शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

कर्माची फळे...! अमेरिकन दुतावासाला जनरेटरसाठी डिझेल आयात करायचे होते, क्यूबाने केला मज्जाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2026 11:55 IST

US Embassy Havana Diesel import Ban News: क्यूबा सरकारने हवाना येथील अमेरिकन दूतावासाला डिझेल आयात करण्याची परवानगी नाकारली आहे. क्यूबातील ऊर्जा संकट आणि अमेरिका-क्यूबा तणावाबाबत वाचा सविस्तर बातमी.

इराणनंतर आपले पुढील लक्ष्य क्युबा असल्याचे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आधीच जाहीर केलेले आहे. अशातच व्हेनेझुएलावरील अमेरिकेच्या कारवाईनंतर क्युबा इंधनासाठी झगडत असताना एक मोठी बातमी आली आहे. अमेरिकन दूतावासाला जनरेटर चालविण्यासाठी क्युबामध्ये इंधन टंचाईमुळे समस्या येत आहेत. अमेरिकेने आमचे पेट्रोल, डिझेल बंद केले आता तुम्ही देखील भोगा असे म्हणत क्युबाने अमेरिकन दुतावासाचा डिझेल आयात करण्याचा प्रस्ताव धुडकावून लावला आहे. 

क्युबा आणि अमेरिका यांच्यातील राजनैतिक तणाव आता एका नव्या वळणावर येऊन पोहोचला आहे. क्यूबा सरकारने आपल्या देशातील अमेरिकन दूतावासाला जनरेटर चालवण्यासाठी लागणारे डिझेल आयात करण्याची परवानगी नाकारली आहे. क्यूबा सध्या स्वतः भीषण ऊर्जा संकटाचा सामना करत असताना हा निर्णय घेतल्याने दोन्ही देशांमधील संबंध अधिक ताणले गेले आहेत.

नेमके प्रकरण काय?क्यूबातील वीज पुरवठा वारंवार खंडित होत असल्याने अमेरिकन दूतावासाला आपले कामकाज सुरू ठेवण्यासाठी मोठ्या जनरेटरवर अवलंबून राहावे लागते. हे जनरेटर चालवण्यासाठी अमेरिकेला बाहेरून डिझेल मागवायचे होते. मात्र, क्यूबाच्या परराष्ट्र मंत्रालयाने ही विनंती फेटाळून लावली आहे. क्यूबाचे म्हणणे आहे की, अमेरिकेने क्यूबावर लादलेल्या आर्थिक निर्बंधांमुळेच देशाला इंधन टंचाईचा सामना करावा लागत आहे.

अमेरिकेची प्रतिक्रियाअमेरिकन दूतावासाने क्यूबा सरकारच्या या भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. दूतावासाच्या मते, डिझेल आयात करू न दिल्याने त्यांच्या कामकाजात अडथळे येत आहेत आणि याचा परिणाम त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेवर आणि सेवांवर होऊ शकतो.

क्यूबातील ऊर्जा संकटगेल्या काही महिन्यांपासून क्यूबातील वीज ग्रीड वारंवार निकामी होत आहेत. जुने झालेले पॉवर प्लांट आणि इंधनाची कमतरता यामुळे देश अंधारात बुडण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत अमेरिकेच्या विनंतीकडे क्यूबाने 'बदल्याची कारवाई' म्हणून पाहिल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Cuba Rejects US Embassy's Diesel Request Amid Fuel Crisis: Tit-for-Tat?

Web Summary : Amidst a fuel crisis worsened by US sanctions, Cuba denied the US embassy's request to import diesel for generators. The move highlights strained relations as Cuba faces power outages and blames US policies for its energy woes, raising concerns about embassy operations.
टॅग्स :AmericaअमेरिकाDieselडिझेलFuel Crisisइंधन टंचाई