शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO- हिंदी गाण्यातून ब्रिटनच्या पंतप्रधानांचं मतदारांना आवाहन

By admin | Updated: May 31, 2017 14:43 IST

ब्रिटनच्या पंतप्रधान टेरेसा मे यांनी आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेथील भारतीय मतदारांना आपल्याकडे वळवण्यासाठी म्युझिक व्हिडिओ बनवला आहे.

ऑनलाइन लोकमत

लंडन, दि. 31- निवडणुका जवळ आल्या की प्रत्येक राजकारणी आपापल्या पद्धतीने प्रचार करतो. मतदारांना आकर्षित करण्यासाठी विविध फंडे राजकारणी वापरतात. निवडणुकीच्या प्रचारात ब्रिटनसुद्धा आता मागे राहिलं नाही. निवडणुकीचा प्रचार जसा भारतात जोरदार केला जात असतो तसा तो भारताबाहेरही केला जातो याचं उत्तम उदाहरण समोर आलं आहे. ब्रिटनच्या पंतप्रधान थेरेसा मे यांनी आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेथील भारतीय मतदारांना आपल्याकडे वळवण्यासाठी म्युझिक व्हिडिओ बनवला आहे. या २ मिनिटांच्या व्हिडिओत त्यांनी चक्क साडी नेसली आहे. तसंच हिंदी गाणं वापरून हा व्हिडिओ तयार करण्यात आला आहे. 
 
"दोस्तो, धन्यवाद शुक्रिया मेहरबानी. अब फिर समय आया है साथ निभाने का, पिछले समय जो साथ निभाया उसका भी सलाम।", असे या गाण्याचे बोल आहेत. व्हिडिओत थेरेसा मे अनवाणी चालताना आणि साडी नेसून मंदिरात पूजा करताना दिसून येत आहे. "थेरेसा के साथ" असं या व्हि़डिओचं नाव आहे.
 
व्हिडिओच्या सुरुवात ब्रिटीश संसदेची एक झलक बघायला मिळते आहे, त्यानंतर येत्या ८ जून रोजी असलेल्या निवडणुकीबद्दल या व्हिडीओत सांगण्यात आलं आहे. भारत दौऱ्यावर टेरेसा मे आल्या होत्या तेव्हाचे  भारतीय नेत्यांसोबतचे फोटो या व्हिडिओमध्ये बघायला मिळत आहेत. थेरेसा आणि त्यांचा पक्ष - कॉन्झर्वेटिव पार्टी भारतीय मतदारांच्या बाजूने आहे, थेरेसा यांचे भारतासोबत चांगले संबंध आहेत, हे या व्हिडिओतून दाखविण्याचा प्रयत्न केला जातो आहे, अशी चर्चा सुरू झाली आहे. व्हिडिओत थेरेसा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घेतलेल्या भेटीचेही फोटो दाखवण्यात आले आहेत.