शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
3
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
4
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
5
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
6
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
7
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
8
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
9
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
10
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
11
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
12
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
13
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
14
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
15
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
16
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
17
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
18
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
19
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
20
Asha Bhosle: "...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
Daily Top 2Weekly Top 5

अध्यक्षपदाची निवडणूक : अमेरिकेतील फक्त २२ टक्के भारतीयच देणार ट्रम्प यांना मते

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2020 07:28 IST

Donald Trump News : भारत-अमेरिकेतील संबंध सध्या अधिक घनिष्ठ झाले आहेत. मात्र, या मुद्द्याने प्रभावित होऊन भारतीय वंशीय ट्रम्प यांना भरघोस मतदान करण्याची शक्यता नाही, असेही या पाहणीत म्हटले आहे.

वॉशिंग्टन : अमेरिकेतील भारतीय वंशीयांंपैकी ४८ टक्के जणांचा पंतप्रधान मोदी यांना पाठिंबा आहे. मात्र, त्यातील २२ टक्के लोकच राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत ‘अमेरिकी मोदी’ असे संबोधल्या जाणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना मतदान करणार आहेत.अमेरिकेत एका पाहणीत हा निष्कर्ष आला आहे. त्या देशातील ३२ टक्के भारतीय वंशीयांचा मोदी यांना विरोध आहे, तर २० टक्के जणांनी मत व्यक्त करण्यास नकार दिला. निवडणुकीत डेमोक्रॅटिक उमेदवार ज्यो बायडन यांना ७२ टक्के भारतीय वंशीय मतदान करणार आहेत.भारत-अमेरिकेतील संबंध सध्या अधिक घनिष्ठ झाले आहेत.  मात्र, या मुद्द्याने प्रभावित होऊन भारतीय वंशीय ट्रम्प यांना भरघोस मतदान करण्याची शक्यता नाही, असेही या पाहणीत म्हटले आहे. लोकसंख्येत भारतीयांचे प्रमाण १ टक्का आहे. त्यातही मतदार असलेले १ टक्क्याहून कमी आहेत.

यंदा निकालाची प्रक्रिया लांबणार; अमेरिकी अध्यक्षपदाची निवडणूक वॉशिंग्टन : अमेरिकेच्या अध्यक्षपदी डेमोक्रॅटिक पक्षाचे ज्यो बायडन विराजमान होणार की, अमेरिकी मतदार पुन्हा रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार व विद्यमान अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनाच पसंती देणार, हे समजण्यासाठी यंदा मोठी प्रतीक्षा करावी लागणार आहे. येत्या मंगळवारी, ३ नोव्हेंबर रोजी प्रत्यक्ष मतदानाचा दिवस आहे; परंतु यंदा मतमोजणी लांबणार असून कदाचित दोन आठवड्यांपर्यंत ही प्रक्रिया सुरू राहण्याची शक्यता आहे. अध्यक्षीय निवडणूक असली तरी कोरोनाने विश्रांती घेतली आहे, असे अजिबात नाही. उलटपक्षी अमेरिकेत पुन्हा नव्याने कोरोनाग्रस्तांच्या संख्येत वाढ होऊ लागली आहे.  

कोरोना कहराच्या पार्श्वभूमीवर राज्यांनी आपापल्या नागरिकांना पोस्टाने मतपत्रिका (मेल इन बॅॅलेट्स) पाठविण्याचे आवाहन केले आहे किंवा मग विहित मुदतीच्या आधी मतदान (अर्ली वोटिंग) करण्याचा आग्रह केला आहे. त्यानुसार आतापर्यंत साडेसहा कोटी मतदारांनी वरील पद्धतीने मतदान केले आहे.  त्याला काही कारणे आहेत. प्रत्येक राज्यासाठी वेगवेगळे नियम आहेत. त्यामुळे काही राज्यांमध्ये अर्ली वोटिंग किंवा मेल-इन बॅलेट्स यांची मोजणी आधी होऊ शकते. तर काही राज्ये मतमोजणीची प्रक्रिया प्रत्यक्ष मतदानानंतरच करावी, असा आग्रह धरू शकतात. त्यामुळे मतमोजणीसाठी वेळ लागू शकतो. निकाल कधी लागेल? तूर्तास याचे ठोस उत्तर देणे कठीण असले तरी साधारणत: दोन आठवड्यांपर्यंत मतमोजणी चालू शकेल आणि त्यानंतरच विजयी उमेदवाराची घोषणा होईल. अध्यक्षपदी निवड झालेल्या उमेदवाराचा शपथविधी नव्या वर्षात २० जानेवारी रोजी होईल.  

टॅग्स :US ElectionAmerica ElectionDonald Trumpडोनाल्ड ट्रम्पIndiaभारत