शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
4
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
5
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
6
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
7
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
8
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
9
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
10
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

दक्षिण चीन समुद्रात अमेरिकेने दाखवली लष्करी ताकद; चीनच्या धमकीची उडवली खिल्ली

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2020 10:09 IST

लष्करी ताकद दाखवण्यासाठी अमेरिकेने दक्षिण चीन समुद्रात त्यांचे सैन्य मोठ्या संख्येने पाठवले आहे

बीजिंग – भारत चीन यांच्यातील सीमावादाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेने चीनला ताकद दाखवली आहे. दक्षिण चीन समुद्रात अमेरिका सैन्याकडून युद्धाभ्यास करुन जोरदार प्रदर्शन करत आहे. सोमवारी अमेरिकेच्या ११ हायटेक फायटर जेटने परमाणु हत्यारांसह दक्षिण चीन समुद्रात उड्डाण घेतलं. दक्षिण चीन हा परिसर आहे ज्याठिकाणी जपानसोबत चीनचा सीमावाद सुरु आहे.

त्यामुळे चवताळलेल्या चीनने अमेरिकेवर आरोप केला आहे की, आपली लष्करी ताकद दाखवण्यासाठी अमेरिकेने दक्षिण चीन समुद्रात त्यांचे सैन्य मोठ्या संख्येने पाठवले आहे. विवादित क्षेत्रात आपली लष्करी ताकद दाखवण्यासाठी अमेरिका हे मुद्दामहून करत आहे असं चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते झाओ लिजियान यांनी  पत्रकारांना सांगितले. अमेरिकेच्या संरक्षण मंत्रालयाने गुआममध्ये अण्वस्त्र आणणारी पेंटॅगॉनच्या बी -५२ एच बॉम्बसाठा विमानाने तैनात करुन आणि युद्धाभ्यास करून चीनला आपली शक्ती दाखवत आहे.

चीनचे मिडीया ग्लोबल टाईम्सने अमेरिकेला धमकी दिली होती की, चीनचे सैन्य किलर क्षेपणास्त्र डोंगफेंग -21 आणि डोंगफेंग -25 अमेरिकन विमान वाहकांचा नाश करू शकतात. ग्लोबल टाईम्सने म्हटले आहे की, दक्षिण चीन समुद्रात तैनात केलेले अमेरिकन विमान वाहक चिनी सैन्याच्या अधीन आहेत. चिनी सैन्य त्यांचा नाश करू शकतो. त्यावर अमेरिकन नौदलाने चीनला उत्तर दिलं आहे. तरीही आम्ही त्याच भागात तैनात राहणार आहोत, आमची दोन विमान वाहक अद्याप दक्षिण चीन समुद्राच्या आंतरराष्ट्रीय पाण्यामध्ये उभी आहेत. यूएसएस निमित्झ आणि यूएसएस रोनाल्ड रेगन आपल्याला घाबरत नाहीत असा टोला लगावला आहे. हा तोच सागरी भाग आहे ज्याठिकाणी चीन नेहमी आपल्या वर्चस्वाचा दावा करत असतो.

अमेरिकेने असे म्हटले आहे की, त्यांच्या युद्धाभ्यासाचा हेतू या प्रदेशातील प्रत्येक देशाला उड्डाण करणारे हवाई परिवहन, समुद्री क्षेत्रामधून जाणे आणि आंतरराष्ट्रीय कायद्यांनुसार कार्य करण्यास मदत करणे हा आहे. तर चीन या भागाला आपली संपत्ती म्हणतो. दक्षिण चीन समुद्रातील वादग्रस्त पार्सल बेटांवर चीन लष्करी सराव करीत आहे. या बेटावरुन चीन आणि व्हिएतनाम यांच्यात वाद सुरु आहे. बीजिंग जवळपास संपूर्ण दक्षिण चीन सागरावर आपला दावा करतो, चीनच्या या दाव्याला व्हिएतनाम आणि फिलिपींससह अन्य देश विरोध करतात.

टॅग्स :chinaचीनAmericaअमेरिका