शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

CORONAVIRUS : CHINA-WHOची मिलीभगत, अमेरिकन खासदाराचा सनसनाटी आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2020 19:36 IST

स्कॉट यांनी आरोप केला आहे, की अमेरिकन फंडाचा वापर डब्ल्यूएचओ कम्युनिस्ट चीनच्या बचावासाठी करत आहे. एवढेच नाही, तर त्यांनी कोरोना व्हायरसचा सामना करण्यासंदर्भात डब्ल्यूएचओच्या भूमिकेचे अन्वेषण करण्याची मागणीही काँग्रेसकडे केली आहे.

ठळक मुद्देWHOची भूमिका तपासावी आवश्यकता असल्याचेही स्कॉट म्हणालेअमेरिकेने डब्ल्यूएचओच्या फंडात कपात करावी - स्कॉटयापूर्वी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनीही केला होता डब्ल्यूएचओवर आरोप

न्यूयॉर्क - कोरोना व्हायरसपुढे हतबल झालेल्या  अमेरिकेतून आता डब्ल्यूएचओविरोधात सूर यायला सुरुवात झाली आहे. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यानंतर आता रिपब्लिकन खासदार रिक स्कॉट यांनीही जागतीक आरोग्य संघटनेच्या (WHO) भूमिकेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. तसेच डब्ल्यूएचओला दिल्या जाणाऱ्या फंडात कपात करण्याची मागणी केली आहे. अमेरिका सुरुवातीपासूनच चीन आणि डब्ल्यूएचओवर व्हायरसशी संबंधित माहिती लपवत असल्याचे आरोप करत आहे. 

स्कॉट यांनी आरोप केला आहे, की अमेरिकन फंडाचा वापर डब्ल्यूएचओ कम्युनिस्ट चीनच्या बचावासाठी करत आहे. एवढेच नाही, तर त्यांनी कोरोना व्हायरसचा सामना करण्यासंदर्भात डब्ल्यूएचओच्या भूमिकेचे अन्वेषण करण्याची मागणीही काँग्रेसकडे केली आहे.

WHOची भूमिका तपासावी -रिक स्कॉट हे फ्लोरिडातील रिपब्लिकन सिनेटर आहेत. त्यांनी अमेरिकन काँग्रेसला आवाहन केले आहे, की कोरोना व्हायरसचा सामना करण्यासंदर्भात डब्ल्यूएचओच्या रिस्पॉन्सचे अन्वेषण व्हावे. एवढेच नाही, तर अमेरिकेने डब्ल्यूएचओला दिल्या जाणाऱ्या फंडिंगमधयेही कपात करावी. कारण डब्ल्यूएचओ कोरोना व्हायरससंदर्भात 'कम्युनिस्ट चीनचा बचाव करत आहे, असा सल्लाही स्कॉट यांनी दिला आहे. स्कॉट यांनी यापूर्वीही चीन आणि डब्ल्यूएचओच्या जवळीकतेवरून  चिंता व्यक्त केली होती. त्यांचा आरोप आहे, की चीनने तेथील मृत्यूदर कमी करून दाखवला आहे. 

खरी माहिती लपवत आहे WHOपॉलिटिको या संकेतस्थळानुसार, प्रत्येक देशाला आपल्या नागरिकांना सुरक्षित ठेवता यावे यासाठी, जन आरोग्याची माहिती जगाला देणे. हे डब्ल्यूएचओचे काम आहे. मात्र, कोरोना व्हायरससंदर्भात डब्ल्यूएचओ अयशस्वी ठरला, असे स्कॉट यांनी मंगळवारी म्हटले आहे.

जाणूनबुजून भ्रम निर्माण करत आहे डब्ल्यूएचओ - 

डब्ल्यूएचओ जाणूनबुजून भ्रम निर्माण करणारी माहिती पसरवत आहे. 'चीन आपल्या देशातील कोरोना बाधितांसंदर्भात खोटे बोलत आहे, हे आम्हाला माहिती आहे. तसेच डब्ल्यूएचओला चीनबद्दल संपूर्ण माहिती होती. मात्र तरीही त्याचा तपास करावा असे त्यांना वाटले नाही, असेही स्कॉट यांनी म्हटले आहे. 

ट्रम्प यांनीही केला होता आरोप -

याच पद्धतीने राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनीही व्हाईट हाऊसमधील एका पत्रकार परिषदेत डब्ल्यूएचओवर अशाच प्रकारचे आरोप केले होते. यावेळी डब्ल्यूएचओने कोरोनासंदर्भात माहिती लपवली. तसेच ते चीनची बाजू घेत चीनचाही बचाव करत आहे. याची कल्पना जगा दिली असती तर एवढे मृत्यू झाले नसते, असेही ट्रम्प यांनी म्हटले होते. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAmericaअमेरिकाDonald Trumpडोनाल्ड ट्रम्पchinaचीनUSअमेरिकाUnited Statesअमेरिका