वॉशिंग्टन : रशियाच्या हॅकरने अमेरिकेतील अध्यक्षपदाच्या निवडणुकीपूर्वी वोटिंग सॉफ्टवेअर कंपनीला हॅक केले होते, अशी माहिती समोर येत आहे. या प्रकरणात एफबीआयने लिह विनर (२५) या महिला कंत्राटदाराला अटक केली आहे. राष्ट्रीय सुरक्षा एजन्सीच्या गोपनीय अहवालात हॅकिंगच्या निवडणुकीवर झालेल्या परिणामाबाबत भाष्य करण्यात आले नाही; पण रशियामधून एक वोटिंग सॉफ्टरवेअर कंपनीवर हल्ला झाल्याचा उल्लेख आहे. आॅक्टोबरच्या अखेरीस आणि नोव्हेंबरच्या सुरुवातीस १०० पेक्षा अधिक स्थानिक अधिकाऱ्यांना ई-मेल पाठवून आपल्याकडे वळते करण्याचा प्रयत्न केला गेला होता, असे यात म्हटले आहे. या दस्तऐवजात कुणाच्याही नावाचा उल्लेख नाही. अमेरिकेच्या गुप्तचर विभागाने याबाबत बोलण्यास नकार दिला आहे.
अमेरिकेचे ‘वोटिंग सॉफ्टवेअर’ रशियन हॅकरने केले हॅक
By admin | Updated: June 7, 2017 00:13 IST