शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला डॉक्टर हॉटेलमध्ये का राहत होती? प्रशांत बनकरसोबत भांडण झालेले, समोर आले मोठे कारण...
2
'AI'ची मोठी चूक! चिप्सच्या पाकिटाला बंदूक समजले; शाळकरी विद्यार्थ्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या...
3
फक्त आरोग्य विमा काढणे पुरेसे नाही? 'या' एका नियमामुळे तुमचा क्लेम रिजेक्ट होईल, खिशाला बसेल भुर्दंड
4
"टाटा समूहात जे सुरू आहे, ते पाहून..," रतन टाटांचे निकटवर्तीय नोशीर सूरावालांनी अखेर मौन सोडलं
5
पैसे कमावण्याची संधी? ५ मोठे आयपीओ बाजारात येणार; लेन्सकार्टसह 'या' कंपन्यांची लिस्टिंगची तयारी
6
खळबळजनक! सुसाट डिफेंडरची ५ वाहनांना जोरदार धडक; तिघांचा मृत्यू, ५ जण जखमी
7
Numerology: ‘या’ ४ पैकी तुमची बर्थडेट आहे? १८ वर्षांची महादशा-दोष दूर; राहु कृपेने पैसा-लाभ
8
दक्षिण चीन समुद्रात खळबळ; अर्ध्यातासाच्या अंतराने अमेरिकन नौदलाची दोन विमाने कोसळली
9
माजी CJI चंद्रचूड यांच्या विधानाचा आधार, राम मंदिराविरोधात याचिका; वकिलाला ६ लाखांचा दंड
10
८ वा वेतन आयोग कधी लागू होणार? घोषणेच्या १० महिन्यांनंतरही अधिसूचनेची प्रतीक्षाच
11
भारतापासून १४ हजार किमी दूर, १४ लाख लोकसंख्या; ‘हा’ देश बांधणार राम मंदिर, हिंदू वस्ती किती?
12
Stock Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात, निफ्टी ७० अंकांच्या तेजीसह उघडला; मेटल-रियल्टी शेअर्समध्ये खरेदी
13
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना ऑक्टोबर सांगता सुखाची, पद-पैसा-लाभ; ६ राशींना खडतर काळ!
14
ऑफर्स, ऑनलाईन चॅट्स, फसवणुकीचं जाळं...; iPhone चं आमिष दाखवून लाखोंची फसवणूक
15
भयानक प्रकार! भाजप नेत्याने शेतकऱ्याला थारखाली चिरडले, वाचवायला आलेल्या मुलींचे कपडे फाडले
16
आधार कार्डापासून ते बॅंक अकाऊंट पर्यंत, १ नोव्हेंबरपासून बदलणार ‘हे’ ५ नियम; तुमच्या खिशावर थेट होणार परिणाम
17
आंतरराष्ट्रीय जुजित्सू खेळाडू रोहिणी कलम यांनी आयुष्य संपविले; एक फोन आला आणि ती खोलीत गेली...
18
८ मिनिटांत ८ अब्ज रुपयांचे दागिने चोरणारे चोर सापडले; पॅरिसच्या म्युझियममध्ये टाकलेला दरोडा
19
कोणत्याही परिस्थितीत पीडितेला न्याय अन् आराेपींना शिक्षा मिळेल; देवेंद्र फडणवीस यांची फलटणमध्ये ग्वाही
20
टॅरिफची धमकी मिळाल्याने थायलंड-कंबोडियात युद्धबंदी; ट्रम्प यांच्या आणखी एका मध्यस्थीला मिळाले यश

अमेरिकेने केले ‘एच-१बी’ व्हिसा निलंबित

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2020 01:57 IST

या निर्णयाचा मोठा फटका भारतातील माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील व्यावसायिकांना बसणार आहे.

