शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Al-Aqsa mosque: अल-अक्सा मशीदीमध्ये हिंसाचार; इस्त्रायलच्या सैनिकांची कारवाई, १५० हून अधिक पॅलेस्टीनी जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2022 14:32 IST

अल-अक्सा मशीद ज्यू आणि ख्रिश्चनांसाठी देखील एक पवित्र स्थान मानली जाते. हे ज्यूंचे सर्वात मोठे पवित्र स्थान आहे. ज्यूबहुल इस्रायल आणि मुस्लिमबहुल पॅलेस्टाईन यांच्यातील अनेक दशकांपासून ही मशीद संघर्षाचे केंद्र बनली आहे.

जेरुसलेम : इस्लामचे तिसरे पवित्र स्थान असलेल्या जेरुसलेमची अल अक्सा मशीदीमध्ये आज इस्त्रायल सैनिक आणि पॅलेस्टिनींमध्ये हिंसाचार झाल्याचे वृत्त आहे. शुक्रवारी पहाटेच झालेल्या या हिंसाचारात ६७ पॅलेस्टीनी नागरिक जखमी झाले आहेत. 

इस्त्रायल नेहमीच या मशीदीवर आपला हक्क सांगत आला आहे. यामुळे अनेकदा ही मशीद हिंसाचाराचे कारण बनली आहे. या मशीदीमध्ये पॅलेस्टीनींना जाण्यावर निर्बंध आहेत. परंतू, रमजान असल्याने त्यांना सूट देण्यात आली होती. इस्त्रायलच्या सैन्याला या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर हिंसाचार करण्य़ासाठी दगड, हत्यारे गोळा करण्यात आल्याची खबर मिळाली होती. ते हटविण्यासाठी इस्त्रायलचे सैन्य मशीदीमध्ये गेले. 

यावेळी नमाज पठणासाठी मोठ्या संख्येने पॅलेस्टिनी आतमध्ये होते. वृत्तसंस्था एपीनुसार अल अक्सा मशीदीच्या समितीने सांगितले की, इस्त्रायल पोलीस सकाळ होण्याआधीच मशीदीत आले होते. तर इस्त्रायलने सांगितले की, रमजानच्या निमित्ताने हजारो लोक मशीदीत गोळा झाले होते. आमच्या सैन्याने आतमध्ये हिंसा करण्यासाठी ठेवण्यात आलेले दगड हटविण्यासाठी आतमध्ये कारवाई केली. 

अल-अक्सा मशीद ज्यू आणि ख्रिश्चनांसाठी देखील एक पवित्र स्थान मानली जाते. हे ज्यूंचे सर्वात मोठे पवित्र स्थान आहे. ज्यूबहुल इस्रायल आणि मुस्लिमबहुल पॅलेस्टाईन यांच्यातील अनेक दशकांपासून ही मशीद संघर्षाचे केंद्र बनली आहे. व्हिडिओंमध्ये पॅलेस्टिनी लोक दगडफेक करताना आणि इस्रायली पोलिस अश्रूधुराचे नळकांडे फेकताना दिसत आहेत. काही व्हिडिओंमध्ये अश्रुधुरापासून वाचण्यासाठी लोक मशिदीत लपून बसलेले दिसतात.पॅलेस्टाईनच्या रेड क्रेसेंट आपत्कालीन सेवेने सांगितले की त्यांनी 67 जखमींना रुग्णालयात हलविले आहे. हे लोक रबरी गोळ्या आणि ग्रेनेडमुळे जखमी झाले होते. जखमींची संख्या १५० वर गेल्याचे सांगण्यात आलेआहे. घटनास्थळावरील एका गार्डच्या डोळ्यात रबरी गोळी झाडण्यात आली होती. तर इस्त्रायलने म्हटले आहे की, दगडफेकीत तीन अधिकारी जखमी झाले आहेत. यापैकी दोघांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. 

टॅग्स :Israelइस्रायलPalestineपॅलेस्टाइन