शहरं
Join us  
Trending Stories
1
"महाराष्ट्रात भाजप कोणाच्याही कुबड्यांवर चालत नाही; सत्तेमुळे तुम्ही समाधानी असाल, पण मी नाही": शाह
2
तुमचे अधिकारी वृत्तपत्र वाचत नाहीत का? देशाची प्रतिमा मलिन होतेय; भटक्या कुत्र्यांवरून भडकले कोर्ट
3
१२ राज्यांमध्ये होणार मतदार याद्यांची पडताळणी; SIR दुसरा टप्पा ४ नोव्हेंबरपासून, महाराष्ट्राचा समावेश नाही
4
सरन्यायाधीश बूटफेक प्रकरण: वकिलावर कारवाई करणार नाही; सर्वोच्च न्यायालयाचे स्पष्टीकरण
5
तातडीने सुनावणीस नकार, पण दोन मागण्या मान्य; मराठा-ओबीसी आरक्षण वादात ओबीसी संघटनेला कोर्टाचा दिलासा
6
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
7
शिवडीतील दागिने लुटीचा सुरक्षारक्षक निघाला सूत्रधार; एकाच घरात राहत होते सर्व आरोपी
8
राम जन्मभूमी मंदिराचे काम पूर्ण, २५ नोव्हेंबरला भव्य सोहळा, ६ ते ८ हजार निमंत्रित येणार
9
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
10
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
11
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
12
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
13
विद्यार्थ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी काय केले? तपशील सादर करण्याचे सुप्रीम कोर्टाचे आदेश
14
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
15
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
16
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
17
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
18
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
19
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
20
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा

पॅरिस ऑलिम्पिकच्या उद्घाटनापूर्वी फ्रान्सच्या हायस्पीड ट्रेनमध्ये तोडफोड, जाळपोळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2024 15:44 IST

आजपासून ऑलिम्पिक सुरू होणार आहे, जगभरातील खेळाडू फ्रान्समध्ये पोहोचले आहे. उद्घाटनापूर्वीच पॅरिसमधून एक मोठी अपडेट आली आहे.

फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये आजपासून २०२४ च्या ऑलिम्पिकची सुरुवात होणार आहे. याआधीच पॅरिसमध्ये मोठा गोंधळ सुरू झाला आहे. पॅरिस मधील हायस्पीड रेल्वे नेटवर्कमध्ये मोठ्या प्रमाणात तोडफोड आणि जाळपोळ झाल्याच्या बातम्या समोर आल्या आहेत. त्यामुळे तेथील रेल्वे सेवेवर परिणाम झाला आहे. ८ लाख लोकांना याचा फटका बसला आहे. 

दरम्यान आता या प्रकरणी फ्रेंच रेल्वे कंपनीने एक निवेदन जाहीर केले आहे. या निवेदनात म्हटले आहे की, ऑलिम्पिकपूर्वी पॅरिसमधील ट्रेनचे कामकाज विस्कळीत झाले आहे.

'कोणत्याही देशासाठी चीनसोबतचे संबंध खराब करणार नाही'; पाकिस्तानने अमेरिकेला दाखवला आरसा एसएनसीएफ या सरकारी मालकीच्या रेल्वे कंपनीने सांगितले की, जाळपोळ आणि तोडफोड करणाऱ्यांनी पॅरिसला देशाच्या पश्चिम, उत्तर आणि पूर्वेला जोडणाऱ्या रेल्वे मार्गांना लक्ष्य केले. पॅरिसमध्ये ऑलिम्पिक खेळ सुरू होत असताना आणि आठवड्याच्या शेवटी गर्दी वाढणार होती अशा वेळी हे हल्ले करण्यात आले आहेत. आता यामुळे संपूर्ण देशातील रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली आहे.

अनेक मार्गांवरील ट्रेन ऑपरेशन्स स्थगित

टीजीव्ही नेटवर्कला खराब करण्याच्या उद्देशाने हा हल्ला आहे. यामुळे अनेक मार्गांवरील ट्रेन ऑपरेशन्स स्थगित करणे भाग पडले आहे आणि किमान वीकेंडपर्यंत हे बंद ठेवाले लागेल. दुरुस्तीचे काम पूर्ण होईपर्यंत ते बंद ठेवावे लागणार आहे, असंही यात म्हटले आहे. 

रात्रीच्या अंधारात गाड्यांची तोडफोड केली आहे. यामुळे अटलांटिक, नॉर्दर्न आणि ईस्टर्न लाईनवरही परिणाम झाल्याचे फ्रेंच राष्ट्रीय रेल्वे ऑपरेटरने म्हटले आहे. यात अनेक महत्त्वाच्या केबल्स कापून जाळण्यात आल्या आहेत. ऑपरेटरने सांगितले की, हल्ल्यांमुळे सुमारे ८००,००० फ्रेंच लोकांच्या सुट्ट्या वाया गेल्या आहेत.

एसएनसीएफ दिलेली माहिती अशी, हे हल्ले नियोजित रेल्वे नेटवर्कवरील महत्त्वाच्या ठिकाणांवर केले आहेत. फ्रान्सचे क्रीडा मंत्री अमेली ओडे-कॅस्टेरा यांनी या भ्याड कृत्याचा निषेध केला. 

टॅग्स :paris olympics 2024पॅरिस ऑलिम्पिक २०२४Parisपॅरिस