वॉशिंग्टन : एच-१बी आणि विदेशी कामगारांना देण्यात येणारे इतर सर्व कामकाजी व्हिसा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी निलंबित केले असून, २०२० अखेरपर्यंत हा निर्णय कायम राहणार आहे. या निर्णयाचा मोठा फटका भारतातील माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील व्यावसायिकांना बसणार आहे.अमेरिकेचे हे निवडणूक वर्ष असून, आपल्या मतदारांना आकर्षित करण्यासाठी ट्रम्प यांनी हा निर्णय घेतल्याचे मानले जात आहे. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी सोमवारी यासंबंधीच्या आदेशावर स्वाक्षरी केली. हा आदेश २४ जूनपासून तातडीने लागू होणार आहे.१ आॅक्टोबरला सुरू होणाऱ्या वित्त वर्ष २०२१साठी एच-१बी व्हिसा मिळालेले भारतीय माहिती तंत्रज्ञान व्यावसायिक आणि अमेरिकन व भारतीय कंपन्या यांना या आदेशाचा थेट फटका बसणार आहे. या व्हिसाधारकांना किमान हे वर्ष संपेपर्यंत अमेरिकेच्या दूतावासात जाऊन स्टॅम्पिंग करून घेता येणार नाही. एच-१बी व्हिसाचे नूतनीकरण करू इच्छिणाºया हजारो माहिती तंत्रज्ञान व्यावसायिकांनाही याचा थेट फटका बसणार आहे.एच-१बी हा नॉन-इमिग्रंट व्हिसा आहे. तंत्रज्ञान क्षेत्रातील विशेष कौशल्याची गरज असलेल्या कामासाठी विदेशी व्यावसायिकांना अमेरिकेत आणण्याची परवानगी या व्हिसा अन्वये कंपन्यांना मिळते. अमेरिकेत काम करणाºया कंपन्या भारत आणि चीनमधून हजारो कर्मचाऱ्यांना या व्हिसाआधारे अमेरिकेत आणीत असतात. त्यामुळे अमेरिकेतील सिलिकॉन व्हॅली भारतीय तंत्रज्ञांनी व्यापलेली दिसून येते.ट्रम्प यांनी एप्रिलमध्ये एक आदेश काढून परदेशी नागरिकांना अमेरिकेत कामासाठी येण्यावर निर्बंध आणले होते. हा आदेश आता संपणार होता. त्याला ट्रम्प प्रशासनाने २०२०च्या अखेरपर्यंत मुदतवाढ दिली आहे. मुदतवाढ देताना काही अतिथी कामगार व्हिसांचाही त्यात समावेश केला आहे. एल-१, एच-१बी, एच-४, एच-२बी आणि जे-१ हे ते व्हिसा होत.अमेरिकेमधील बेरोजगारीचे प्रमाण घटत असले तरी आजही अनेक अमेरिकन हे नोकरीविना आहेत. त्यामुळे आपल्या तसेच पक्षाच्या विरोधामध्ये रोष वाढून त्याचा फटका निवडणुकीमध्ये बसू नये, यासाठी ट्रम्प प्रयत्नशील आहेत. मागील निवडणुकीमध्ये ट्रम्प यांनी ‘अमेरिकन फर्स्ट’ हा नारा देत निवडणूक लढविली होती.।५.२५ लाख नोकºया होणार मोकळ्याएच-१बी आणि इतर सर्व कामकाजी व्हिसा निलंबित केल्यामुळे अमेरिकेतील स्थानिक नागरिकांसाठी ५.२५ लाख रोजगार मोकळे होतील, असे व्हाइट हाउसने म्हटले आहे. ट्रम्प प्रशासनाच्या एका वरिष्ठ अधिकाºयाने सांगितले की, अमेरिकी नागरिक लवकरात लवकर कामावर परतावेत, यासाठी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प प्रयत्न करीत आहेत. त्यासाठी जास्तीत जास्त रोजगार उपलब्ध करून दिले जात आहेत.।ट्रम्प प्रशासनावर चौफेर टीकासर्व प्रकारचे कामकाजी व्हिसा निलंबित केल्याबद्दल अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनावर चौफेर टीका होत आहे. औद्योगिक क्षेत्र, खासदार आणि हक्क संघटना यांचा टीकाकारांत समावेश आहे. भारतीय वंशाचे काँग्रेस सदस्य राजा कृष्णमूर्ती यांनी म्हटले की, व्हिसा कार्यक्रम निलंबित केल्यामुळे आपली अर्थव्यवस्था कमजोर होईल. कोरोनासारख्या संकटाच्या काळात आरोग्यक्षेत्रातील श्रमशक्तीवर परिणाम होईल.यूएस चेम्बर्स आॅफ कॉमर्सचे सीईओ थॉमस डोनोह्यू यांनी म्हटले की, या निर्णयाने आपल्या देशाला कोणतीही मदत होणार नाही. उलट देश मागे खेचला जाईल.गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांनी म्हटले की, आजच्या आदेशाने मी निराश झालो आहे. आव्रजकांनी अमेरिकेच्या यशात मोठे योगदान दिलेले आहे.‘लीडरशिप कॉन्फरन्स आॅन सिव्हिल अ‍ॅण्ड ह्युमन राइट्स’च्या अध्यक्ष व सीईओ वनिता गुप्ता म्हटले की, आव्रजकांना लक्ष्य करणारा ट्रम्प यांचा आदेश काम करणार नाही. न्यायालयाकडून त्याला तात्काळ स्थगिती मिळेल.

टॅग्स :Americaअमेरिका