तेहरान - अमेरिका आणि इस्रायलनं २८ फेब्रुवारी २०२६ ला इराणवर केलेल्या हवाई हल्ल्यात सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांचा मृत्यू झाला होता. या हल्ल्यात त्यांचा मुलगा आणि सध्याचे सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई हेदेखील गंभीर जखमी झाले होते. या हल्ल्यानंतर पहिल्यांदाच मोजतबा यांच्याबाबत नवा खुलासा समोर आला आहे. हल्ल्यामुळे मोजतबा यांचा चेहरा पूर्णपणे जखमी झाला आहे आणि त्यांच्या पायालाही गंभीर दुखापत झाल्याने पाय कापण्यात आला आहे असं न्यूज एजन्सी रॉयटर्सने सूत्रांच्या हवाल्याने रिपोर्ट दिला आहे.
गुप्त माहितीनुसार, मोजतबा यांनी आपला एक पाय गमावला आहे. त्यांच्या चेहऱ्यावर खोल जखमा आहेत. त्यामुळेच ८ मार्चच्या त्यांच्या नियुक्तीनंतर एकही फोटो अथवा व्हिडिओ सार्वजनिक करण्यात आला नाही. परंतु या परिस्थितीतही ते मानसिकदृष्ट्या खचले नाहीत. ते वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत ऑडिओ, व्हिडिओ कॉन्फरन्सने सतत बैठका घेत असतात. इस्लामाबादमधील शांतता चर्चेबाबतही मोजतबा यांनीच निर्णय घेतला. इराणी माध्यमातही धाडसी नेते म्हणून त्यांचे कौतुक होत आहे.
तर अयातुल्ला अली खामेनेई यांच्याप्रमाणे मोजतबा यांच्याकडे आपोआप सगळे अधिकार आलेले नाहीत. मोजतबा यांना सर्वोच्च पदावर पोहोचवण्यात रिव्होल्युशनरी गार्ड्सने मोठी भूमिका बजावली. या युद्धाच्या काळात धोरणात्मक निर्णयांमध्ये गार्ड्स सर्वात प्रभावशाली म्हणून उदयास आले आहेत. मोजतबा यांना एक सामर्थ्यशाली आवाज म्हणून स्वतःला पुढे आणण्यासाठी अनेक वर्षे लागू शकतात. सध्या ते केवळ एक नाममात्र प्रमुख म्हणून काम करत आहेत तर खरी सत्ता लष्करी नेतृत्वाच्या हातात आहे असं मिडल ईस्ट इन्स्टिट्यूटचे ॲलेक्स वटांका यांनी सांगितले.
कुठे आहेत मोजतबा खामेनेई?
इराणमध्ये खराब इंटरनेट कनेक्टिव्हिटी असतानाही मोजतबा यांच्या गैरहजेरीबाबत सोशल मीडियात अनेक तर्क वितर्क व्हायरल होत आहेत. एका मीममध्ये रिकाम्या खुर्चीवर स्पॉटलाइट टाकलेला असून त्यावर मोजतबा कुठे आहेत? असा मजकूर लिहिला आहे. त्यांचे समर्थक आणि बसिज मिलिशिया यांनी यावर खुलासा केला. अमेरिकन आणि इस्रायली हवाई हल्ल्यांचा धोका लक्षात घेता मोजतबा यांनी प्रसिद्धीपासून दूर राहणे हे देशाच्या हिताचे आहे असं त्यांनी म्हटलं. पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादमध्ये शनिवारी अमेरिका आणि इराण यांच्यात महत्त्वपूर्ण शांतता चर्चा सुरू होत असतानाच मोजतबा यांच्या प्रकृतीची बातमी समोर आली आहे. एक जखमी आणि पडद्यामागे लपलेला नेता ट्रम्प प्रशासनासोबत एका ऐतिहासिक करारावर स्वाक्षरी करण्याचे धाडस दाखवेल का? असा प्रश्न विचारला जात आहे.
Web Summary : Reportedly, Mojtaba Khamenei was severely injured in a 2026 attack, losing a leg and suffering facial wounds. Despite this, he remains involved in Iranian affairs, holding meetings and influencing decisions, while his public appearances remain absent.
Web Summary : रिपोर्ट के अनुसार, 2026 के हमले में मोजतबा खामेनेई गंभीर रूप से घायल हो गए, उनका एक पैर काटना पड़ा और चेहरे पर भी चोटें आईं। इसके बावजूद, वह ईरानी मामलों में शामिल हैं, बैठकें कर रहे हैं और निर्णय ले रहे हैं, जबकि उनकी सार्वजनिक उपस्थिति अनुपस्थित है।