शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बायडन अडचणीत, व्यसनी मुलाचे अश्लील फोटो झाले व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2023 15:59 IST

US President Joe Biden: जगातील सर्वात शक्तिशाली समजले जाणारे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन हे त्यांच्या मुलामुळे अडचणीत आले आहेत. जो बायडन यांचा मुलगा हंटर बायडन याच्या लॅपटॉपमधून सुमारे ९ हजार फोटो मिळवून मार्को पोलो या उजव्या संघटनेने ते व्हायरल केले आहेत.

जगातील सर्वात शक्तिशाली समजले जाणारे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन हे त्यांच्या मुलामुळे अडचणीत आले आहेत. जो बायडन यांचा मुलगा हंटर बायडन याच्या लॅपटॉपमधून सुमारे ९ हजार फोटो मिळवून मार्को पोलो या उजव्या संघटनेने ते व्हायरल केले आहेत. या फोटोंमध्ये हंटर बायडन ड्रग्स घेताना, वेश्यांसोबत नग्न होऊन मस्ती करताना आणि कुटुंबीयांसोबतचे फोटो आहेत. या संघटनेने बायडन लॅपटॉप मीडियाय.कॉमवर ८८६४ फोटो शेअर केले आहेत. हे फोटो हंटर बायडन याच्या लॅपटॉपमधून मिळवण्यात आले आहेत. त्यामध्ये अश्लील फोटोंबरोबरच हंटरचे त्याच्या वडिलांसोबत आणि कुटुंबातील इतर सदस्यांसोबतचे फोटो आहेत.

ब्रिटनमधील डेली  मेल या वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार हे सर्व फोटो २००८ ते २०१९ या दरम्यानचे आहेत. ते हवाई, काबो सान लुकास, कोसोवो, चीन, लंडन, पॅरिस, रोम आणि जगभरातील इतर ठिकाणी काढण्यात आलेले आहेत. यातील ७ हजार ३२ फोटो हे हंटर बायडन यांच्या मॅकबूक फ्रो आयफोन अॅपमधून घेण्यात आले आहेत. त्याशिवाय त्यामध्ये हंटर बायडन यांच्या आयफोन एक्सएसच्या बॅकअपमधून १८३२ फोटो, ४२८ लाईव्ह फोटो, टेक्स मेसेजमध्ये पाठवलेले ६७४ फोटो ५७९ स्क्रीनशॉट, ४० व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून पाठवलेले फोटो आणि १११ इतर फोटोंचा समावेश आहे. 

हंटर बायडेन यांचे हे फोटो व्हायरल झाल्याने जो बायडन यांना मोठा धक्का बसू शकतो. मार्को पोलोची स्थापना अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ट ट्रम्प यांच्या कार्यकाळादरम्यान, व्हाईट हाऊसमधील एक कर्मचारी असलेल्या गॅरेट गिग्लर यांनी केली होती. मार्को पोलो स्वत:ची ओळख भ्रष्टाचार आणि ब्लॅकमेलला उघड करणारी एक संस्था अशी करून देते.

हे फोटो पब्लिश केल्यानंतर जिग्लर यांनी सांगितले की, जर अमेरिकन लोकांना त्यांची फर्स्ट फॅमिली कशी आहे हे जाणून घ्यायचं असेल तर ते या माध्यमातून जाणून घेता येईल. आम्ही असे फोटो समोर आणत नाही आहोत ज्यामुळे बायडेन कुटुंबाची प्रतिष्ठा वाढेल. दरम्यान, जिग्लर यांनी सांगितले की, सर्व फोटोमध्ये प्रायव्हेट पार्ट ब्लर करण्यास सुमारे दोन महिन्यांचा अवधी लागला.  

टॅग्स :Joe Bidenज्यो बायडनUnited Statesअमेरिका