शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

US Presidential Election 2024: डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा झटका! अध्यक्षपदाची निवडणूक लढवता येणार नाही; कोर्टाने अपात्र घोषित केले

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2023 08:17 IST

US Presidential Election 2024 : अमेरिकेचे माजी राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा झटका बसला आहे.

US Presidential Election 2024 (Marathi News): अमेरिकेचे माजी राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांना कोर्टाने झटका दिला आहे. कोलोरॅडोच्या सर्वोच्च न्यायालयाने त्यांना २०२४ च्या अमेरिकन अध्यक्षीय निवडणुकीसाठी अपात्र घोषित केले आहे. कोलोरॅडो न्यायालयाने मंगळवारी ६ जानेवारी २०२१ रोजी झालेल्या कॅपिटल हिंसाचार प्रकरणात ट्रम्प यांना अपात्र ठरवले आहे.

न्यायालयाच्या निर्णयामुळे ट्रम्प हे अमेरिकेच्या इतिहासातील पहिले अध्यक्षीय उमेदवार आहेत ज्यांना यूएस घटनेच्या क्वचितच वापरल्या जाणार्‍या तरतुदीनुसार व्हाईट हाऊससाठी अपात्र ठरवण्यात आले आहे. यूएस राज्यघटनेची ती तरतूद "बंड किंवा बंडखोरी" मध्ये सहभागी असलेल्या कोणत्याही अधिकाऱ्याला राष्ट्राध्यक्ष पद धारण करण्यापासून प्रतिबंधित करते. यूएस राज्यघटनेच्या १४ व्या दुरुस्तीच्या कलम ३ अंतर्गत त्यांना अपात्र ठरवण्यात आले आहे.

कोरोनाचा नवा सबव्हेरिएंट JN 1 किती धोकादायक?; WHO नं जारी केली अ‍ॅडव्हायजरी

कोलोरॅडो सुप्रीम कोर्टाने असा निष्कर्ष काढला की, यूएस राज्यघटनेच्या तरतुदींनुसार यूएस सरकारच्या विरोधात कॅपिटल हिल हिंसाचार भडकावण्याच्या भूमिकेमुळे ट्रम्प यांना २०२४ च्या अध्यक्षीय निवडणुकीसाठी अपात्र ठरवले जाऊ शकते. या पदासाठी रिपब्लिकन पक्षाच्या उमेदवारांमध्ये ट्रम्प हे आघाडीवर होते. 

मात्र, सर्वोच्च न्यायालयाने आपल्या निर्णयाची अंमलबजावणी ४ जानेवारीपर्यंत थांबवली आहे. यामुळे ट्रम्प या निर्णयाविरोधात आणखी अपील करू शकतात. मिनेसोटा आणि मिशिगनच्या न्यायालयांनी अध्यक्षीय निवडणुकीत ट्रम्प यांच्या नियुक्तीला आव्हान देणारे असेच खटले नाकारले आहेत, परंतु या मुद्द्यावर अनेक राज्यांमध्ये खटले सुरू आहेत.

टॅग्स :Donald Trumpडोनाल्ड ट्रम्पAmericaअमेरिकाCourtन्यायालय