वॉशिंग्टन : अमेरिकेच्या माजी परराष्ट्रमंत्री हिलरी क्लिंटन यांनी मंत्री असताना खासगी ई-मेल सर्व्हर वापरल्याबद्दल क्षमा मागितली असून, ती एक चूक होती असे म्हटले. पुढील वर्षी अमेरिकेच्या अध्यक्षपदासाठी निवडणूक होत असून डेमोकॅॅ्रटिक पक्षातर्फे उमेदवारी मिळावी असा त्यांचा दावा आहे.हिलरी क्लिंटन यांनी म्हटले आहे की, ‘या प्रश्नांची उत्तरे मी याआधीच देऊ शकले असते व तसे मी करायला हवे होते. मी जे केले त्याला मान्यता होती; परंतु आज मी मागे वळून बघते तेव्हा भलेही त्यासाठी परवानगी होती तरीही मी दोन ई-मेल अकाऊंटचा वापर करायला हवा होता. त्यातील एक खासगी कामांसाठी व दुसरा सरकारी कामांसाठी. ही चूक होती. मी क्षमा मागते व जबाबदारीही घेते.’ ई-मेल वादाचा अध्यक्षपदाच्या निवडणुकीतील प्रचारावर परिणाम होत असताना क्लिंटन यांनी आपली चूक मान्य केली आहे. (वृत्तसंस्था)
‘खाजगी ई-मेलचा वापर चूक’
By admin | Updated: September 10, 2015 03:12 IST