शहरं
Join us  
Trending Stories
1
विजय रुपाणींचा विमानात बसलेला फोटो समोर आला; पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादकडे रवाना 
2
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत २० मेडिकल विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती
3
Ahmedabad Plane Crash: अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर्सची यादी आली समोर; दोन मराठी नावांचा समावेश
4
अहमदाबाद विमान अपघात : मृतांच्या कुटुंबियांना किती पैसे मिळतील? जाणून घ्या कायदा काय सांगतो!
5
Plane Crash Incident: पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले
6
Air India Plane Crash: विमानातून प्रवास करणारे कोण? भारतीय आणि परदेशी नागरिक किती होते?
7
मेडिकल कॉलेजचे डॉक्टर मेसमध्ये जेवण करत होते, तेवढ्यात...; २० इंटर्न डॉक्टरांच्या मृत्यूची भीती व्यक्त
8
जोरदार आवाज, सगळीकडे धूर अन् समोर मृतदेहांचा खच; प्रत्यक्षदर्शींनी विमान अपघातावेळी काय पाहिलं?
9
Ahmedabad Plane Crash: विमान दुर्घटनेमुळे सलमान खानने घेतला मोठा निर्णय, म्हणाला-
10
Ahmedabad Plane Crash: ११ वर्षे जुने बोईंग विमान, ७००० किमी प्रवास करणार होते; अपघातग्रस्त विमानाबद्दल सर्व काही जाणून घ्या
11
सेन्सेक्स-निफ्टी आपटले! टाटा ग्रुपला सर्वात मोठा धक्का; 'या' कारणांमुळे बाजार गडगडला
12
Ahmedabad Plane Crash Live Updates: "हे दुःख शब्दांत सांगता येणार नाही", एअर इंडिया विमान अपघातावर मोदींची प्रतिक्रिया
13
पुढे की मागे...? कुठे असतो विमानाचा इंधन टँक? क्रॅश झाल्यास या ठिकाणी बसलेल्या लोकांना पोहोचू शकतो सर्वाधिक धोका
14
मोठी अपडेट! एअर इंडियाचे विमान डॉक्टरांच्या हॉस्टेलवर कोसळले; पूर्ण इमारत जळून खाक
15
Ahmedabad Plane Crash: गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
16
एअर इंडियाचं विमान कोसळलं! लंडनच्या प्रवासाचं तिकीट किती होतं? आकडा वाचून धक्का बसेल
17
अहमदाबाद विमान अपघात: प्रवाशांची यादी आली, गुजरातचे माजी CM विजय रुपाणी यांचेही नाव
18
Sonam Raghuvanshi : "मी थकले आहे, राजाला मार, नाहीतर मी मरेन..."; बॉयफ्रेंड राजनेच केली सोनमची पोलखोल
19
Aeroplane Black Box : विमान अपघातानंतर सर्वात आधी शोधला जातो 'ब्लॅक बॉक्स'; नेमकं काय असतं याचं काम?
20
Plane Crash: टेकऑफनंतर अवघ्या २ मिनिटांनी Air India चं विमान क्रॅश; नेमका कसा झाला अपघात?

ज्यो बायडन यांचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह, जी-२० संमेलनासाठी भारतात येणार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2023 08:26 IST

व्हाईट हाऊसच्या प्रवक्त्याने ज्यो बायडन यांच्या भेटीला दुजोरा दिला आहे. 

भारतात नवी दिल्ली येथे आयोजित जी-२० शिखर संमेलनासाठी जगभरातील दिग्गज नेते येणार आहेत. या जी-२० संमेलनात सहभागी होण्यासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडन भारतात येणार आहेत. दरम्यान, कोरोनाचा रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतर ज्यो बायडन यांच्या भेटीची पुष्टी झाली आहे. व्हाईट हाऊसच्या प्रवक्त्याने ज्यो बायडन यांच्या भेटीला दुजोरा दिला आहे. 

व्हाईट हाऊसने दिलेल्या माहितीनुसार, जी-२० संमेलनात सहभागी होण्यासाठी ज्यो बायडन गुरुवारी भारताला भेट देणार आहेत. यावेळी ज्यो बायडन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची बैठक असणार आहेत. ज्यो बायडन शनिवार आणि रविवारी जी-२० शिखर संमेलनाच्या अधिकृत सत्राला उपस्थित राहतील. दरम्यान, ज्यो बायडन यांच्या पत्नीला कोरोना व्हायरसची लागण झाली होती. त्यामुळे सोमवारी रात्री ज्यो बायडन यांचीही कोरोना टेस्ट करण्यात आली होती. त्यांच्या या टेस्टचा रिपोर्ट निगेटिव्ह आला. 

व्हाईट हाऊसच्या प्रेस सेक्रेटरी करीन जीन पियरे यांनी सांगितले की, त्यांच्या रिपोर्टमध्ये कोरोनाची कोणतीही लक्षणे दिसून आली नाहीत. दरम्यान, ज्यो बायडन यांच्या पत्नीची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. प्रवक्त्याने सांगितले की, अमेरिकेची फर्स्ट लेडी जिल बायडन यांची सोमवारी कोरोना टेस्ट करण्यात आली. ही टेस्ट पॉझिटिव्ह आली होती. मात्र वर्तमानकाळात त्यांच्यामध्ये केवळ सौम्य लक्षणे दिसत आहेत.

दरम्यान, ६ तारखेला ज्यो बायडन भारतात पोहोचणार आहेत.त्यांच्या येण्याआधी हवाई सुरक्षेसोबतच जमिनीच्या सुरक्षेसाठीही पूर्ण तयारी करण्यात आली आहे. ज्यो बायडन एअरफोर्स-वनमधून भारतात येणार आहेत. यासाठी तयारी करण्यात आली आहे, हे एअर फोर्स-वन ४ हजार स्क्वेअर फूट आहे आणि ते तीन मजली एअरक्राफ्ट आहे. त्याच्या सेन्सर्सवर सतत लक्ष ठेवले जाते.

चीनचे राष्ट्राध्यक्ष येणार नाहीतचीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग जी-२० शिखर संमेलनाला उपस्थित राहणार नाहीत. मात्र जी-२० मध्येच नाही तर भविष्यात अनेक मोठ्या आंतरराष्ट्रीय मंचांवरून शी जिनपिंग गायब होणार आहेत. सर्वत्र शी जिनपिंग आपल्या जागी त्यांचा एक प्रतिनिधी पाठवत आहेत. त्यामुळे अशा परिस्थितीत शी जिनपिंग यांना मोठ्या आंतरराष्ट्रीय मंचांवर का तोंड लपवावे लागत आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

टॅग्स :Joe Bidenज्यो बायडनcorona virusकोरोना वायरस बातम्याAmericaअमेरिका