शहरं
Join us  
Trending Stories
1
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
2
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
3
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
4
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
5
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
6
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
7
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
8
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
9
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
10
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
11
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
12
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
13
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
14
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
15
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
16
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
17
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
18
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
19
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?

आक्षेपार्ह फोटो, टॅक्स चोरी, नशा अन्...मुलामुळे राष्ट्राध्यक्ष US जो बायडन अडचणीत?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2023 18:15 IST

अमेरिकेच्या संसदेने राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्याविरुद्ध महाभियोग चौकशीला मंजुरी दिली.

joe biden america: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन, यांचा मुलगा हंटर बायडन पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. बुधवारी अमेरिकेच्या संसदेने राष्ट्राध्यक्ष बायडेन यांच्याविरुद्ध महाभियोग चौकशीला मंजुरी दिली. मीडिया रिपोर्ट्सनुसार, मुलामुळेच राष्ट्राध्यक्ष बायडेन अडचणीत आले आहेत. 53 वर्षीय हंटर बायडेनचा वादाशी जुना संबंध आहे. सध्या तो ड्रग्ज घेणे आणि करचुकवेगिरीच्या आरोपांमुळे चर्चेत आहे. 

अंमली पदार्थ आणि आलिशान आयुष्य जगण्याचा शौकीन असलेल्या हंटरने जूनमध्ये आपल्याजवळ बेकायदेशीर शस्त्रे असल्याची कबुली दिली होती. घटस्फोटानंतर त्याची पत्नी कॅथरीननेही त्याच्याविरोधात अनेक खुलासे केले, ज्यामुळे परिस्थिती आणखीनच बिकट झाली. हंटर ड्रग्ज, अल्कोहोल आणि स्ट्रिप क्लबवर इतका पैसा खर्च करायचा की, त्याच्याकडे गरजा पूर्ण करण्यासाठी पैसेच उरले नसल्याचा आरोप कॅथरीनने केला होता. अंमली पदार्थांच्या अतिसेवनामुळे त्याला पुनर्वसन केंद्रात पाठवण्यात आले होते.

भावाच्या मृत्यूमळे नशेच्या आहारीअमेरिकन मीडिया रिपोर्ट्सनुसार, हंटरचा मोठा भाऊ ब्यू बायडेनचा 2015 मध्ये कर्करोगाने मृत्यू झाला होता. भावाच्या मृत्यूमुळे हंटर इतका इतका दुःखात बुडाला की, तो दिवसभर दारुच्या नशेत राहू लागला. हळुहळू तो ड्रग्सच्या आहारी गेला. नंतर त्याने अंमली पदार्थांच्या सवयीतून बाहेर पडण्यासाठी पेटिंग काढण्यास सुरुवात केली. मात्र यावरुनही वाद सुरू झाला. काही लोकांनी त्याची चित्रे कोट्यावधींना विकत घेतल्यावर विरोधकांनी प्रश्न उपस्थित केले.

व्यक्ती एक अन् वाद अनेकहंटरचे नाव अनेक वादाशी जोडले गेले आहे. 2013 मध्ये तो यूएस नेव्ही रिझर्व्हमध्ये सामील झाला, परंतु पहिल्याच दिवशी कोकेन घेताना पकडला गेला. यानंतर त्याला सैन्यातून हाकलून दिले. 2019 मध्ये डीएनए अहवालातून समोर आले होते की, तो अर्कान्सस नावाच्या मुलाचा जैविक पिता(बायलॉजिकल फादर) आहे. याशिवाय, 2020 मध्ये त्याच्या लॅपटॉपमधून आक्षेपार्ह फोटोही व्हायरल झाली होती. हंटरवर चीनी इक्विटी कंपनी बीएचआर आणि युक्रेनची ऊर्जा कंपनी बुरिस्मा होल्डिंग, यांच्याकडून बेकायदेशीरपणे पैसे घेतल्याचाही आरोप होता. 

टॅग्स :Joe Bidenज्यो बायडनAmericaअमेरिकाInternationalआंतरराष्ट्रीय