शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईन ठप्प; केवळ सीएसएमटी ते वाशीपर्यंतच लोकल सुरु, ट्रान्स हार्बरवही परिणाम
2
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
3
गाडी वापरणं आता महागणार! थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये मोठी वाढ करण्याची तयारी, किती वाढेल खर्च?
4
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
5
"माझ्या मृत्यूच्या गोष्टी करणाऱ्यांनो.."; अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला सुनावलं, नंतर ट्वीट केलं डिलीट
6
Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील भयंकर घटना! पत्नीवर चाकूनं सपासप वार करून पतीची आत्महत्या
7
पाव्हणं जेवला काय...! गौतमी पाटीलसोबत सरु आजींनीही धरला ठेका, पाहा भन्नाट डान्स स्टेप्स
8
लिव्हर कॅन्सरवरील सर्जरीनंतर दीपिका पहिल्यांदाच आली समोर, सांगितला वेदनादायी अनुभव
9
बहुतांश लोकांना माहीत नाही की या लोनमध्ये संपूर्ण रकमेवर नाही; खर्च केलेल्या रकमेवरच लागतं व्याज, प्रीपेमेंटवर पेनल्टीही नाही
10
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
11
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
12
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
13
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
14
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
15
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
16
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
17
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
18
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
19
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
20
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया

अमेरिका आज निवडणार नवा राष्ट्राध्यक्ष, ट्रम्प-हॅरिस यांच्यात हाेणार ऐतिहासिक लढत

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2024 07:27 IST

US Election 2024: अमेरिकेत राष्ट्राध्यक्षपदासाठी मंगळवारी मतदान हाेत असून, यावेळी रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार माजी राष्ट्राध्यक्ष डाेनाल्ड ट्रम्प आणि डेमाेक्रॅटिक पक्षाच्या उमेदवार व विद्यमान उपाध्यक्ष कमला हॅरिस यांच्यात अत्यंत चुरशीची लढत हाेत आहे.

वॉशिंग्टन - अमेरिकेत राष्ट्राध्यक्षपदासाठी मंगळवारी मतदान हाेत असून, यावेळी रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार माजी राष्ट्राध्यक्ष डाेनाल्ड ट्रम्प आणि डेमाेक्रॅटिक पक्षाच्या उमेदवार व विद्यमान उपाध्यक्ष कमला हॅरिस यांच्यात अत्यंत चुरशीची लढत हाेत आहे. ही चुरस आजवरच्या लढतीत ऐतिहासिक ठरेल, असे सर्वेक्षणाचे दावे आहेत. दरम्यान, ‘२०२० मध्ये मी व्हाइट हाउस सोडायलाच नको होते’, असे वक्तव्य ट्रम्प यांनी केले आहे. यामुळे यंदाच्या निवडणुकीत पराभव झाला तर तो ट्रम्प स्वीकारणार की नाही, अशी शंका निर्माण झाली आहे.

आयाेवात कमला हॅरिस आघाडीवररविवारी आयाेवातील सर्वेक्षणात डाेनाल्ड ट्रम्प (४४%) यांच्यापेक्षा कमला हॅरिस यांनी आघाडी (४७%) घेतली आहे. ट्रम्प यांनी मात्र हे सर्वेक्षण निराधार असल्याचे म्हटले. आयाेवात पिछाडीवर राहू शकत नाही, असे ते म्हणाले.

रविवारपर्यंत साडेसात कोटी मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. एनबीसीच्या सर्वेक्षणानुसार ही लढत अत्यंत चुरशीची होणार असून, ट्रम्प व हॅरिस या दोघांनाही ४९ टक्के मतदारांनी पाठिंबा दर्शवला.

ट्रम्प हाच उत्तम पर्याय : निक्की  संयुक्त राष्ट्रसंघातील अमेरिकेच्या माजी राजदूत निक्की हेली यांनी ट्रम्प यांना आपला पाठिंबा जाहीर केला असून, हॅरिस यांच्यापेक्षा ट्रम्प हे उत्तम पर्याय असल्याचे म्हटले आहे. 

मतदार ओळखपत्र बंधनकारक करा : ट्रम्पनिवडणूक प्रक्रियेबाबत नाराजी व्यक्त करीत ट्रम्प यांनी प्रत्येकास मतदार ओळखपत्र बंधनकारक करण्यात यावे, अशी मागणी केली आहे. डेमोक्रॅटिक पार्टीचा ओळखपत्र बंधनकारक करण्यास विरोध आहे. कारण, त्यांना या निवडणुकीत गोंधळ माजवून मतदानात घोळ घालावयाचा आहे, असा आरोप ट्रम्प यांनी केला. 

टॅग्स :US ElectionAmerica ElectionDonald Trumpडोनाल्ड ट्रम्पKamala Harrisकमला हॅरिसUnited Statesअमेरिका