शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Video : तो फ्लॉवर समजला, पण वाघ फायर निघाला! तरुणाला वाघासोबत सेल्फी काढणं पडलं महागात, बघा नेमकं काय झालं...  

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2025 19:15 IST

थायलंडमधील प्रसिद्ध पर्यटनस्थळ टायगर किंगडम येथे एका पर्यटकाचा जीव केवळ एका सेल्फीमुळे धोक्यात आला.

थायलंडमधील प्रसिद्ध पर्यटनस्थळ टायगर किंगडम येथे एका भारतीय पर्यटकाचा जीव केवळ एका सेल्फीमुळे धोक्यात आला. वाघासोबत सेल्फी घेण्याच्या प्रयत्नात त्या माणसावर वाघाने अचानक हल्ला केला. या घटनेचा थरारक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.

या व्हिडीओमध्ये एक तरुण वाघासोबत चालताना आणि त्याच्याजवळ बसून फोटो काढण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. त्यावेळी एक प्रशिक्षक वाघाला काठीने नियंत्रित करण्याचा प्रयत्न करत होता. मात्र काही क्षणांतच वाघ अचानक आक्रमक झाला आणि त्याने त्या व्यक्तीवर झडप घातली. व्हिडीओत तरुणाचा घाबरलेला आवाज स्पष्टपणे ऐकू येतो आहे.

पर्यटकांची सुरक्षेवर प्रश्नचिन्ह!

ही घटना समोर आल्यानंतर पर्यटकांच्या सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. तसेच, टायगर किंगडमसारख्या प्राण्यांसोबत थेट भेट घडवणाऱ्या पर्यटन स्थळांवर प्राण्यांना कशाप्रकारे वागणूक दिली जाते, यावरही चर्चा सुरू झाली आहे.

या व्हिडीओवर अनेकांनी कमेंट करत त्या व्यक्तीच्या प्रकृतीबद्दल चिंता व्यक्त केली आहे. काही नेटकऱ्यांनी या व्हिडीओवर कमेंट करत विचारले की, “तो तरुण सुरक्षित आहे का?” या प्रश्नाला उत्तर देताना व्हिडीओ पोस्ट करणाऱ्या युजरने सांगितले की, “तो ठीक आहे, पण त्याला केवळ किरकोळ जखमा झाल्या आहेत.”

वाघाच्या वागणुकीमागचं कारण काय?वाघ अचानक आक्रमक का झाला, याचा अंदाज बांधताना एका युजरने म्हटले की, “प्राण्यांना शरीराच्या पाठीमागच्या भागाला हात लावणे आवडत नाही. त्या माणसाने वाघाला सतत त्या भागावरून मिठी मारण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे वाघ चिडला असावा.”

मात्र, या घटनेनंतर टायगर किंगडमसारख्या संस्थांमध्ये प्राण्यांशी होणाऱ्या वागणुकीबाबत पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित झाले आहेत. अनेकजण असा आरोप करतात की, पर्यटकांसोबत वाघ शांत राहावे म्हणून त्यांना औषधं दिली जातात, उपाशी ठेवले जाते, किंवा कठोर प्रशिक्षण दिलं जातं. आता अनेक जण यावर टीका देखील करत आहेत. 

टॅग्स :Viral Videoव्हायरल व्हिडिओTigerवाघThailandथायलंड