शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

अमेरिकेच्या टेरिफने चीनचे धाबे दणाणले! भारताकडे डोळे लागले; पण पाकिस्तानी लोक काय बोलतायत?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2025 11:49 IST

भारतातील चिनी दूतावासाचे प्रवक्ते यू जिंग म्हणाले, दोन सर्वात मोठे विकसनशील देश म्हणून भारत आणि चीनने अमेरिकेच्या टॅरिफ विरोधात एकत्र येऊन कारवाई करायला हवी. तसेच, भारतासोबतचे व्यापारी संबंध पूरक आणि परस्पर फायदेशीर असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

अमेरिकेने मोठ्या प्रमाणावर टॅरिफ लादल्यानंतर चीनच्या जिनपिंग सरकारचे धाबे दणाणले आहेत. ते भारताकडे मदतीची याचना करत आहे. यावर पाकिस्तानी महिला युट्यूबर सना अमजदने तेथील काही लोकांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला. त्यांनी प्रश्न केला की, चीनहापाकिस्तानचा सर्वात चांगला मित्र आहे, मात्र तो या कठीण काळात भारताकडे बघत आहे. यावर काय बोलाल? यावर एक व्यक्ती म्हणाली, मला वैयक्तिकरित्या डोनाल्ड ट्रम्प अत्यंत आवडतात. मात्र सध्या, ते घेत असलेले निर्णय खरोखरच धक्कादायक आहेत. भारत आणि चीनसंदर्भात बोलायचे झाल्यास, दोन्ही देशांमध्ये चांगला व्यापार होतो. हे लक्षात घेता, हे दोन्ही देश एकत्र आले, तर अमेरिकेसाठी अडचण निर्माण होऊ शकते.

ही पाकिस्तानी व्यक्ती पुडे म्हणाली, भारत आणि चीनची लोकसंख्या 100 कोटींहूनही अधिक आहे. यामुळे हे दोन्ही देश अमेरिकेविरोधात एकत्र आले, तर हा डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा पराभव असेल. आज, अनेक युरोपीय देशही अमेरिकेविरोधात जात आहेत. मात्र, हे अमेरिकेला अपेक्षित नाही. येणाऱ्या 10 वर्षांत चीन जगातील सुपर पॉवर बनेल, अशी भीती अमेरिकेला आहे. यामुळे ते केवळ चीनलाच टार्गेट करत आहेत.

काय म्हणाले चिनी दूतावासाचे प्रवक्त्ये -भारतातील चिनी दूतावासाचे प्रवक्ते यू जिंग म्हणाले, दोन सर्वात मोठे विकसनशील देश म्हणून भारत आणि चीनने अमेरिकेच्या टॅरिफ विरोधात एकत्र येऊन कारवाई करायला हवी. तसेच, भारतासोबतचे व्यापारी संबंध पूरक आणि परस्पर फायदेशीर असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

अमेरिकेने चीनवर लादलाय जबरदस्त टॅरीफ -अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी 3 एप्रिलला चीन विरोधात 34 टक्के टॅरिफची घोषणा केली. यानंतर चीननेही प्रत्त्युत्तरात अमेरिकेवर 34 टक्के टेरिफ लावला. यानंतर मंगळवारी ट्रम्प यांनी पुन्हा चीनवर 104 टक्क्यांचा अतिरिक्त टॅरिफ लावला. यानंतर चीनने पुन्हा पलटवार करत बुधवारी अमेरिकन वस्तूंवर आपला अतिरिक्त टॅरिफ 34 टक्क्यांवरून वाढवून 84 टक्के केला. हा टॅरिफ गुरुवारी, 10 एप्रिलपासून लागू झाला. यानंतर अमेरिकेने पुन्हा टॅरिफ वाढवून तो 125 टक्के केला. याशिवाय, अमेरिकेने 75 देशांवर लादलेल्या टॅरिफला 90 दिवसांची स्थगिती दिली आहे.

टॅग्स :AmericaअमेरिकाTrade Tariff Warटॅरिफ युद्धchinaचीनPakistanपाकिस्तान