शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

20 वर्षांनंतर पुन्हा एकदा अमेरिकेत ट्रम्प प्रशासन देणार मृत्युदंड, 5 आरोपींची मृत्यूची तारीख ठरली

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2019 11:13 IST

अमेरिकेतल्या ट्रम्प प्रशासनानं मोठा निर्णय घेतला आहे.

वॉशिंग्टनः अमेरिकेतल्या ट्रम्प प्रशासनानं मोठा निर्णय घेतला आहे. जवळपास दोन दशकांनंतर पुन्हा एकदा अमेरिकेत मृत्युदंडाच्या शिक्षेच्या अंमलबजावणीची घोषणा करण्यात आली आहे. तसेच हत्या प्रकरणात दोषी आढळलेल्या पाच जणांच्या मृत्युदंडाची तारीखही निश्चित करण्यात आली आहे. अमेरिकेचे अॅटर्नी जनरल विल्यम बर्र म्हणाले, न्याय मंत्रालयानं या पाच हत्यारांसह सर्वात कुख्यात आरोपींना मृत्युदंड देण्याची मागणी केली आहे.प्रत्येक आरोपीच्या प्रकरणात निष्पक्ष सुनावणी झाल्यानंतर त्यांना दोषी ठरवण्यात आलं आहे. न्याय मंत्रालयानं आधीची दिलेली शिक्षा कायम ठेवण्याची मागणी केली आहे आणि आम्ही पीडित अन् त्यांच्या कुटुंबीयांना न्याय देण्यासाठी या दिलेल्या शिक्षेची अंमलबजावणी करतो आहे. बर्र यांनी न्याय मंत्रालयाला संघीय मृत्युदंड प्रोटोकॉलचा प्रस्तावातील तरतुदी वापरण्याचे निर्देश दिले आहेत. जे संघीय सरकारद्वारे जवळपास दोन दशकांपूर्वी बनवण्यात आले होते.या प्रस्तावातील तरतुदींमध्ये मृत्युदंडाच्या शिक्षेचाही उल्लेख होता. त्यामुळे आता अमेरिकेत यापुढे सर्वात खतरनाक आरोपींना मृत्युदंडाची शिक्षा दिली जाणार आहे. ज्या पाच आरोपींना मृत्युदंडाची शिक्षा दिली जाणार आहे, त्यामध्ये डेनियल लेविस ली, लेजमंड मिचेल, वेस्ली इरा पुर्के, अल्फ्रेड बुर्जुआ आणि डस्टिन ली हॉन्केन यांचा समावेश आहे. या आरोपींना क्रमशः नऊ डिसेंबर 2019, 11 डिसेंबर 2019, 13 डिसेंबर 2019, 13 जानेवारी 2020 आणि 15 जानेवारी 2020ला शिक्षा दिली जाणार आहे. 

टॅग्स :Donald Trumpडोनाल्ड ट्रम्प