शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

अमेरिकन दुतावास पुढील आठवड्यात जेरुसलेममध्ये, दिशादर्शक फलकही लागले

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2018 14:43 IST

इस्रायलची राजधानी म्हणून जेरुसलेमला मान्यता देण्याचा आणि तेलअविवमधील दुतावास तेथे हलविण्याचा निर्णय ट्रम्प प्रशासनाने घेतला.

जेरुसलेम- पुढील आठवड्यामध्ये इस्रायलची राजधानी जेरुसलेममध्ये अमेरिकेचा दुतावास स्थापन करण्यात येणार आहे. या दुतावासाचे दिशादर्शक फलक आज सोमवारी लावण्यात आले असून हा पुन्हा चर्चेचा मुद्दा होऊ शकतो. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनाने गेल्या डिसेंबरमध्ये जेरुसलेमला इस्रायलची राजधानी म्हणून दर्जा द्यावा असा प्रस्तान संयुक्त राष्ट्रामध्ये ठेवला होता.14 मे रोजी अमेरिकन दुतावास तेल अविवमधून जेरुसलेम येथे स्थलांतरित होणार असून त्यासाठीचे इंग्रजी, हिब्रू आणि अरबी भाषेतील फलक लावण्यात आले आहेत. डोनल्ड ट्रम्प यांनी जेरुसलेम येथे दुतावास आणून या शहराला इस्रायलची राजधानी म्हणून घोषित करण्याच्या निर्णयावर जगभरातून टीका झाली होती. पॅलेस्टाइनच्या समर्थकांनी त्याविरोधात निदर्शनेही केली होती. 2016 साली राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक लढवताना ट्रम्प यांनी प्रचाराच्या दरम्यान आपण जेरुसलेमला इस्रायलची राजधानी म्हणून मान्यता देऊ असे सांगितले होते. या कृत्यामुळे इस्रायल-पॅलेस्टाइन प्रश्नातील मध्यस्थाची भूमिका अमेरिकेने गमावली आहे अशी टीका पॅलेस्टाइनच्या राजकीय नेत्यांनी केली. या निर्णयानंतर सौदी अरेबियाचे राजे सलमान व मध्यपूर्वेत अमेरिकेच्या अतिशय जवळच्या मित्रांपैकी एक असलेल्या इजिप्तचे अध्यक्ष अब्देल फतेह अल-सिसी यांनी मात्र या मुद्दयावर अमेरिकेला धोक्याचा इशारा दिला होता. या निर्णयामुळे जगातील मुस्लिमांच्या भावना भडकतील, असं राजे सलमान यांनी म्हटलं होतं; तर यामुळे मध्यपूर्वेतील शांतता प्रक्रियेत अडथळा येईल असं अल-सिसी यांनी सांगितलं होतं.

टॅग्स :Israelइस्रायलUSअमेरिकाDonald Trumpडोनाल्ड ट्रम्प