शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

H-1B Visa प्रक्रियेत अमेरिका करणार बदल; लॉटरी सिस्टम ऐवजी नव्या पद्धतीची होणार सुरूवात

By जयदीप दाभोळकर | Updated: January 8, 2021 12:46 IST

८ जानेवारी रोजी यासंदर्भातील अंतिम निर्णय फेडरल रजिस्टरमध्ये प्रकाशित होणार, ६० दिवसांमध्ये नियम होणार लागू

ठळक मुद्देH-1B साठी अर्ज करण्याचा पुढील टप्पा १ एप्रिल पासून सुरू होणारफेडरल रजिस्टरमध्ये प्रकाशित झाल्यानंतर ६० दिवसांमध्ये लागू होणार नियम

H-1B व्हिसा प्रक्रियेच्या निवड प्रक्रियेत बदल करणार असल्याची घोषणा अमेरिकेनं गुरूवारी केली. यामध्ये सद्यस्थितीत सुरू असलेल्या लॉटरी सिस्टम ऐवजी वेतन आणि कौशल्याला प्राधान्य दिलं जाणार असल्याचं सांगण्यात आलं. यासंदर्भातील अंतिम नियम ८ जानेवारी रोजी फेडरल रजिस्टरमध्ये प्रकाशित करण्यात येणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांकडून देण्यात आली. अमेरिकेतील कामगारांच्या आर्थिक हितांचं रक्षण करणं हा यामागील उद्देश आहे. तसंच तात्पुरत्या रोजगार कार्यक्रमाद्वारे परदेशी कामगारांना उच्च कार्यक्षमतेचा फायदा होईल हेदेखील सुनिश्चित करणं हा उद्देश असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितलं.  H-1B व्हिसा हा अशाप्रकारचा व्हिसा आहे जो अमेरिकन कंपन्यांना परदेशी कर्मचार्‍यांना विशिष्ट पदांवर ठेवण्याची परवानगी देतो. अमेरिकेतील माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्या या व्हिसाच्या आधारे दरवर्षी हजारो भारतीय आणि चिनी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करतात. एचवन बी व्हिसाच्या नियमांमधील बदलांमुळे उच्च वेतन आणि उच्च पदांवर अर्ज करण्यास प्रोत्साहन मिळणार असल्याचंही यावेळी सांगण्यात आलं. तसंच कंपन्यांना आपल्या आवश्यकतेनुसार कर्मचाऱ्यांना कामावर ठेवणं आणि स्वत:ला जागतिक पातळीवर स्पर्धक म्हणून कायम ठेवण्याचा मार्गही मोठा होणार असल्याचं म्हटलं जात आहे. यासंदर्भातील अंतिम नियम हे फेडरल रजिस्टरमध्ये प्रकाशित झाल्यानंतर ६० दिवसांमध्ये लागू होणार आहेत. H-1B व्हिसासाठी अर्ज करण्याचा पुढील टप्पा १ एप्रिलपासून सुरू करण्यात येणार आहे. "H-1B व्हिसा योजनेचा काही कंपन्या गैरवापर करत आहेत. ते प्रामुख्यानं सुरूवाची पदं भरणं आणि आपला खर्च कमी करण्यासाठी याचा वापर करत आहेत," अशी माहिती USCIS चे उपसंचालक (धोरणे) जोसेफ एडलो यांनी दिली.

टॅग्स :AmericaअमेरिकाVisaव्हिसाjobनोकरी