शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

व्हेनेझुएलाच्या 'हुकुमशहा' राष्ट्राध्यक्षांवर अमेरिकेने घातले निर्बंध 

By sagar.sirsat | Updated: August 1, 2017 12:31 IST

अमेरिकेने व्हेनेझुएलाचे राष्ट्रपती निकोलस मादुरो हे हुकुमशहा असल्याचं सांगत त्यांच्यावर निर्बंध घातले आहेत. अमेरिकेने एखाद्या देशाच्या राष्ट्राध्यक्षांवर निर्बंध घातल्याची ही चौथी वेळ आहे. 

ठळक मुद्देव्हेनेझुएलाच्या संविधानात बदल करुन स्वतःला अनिर्बंध अधिकार प्राप्त करुन घेण्याच्या दृष्टीने निकोलस मादुरो यांनी रविवारी निवडणुका घेतल्या. रविवारी घेण्यात आलेल्या निवडणुकीदरम्यान व्हेनेझुएलात अनेक ठिकाणी हिंसाचाराच्या घटना घडल्या. हिंसाचारात 14 लोकांचा मृत्यू झाला तर जवळपास 400 जण जखमीट्रम्प सरकारने मादुरो यांना संविधानाचा सन्मान ठेवून स्वतंत्र आणि निष्पक्ष निवडणुका घेण्यास सांगितलं होतं पण त्यांनी याकडे पूर्णतः दुर्लक्ष केलं मादुरो यांनी या निवडणुकीला क्रांतीकारी बदलाचं पर्व असल्याचं म्हटलं होतं

वॉशिंग्टन, दि. 1 - अमेरिकेने व्हेनेझुएलाचे राष्ट्रपती निकोलस मादुरो हे हुकुमशहा असल्याचं सांगत त्यांच्यावर निर्बंध घातले आहेत. बेकायदेशीरपणे निवडणुका घेतल्याने अमेरिकेने त्यांच्यावर निर्बंध घातले. अमेरिकेने एखाद्या देशाच्या राष्ट्राध्यक्षांवर निर्बंध घातल्याची ही चौथी वेळ आहे. 

व्हेनेझुएलाच्या संविधानात बदल करुन स्वतःला अनिर्बंध अधिकार प्राप्त करुन घेण्याच्या दृष्टीने निकोलस मादुरो यांनी रविवारी निवडणुका घेतल्या. या निवडणुकांमुळेच निकोलस मादुरो यांच्यावर अमेरिकेने निर्बंध घातले आहेत. रविवारी घेण्यात आलेल्या निवडणुकीदरम्यान व्हेनेझुएलात अनेक ठिकाणी हिंसाचाराच्या घटना घडल्या. हिंसाचारात 14 लोकांचा मृत्यू झाला तर जवळपास 400 जण जखमी झाल्याचं वृत्त आहे. याशिवाय या निवडणुकांच्या विरोध प्रदर्शनात गेल्या चार महिन्यांमध्ये तब्बल 120 जणांचा मृत्यू झाल्याचं सांगितलं जात आहे. 

''रविवारी झालेल्या बेकायदेशीर निवडणुकांमुळे सिद्ध झालं की मादुरो हे  हुकुमशाहा आहे, ते व्हेनेझुएलाच्या जनतेच्या इच्छांची उपेक्षा करतात. त्यांच्यावर निर्बंध घालून त्यांच्या सरकार चालवण्याच्या कार्यपद्धतीला विरोध असल्याचं अमेरिकेने दाखवून दिलं. आमचा तेथील जनतेला पूर्णपणे पाठिंबा आहे, त्या जनतेला तेथे लोकशाही पुन्हा हवी आहे'' असं व्हाइट हाउसचे कोषागार सचिव स्टिव्हन म्नुचिन म्हणाले.     ट्रम्प सरकारने मादुरो यांना संविधानाचा सन्मान ठेवून स्वतंत्र आणि निष्पक्ष निवडणुका घेण्यास सांगितलं होतं पण त्यांनी याकडे पूर्णतः दुर्लक्ष केलं असं व्हाइट हाउसकडून घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत स्पष्ट करण्यात आलं. 

दुसरीकडे, अमेरिकेची ही कारवाई उन्मत्त आणि बेकायदेशीर असल्याचं निकोलस मादुरो यांनी म्हटलं आहे.

मादुरो यांनी या निवडणुकीला क्रांतीकारी बदलाचं पर्व असल्याचं म्हटलं होतं, पण विरोधी पक्षांनी या निवडणुकीला बेकायदेशीर असल्याचं म्हणत बहिष्कार टाकला.