शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

'या' गावात मगरीला आहे देवाचं स्थान, पूजेबरोबरच लोक तासन् तास घालवतात वेळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2018 16:47 IST

गावातील लोक मगरीची पूजा करतात.

प्रेटोरिया- मगर अतिशय भयानक जीव असल्याचं आपण मानतो. जर कधी चुकूनही मगर समोर आली, तर काय हालत होईल याचा अंदाजही लावणं कठीण आहे. पण एक असं गाव आहे जिथे मगरीला देवाचं स्थान दिलं जातं. इतकंच नाही, तर त्या गावातील लोक मगरीची पूजा करतात व तिच्यासोबत तासन् तास वेळही घालवितात. त्या गावातील लहान मुलंच नाही तर मोठी माणसं मगर ही पाळीव प्राणी असल्यासारखं तिच्यावर बसतात. 

आफ्रिकी देश बुर्कीना फासोमध्ये हे गाव असून बजूले असं या गावाचं नाव आहे. बुर्कीना फासोपासून 30 किलोमीटर अंतरावर हे गाव आहे. या गावातील एका तलावात 100 हून जास्त मगरी आहेत. गावातील काही मुलं जेव्हा लहान होती तेव्हा ते लोक मगरीवर बसायचे. तिच्याबरोबर पाण्यात पोहण्याचाही आनंद घ्यायचे. या गावातील मगरी पवित्र असून त्या तेथिल लोकांना हानी पोहचवत नाही, असं गावातील एका व्यक्तीने सांगितलं. 15 व्या शतकापासून मगर व त्या गावातील लोकांचं नातं आहे. एके वेळी गावात भीषण दुष्काळ होता त्यावेळी तेथिल एका मगरीने एका महिलेला छुप्या तलावापर्यंत पोहचवलं. त्या मगरीमुळे गावातील लोकांची पाणी संकट दूर झालं, असा तेथिल लोकांचा समज आहे. तेव्हा तेथिल लोकांनी मगरीचे आभार मानायला खास कार्यक्रमही आयोजीत केला होता. आताही तसे कार्यक्रम आयोजीत केले जातात.

त्या गावात मगरींना पूर्वजांचा आत्मा मानला जातो. त्या मगरीपैकी एक मगर जरी मेली तरी तिला त्या मगरीवर एखाद्या व्यक्तीप्रमाणे अंतिमविधी केले जातात. माणसाचा निधन झाल्यावर ज्याप्रमाणे त्या माणसाला दफन करतात तसंच मगरीलाही केलं जातं. गावात जर काही वाईट घटना घडणार असेल तर त्याआधी मगर रडायला सुरू करते, असा समज तेथिल लोकांचा आहे.