शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

शपथविधी सोहळ्याआधी डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतली मुकेश अंबानी-नीता अंबानी यांची भेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2025 19:46 IST

या कार्यक्रमात उद्योगजगतातील अनेक मंडळींनी हजेरी लावली होती.

Donald Trump Meets Mukesh Ambani And Nita Ambani Before Swearing Ceremony : अमेरिकेचे नवनियुक्त राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शपथविधी सोहळ्याआधी भारताचे प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी आणि त्यांची पत्नी नीता अंबानी यांची भेट घेतली.  ट्रम्प यांच्या शपथविधी समारंभ कार्यक्रमा आधी वॉशिंग्टन डीसी येथे खास डिनरचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात उद्योगजगतातील अनेक मंडळींनी हजेरी लावली होती. यात भारतीय पॉवर कपल मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांचाही समावेश होता. वॉशिंग्टनमध्ये आयोजित खाजगी स्वागत समारंभात मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांनी नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे अभिनंदन केले.

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

प्रसारमाध्यमातील वृत्तानुसार, रिलायन्स इंडस्ट्रीज (Reliance Industries) चे अध्यक्ष मुकेश अंबानी आणि रिलायन्स फाउंडेशनच्या अध्यक्षा आणि संस्थापक  नीता अंबानी शपथविधी कार्यक्रमातील मुख्य अतिथीपैकी एक असू शकतात. अमेरिकेचे नवनियुक्त राष्ट्राध्यक्ष आणि भारतीय उद्योगक्षेत्रातील आघाडीचे नाव असलेल्या अंबानी यांच्यात  डिनर भेटी वेळी नेमकी कोणत्या विषयावर चर्चा झाली ते गुलदस्त्यातच आहे. पण ही भेट भारत-अमेरिका यांच्यातील आर्थिक धोरणासंदर्भातील एक सकारात्मक पाऊल मानलं जात आहे. 

मुकेश आणि नीता अंबानी १८ जानेवारी रोजी अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टन डीसीमध्ये पोहोचले. डोनाल्ड ट्रम्प यांच्या शपथविधी समारंभासाठी वेगवेगळ्या क्षेत्रातील मंडळींना निमंत्रण देण्यात आले आहे. विशेष म्हणजे गेल्या वर्षी मुकेश अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानी यांच्या रॉयल लग्न सोहळ्यात जगभरातील अनेक सेलिब्रिटी आणि लोकप्रिय व्यक्तींनी हजेरी लावली होती. त्यात ट्रम्प यांची मुलगी इवांका ट्रम्प यांचीही झलक पाहायला मिळाली होती. त्यानंतर ट्रम्प यांच्या शपथविधीच्या खास सोहळ्यासाठी अंबानींची उपस्थिती लक्षवेधी ठरताना दिसत आहे.

ट्रम्प अमेरिकेचे ४७ वे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेणार आहेत. शपथविधी सोहळ्यासाठी टेस्लाचे सीईओ एलोन मस्क, मेटा प्रमुख मार्क झुकरबर्ग आणि अ‍ॅमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस यांच्यासह अनेक प्रमुख पाहुणे उपस्थित राहतील. परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर, इटलीचे पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी आणि हंगेरीचे नेते व्हिक्टर ऑर्बन आणि इतर नेतेही या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.

टॅग्स :Donald Trumpडोनाल्ड ट्रम्पMukesh Ambaniमुकेश अंबानीnita ambaniनीता अंबानीAmericaअमेरिकाUSअमेरिका