शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
2
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
3
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
4
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
5
नजर खाली, काकाचा हातात हात...लग्नासाठी आलेली ५ स्थळे नाकारणारी अर्चना तिवारी घरी कशी पोहचली?
6
ऑनलाइन गेमिंगवर बंदी येण्यापूर्वी झुनझुनवालांची 'या' कंपनीतून एक्झिट; निखिल कामत, मधुसूदन केला यांना अजूनही विश्वास?
7
वाहतूक नियम मोडल्याचे चलन येताच फाईन भरा, ७५ टक्क्यांपर्यंत सूट मिळणार; महाराष्ट्रात विचार सुरु...
8
"पावसाळी अधिवेशनात लोकसभेत केवळ ३७ तास चर्चा, संसदेचा खर्च खासदारांकडून वसूल करा’’, नाराज खासदाराने केली मागणी
9
"बाळासाहेब थोरातांच्या केसालाही धक्का लावण्याची गोडसेच्या औलादीमध्ये धमक नाही", हर्षवर्धन सपकाळ यांनी ठणकावले
10
घरात काय चाललंय ते कळेना! पाक दिग्गज टीम इंडियात डोकावत श्रेयस अय्यरवर बोलला, म्हणे...
11
'का ग कुठे गेली होती?', सुनेत्रा पवारांबद्दलचा प्रश्न ऐकून अजित पवारांनी पत्रकार परिषदेतच जोडले हात
12
१२%, २८% चा GST स्लॅब संपवण्याचा प्रस्ताव राज्यांच्या अर्थमंत्र्यांच्या गटानं स्वीकारला, सामान्यांना मिळणार मोठा दिलासा
13
Raigad Boat Accident: मोठी बातमी! रायगडच्या समुद्रात मासेमारी बोट बुडाली, बचाव कार्य सुरू; व्हिडीओ व्हायरल
14
रशियाची सर्वात शक्तिशाली युद्धनौका S-400 बटालियनसह समुद्रात दाखल, पुतिन काय करतायत..?
15
"वरण-भात माझं आवडीचं जेवण", ट्रोल झाल्यावर विवेक अग्निहोत्रींची पलटी, म्हणाले- "मला अक्कल आली तेव्हा..."
16
Gold Silver Price 21 August: सोन्याच्या दरातील घसरण थांबली, चांदीमध्ये ₹१७४५ ची तेजी, सोनं किती महाग झालं? जाणून घ्या
17
Viral Video : जंगलात राहणाऱ्या व्यक्तीने आयुष्यात पहिल्यांदा खाल्ला रसगुल्ला; प्रतिक्रिया पाहून तुम्हीही खूश व्हाल!
18
'या' सरकारी योजनेत ज्येष्ठांना ५ वर्षांत मिळेल १२,००,००० पेक्षा जास्त व्याज; कोण घेऊ शकतो लाभ?
19
Video: कुत्रा येणाऱ्या-जाणाऱ्यांवर सतत भुंकायचा; टोळक्याने मालकालाच लाठ्या-काठ्यांनी बेदम चोपले...
20
नशीब असावं तर असं! पावसापासून वाचण्यासाठी दुकानात शिरली, काही वेळाने करोडपती बनून बाहेर आली

Video: इसिसचा म्होरक्या अबू बक्र अल-बगदादीवर 'असा' केला हल्ला; अमेरिकेकडून पहिला व्हिडीओ जारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2019 11:28 IST

इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड सिरिया' अर्थात आयसिस या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या अबू बक्र अल-बगदादी याला ठार करण्यात आले आहे.

वॉशिंग्टनः इसिसचा म्होरक्या अबू बकर अल बगदादीचा शनिवारी खात्मा करण्यात आला. बगदादीला मारण्यासाठी सीरियातील त्याच्या महत्त्वाच्या ठिकाणांना अमेरिकन लष्करानं लक्ष्य केलं होतं. यानंतर शनिवारी अमेरिकेने अबू बक्र अल-बगदादी याला ठार केले होते. या मोहिमेचा व्हिडीओ अमेरिकेतील विशेष पथकाने ट्विट केला आहे. अबू बक्र अल-बगदादीला खात्मा करण्याचे मिशन जवळपास दोन तास सुरु होतं. 

इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड सिरिया' अर्थात आयसिस या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या अबू बक्र अल-बगदादी याला ठार करण्यात आले आहे. त्याच्यासोबत तीन मुले आणि इतर सहकाऱ्यांचा सुद्धा खात्मा करण्यात आला आहे. या वृत्ताला अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दुजोरा दिला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितले की, अमेरिकेने जगातील पहिल्या क्रमांकाच्या दहशतवादी म्होरक्याला न्यायासमोर आणले. अबू बक्र अल-बगदादी ठार झाला आहे. जगातील सर्वात निर्दयी आणि हिंसक दहशतवादी संघटना असलेल्या आयसिसचा तो संस्थापक आणि म्होरक्या होता.

बगदादीचा ओळख पटेल अशा स्थितीतील मृतदेह हाती लागला नाही. तरी अमेरिकी सैन्याने लगेच जागीच ‘डीएनए’ चाचणी करून मेला तो बगदादीच असल्याची पुरती खातरजमा करून घेतली, असेही ट्रम्प म्हणाले होते. या ‘डीएनए’ चाचणीसाठी बगदादीने वापरलेल्या दोन जुन्या अंडरवेयर व त्याच्या रक्ताचे नमुने सोबत घेऊनच अमेरिकी सैन्य जय्यत तयारनिशी आले होते. बगदादीच्या जुन्या अंडरवेयर व रक्ताचे नमुनेही ‘इसिस’मधील याच फितुराने कारवाईच्या काही दिवस आधी मिळवून अमेरिकी हेरांकडे सुपूर्द केले होते, असेही या सूत्रांनी सांगितले.

बागूजमध्ये सुरू असलेला संघर्ष महिन्याभरापूर्वी संपला आहे. व्हिडीओत बगदादी तीन व्यक्तींना संबोधित करत होता. मात्र त्यांचे चेहरे स्पष्ट दिसत नव्हते. गेल्या काही दिवसांत श्रीलंकेत दहशतवादी हल्ले झाले. त्यात आयसिसचा हात असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या हल्ल्यांमध्ये ३०० हून अधिक जणांचा मृत्यू झाला. तर ५०० नागरिक गंभीर जखमी झाले. श्रीलंकेतल्या विविध शहरांमध्ये झालेल्या बॉम्ब स्फोटांमध्ये चर्चना लक्ष्य करण्यात आले होते.

टॅग्स :Donald Trumpडोनाल्ड ट्रम्पterroristदहशतवादीAmericaअमेरिका