शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

भयावह! रस्ते ब्लॉक केले, कारवर अंदाधुंद गोळीबार; हमासच्या पहिल्या हल्ल्याचा खतरनाक Video

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2023 10:10 IST

Israel Palestine Conflict : इस्रायलमध्ये 7 ऑक्टोबर रोजी नोवा म्युझिक फेस्टिव्हलमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याशी संबंधित एक व्हिडीओ समोर आला आहे.

इस्रायल-हमास युद्ध सुरू होऊन 17 दिवस झाले आहेत. ना इस्रायल हमासवरील हवाई हल्ले थांबवायला तयार आहे ना हमास इस्रायली शहरांवर रॉकेट डागणं थांबवत आहे. याच दरम्यान, एक नवीन व्हिडीओ समोर आला असून त्यानंतर युद्ध सुरू झालं असं म्हटलं जात आहे. इस्रायलमध्ये 7 ऑक्टोबर रोजी नोवा म्युझिक फेस्टिव्हलमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याशी संबंधित एक व्हिडीओ समोर आला आहे. इस्रायलने आपल्या अधिकृत अकाऊंटवरून हे शेअर केलं आहे.

7 ऑक्टोबर रोजी हमासच्या दहशतवाद्यांनी इस्रायलींवर कशाप्रकारे अत्याचार केले हे व्हिडिओमध्ये दिसत आहे. व्हिडिओमध्ये एक रस्ता दिसत आहे, ज्यामध्ये गाड्या अशा प्रकारे पार्क केल्या आहेत की संपूर्ण रस्ता ब्लॉक झाला आहे. या अडवलेल्या रस्त्यावर हमासचे दहशतवादी जीपमधून येतात आणि वेगाने गोळीबार करू लागतात. दहशतवादी तिथे उभ्या असलेल्या गाड्यांवर चढतात आणि लोकांना लक्ष्य करतात. यानंतर दहशतवाद्यांनी तेथे उभ्या असलेल्या गाड्याही पेटवून दिल्या.

या व्हिडिओसोबत इस्रायलने कॅप्शनही लिहिलं आहे. इस्रायलने लिहिलं आहे की, हा व्हिडीओ हमासच्या नोवा फेस्टिव्हलवर झालेल्या हल्ल्याचा आहे, ज्यामध्ये 260 हून अधिक लोक मारले गेले होते. लोक तिथून पळून जाऊ नयेत म्हणून दहशतवाद्यांनी रस्ते अडवले. यानंतर त्यांनी कारमधील लोकांवर गोळ्या झाडल्या आणि गाड्या पेटवून दिल्या. कारमधून उतरून पळण्याचा प्रयत्न करणाऱ्यांनाही गोळ्या घातल्या गेल्या. 

इस्रायल आणि पॅलेस्टिनी दहशतवादी संघटना हमास यांच्यात सुरू असलेल्या या युद्धात आतापर्यंत दोन्ही बाजूंचे 6,000 हून अधिक लोक मारले गेले आहेत. यापैकी 4,600 हून अधिक लोक गाझा आणि 1,400 हून अधिक लोक इस्रायलमधील आहेत. युद्ध सुरू झाल्यापासून गाझामध्ये 14,000 हून अधिक लोक जखमी झाले आहेत.  अमेरिका, ब्रिटन आणि फ्रान्ससारखे देश इस्रायलच्या समर्थनार्थ पुढे आले आहेत, तर पॅलेस्टाईनला इराण आणि रशियासारख्या देशांचा पाठिंबा मिळत आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

टॅग्स :Israel Palestine Conflictइस्रायल पॅलेस्टाईन संघर्षIsrael-Hamas warइस्रायल - हमास युद्धIsraelइस्रायल