शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

अमेरिका, रशियाचे अंतराळवीर रवाना; आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकाकडे आज पोहोचण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2024 15:11 IST

अंतराळवीर त्या स्थानकावर सहा महिने राहाणार आहेत. 

केप कार्निव्हल : अमेरिकेचे तीन व रशियाचा एक असे चार अंतराळवीर आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकाकडे रविवारी रवाना झाले असून ते मंगळवारी तिथे पोहोचतील, अशी शक्यता आहे. अंतराळवीर त्या स्थानकावर सहा महिने राहाणार आहेत. 

स्पेस एक्स या कंपनीच्या फाल्कन राॅकेटच्या साहाय्याने अवकाशयानाचे प्रक्षेपण केले. अमेरिकेच्या नासा या अवकाश संशोधन संस्थेचे मॅथ्यू डॉमिनिक, मायकेल बॅरट, महिला अंतराळवीर जीनेट एप्स, रशियाचा अंतराळवीर अलेक्झांडर ग्रेबेंकिन हे चौघे अंतराळवीर आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकावर जाईल. या स्थानकावर अमेरिका, डेन्मार्क, जपान, रशिया या चार देशांचे अंतराळवीर कार्यरत असून त्यांना अवकाशयानातून पृथ्वीवर परत आणले जाईल.

जीनेट एप्स दुसऱ्या कृष्णवर्णीय अंतराळवीर -आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकावर दाखल होणारी जीनेट एप्स या दुसरी कृष्णवर्णीय महिला आहेत. याआधी मे कॅरोल जेमिन्सन या कृष्णवर्णीय अंतराळवीर आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकावर १९९२ साली दाखल झाल्या होत्या. जीनेट एप्स यांनी अंतराळवीर बनण्याआधी फोर्ड मोटर कंपनी व सीआयएमध्ये इंजिनिअर म्हणून काम केले होते. मी कृष्णवर्णीय मुलींसाठी रोल मॉडेल असल्याचा मला अभिमान वाटतो, असे जीनेट यांनी सांगितले. २००९ साली त्या अंतराळवीर बनल्या. २०१८ साली रशियाच्या अवकाशयानातून त्या आंतरराष्ट्रीय अवकाश केंद्रावर जाणार होत्या, पण त्यांच्याऐवजी दुसऱ्या व्यक्तीस पाठविण्यात आले. त्यावेळी जीनेट यांना का वगळले याची कारणे कधीही जाहीर करण्यात आली नाहीत.

 वेगवान वारे वाहत असल्याने नासाच्या अवकाशयानाचे प्रक्षेपण तीन दिवस पुढे ढकलण्यात आले होते. अवकाश केंद्रावर दोन रॉकेटशीप पुढच्या सहा महिन्यांत येण्याची शक्यता आहे. नवीन स्टारलाइनर कॅप्सूल एप्रिलच्या या स्थानकावर येणार आहे. सिएरा स्पेसचे एक मिनी शटलही तिथे दाखल होण्याची शक्यता आहे. या दोन अवकाशयानांद्वारे आंतरराष्ट्रीय अवकाश केंद्रावर लागणारी उपकरणे तिथे नेली जातील.

टॅग्स :Americaअमेरिकाrussiaरशिया