येथील न्यूटाउन येथे १९ वर्षे वयाच्या एका युवकाने आपल्या आईची गोळ्या झाडून हत्या केली. त्यानंतर तेथील एका शाळेत

गोळीबार करून २० लोकांना ठार केले. फेब्रुवारी २०१८ - फ्लोरिडामधील पार्कलँड येथे एका युवकाने शाळेत केलेल्या गोळीबारात १४ विद्यार्थ्यांनी जीव गमावला होता. फेब्रुवारी २०१८ - ह्युस्टनमधील हायस्कूलमध्ये एका हल्लेखोराने १० जणांना गोळ्या झाडून ठार केले होते. त्यानंतर शाळेतील गोळीबाराची सर्वात भीषण घटना मंगळवारी उवाल्डेच्या शाळेत घडली आहे.

गेल्या पाच वर्षांत जगभरात शाळेत झालेल्या गोळीबाराच्या घटना. त्यातील ८० टक्क्यांहून अधिक घटना अमेरिकेत घडल्या आहेत. nअमेरिका - २८८ । मेक्सिको - ८ । दक्षिण आफ्रिका - ६ । भारत - ५ । नायजेरिया - ४ । पाकिस्तान -४ । अफगाणिस्तान - ३ । कॅनडा -२ । फ्रान्स - २ । ब्राझिल - २ । इस्टोनिया -१ । केनिया - १ । जर्मनी - १ । तुर्कस्थान - १ । रशिया - १ ।चीन - १

 

टॅग्स :FiringगोळीबारAmericaअमेरिका