शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटी नंतर MRP वर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; सामान्यांच्या थेट खिशावर परिणाम होणार...
2
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
3
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
4
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
5
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
6
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
7
"तरीही त्याला कुत्रा चावतो.."; पाकिस्तानी सलामीवीर सॅम अयुबबाबत नेमकं काय बोलला माजी खेळाडू?
8
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका
9
पितृपक्ष २०२५: चतुर्दशी श्राद्धाला असते विशेष महत्त्व, पण असे का? पाहा, काही मान्यता
10
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
11
'या अली' गाण्यामागचा आवाज हरपला, प्रसिद्ध गायक जुबीनचा स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू
12
Garud Puran: मृत्यूनंतर मोक्ष मिळेल का माहीत नाही, पण जिवंतपणी 'या' उपायांनी मिळू शकेल!
13
परप्रांतीयांना भाड्याने घरं देऊ नका, पंजाबमध्ये ठिकठिकाणी आवाहन; यूपी-बिहारींना हाकलण्याची मागणी
14
"काय अर्थ निघतील, याचाही विचार केला पाहिजे", CM फडणवीसांनी गोपीचंद पडळकरांचे टोचले कान
15
तीन सख्ख्या बहिणींवर नातेवाईकच २०२० पासून करत होता बलात्कार; अहिल्यानगरमधील संतापजनक घटना
16
विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीला 'खासदारकी'मुळे आव्हान, न्यायालयाने काय दिला निकाल?
17
स्कँडल, कर्ज आणि घसरते शेअर्स... जगातील सर्वात मोठ्या फूड कंपनीला वाचवू शकतील का नवे बॉस?
18
VIDEO: अरे देवा! 'मोटूलाल'ने प्यायली ७२ लाखांची दारू, जमीनही विकली; मुलाखत झाली व्हायरल
19
इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत संघात स्थान का मिळालं नाही? कुलदीपचं गंभीरबाबत मोठं विधान, म्हणाला...
20
'सकाळी उठतात, डोळे चोळत काहीही पोस्ट करतात...', कंगना राणौतचा राहुल गांधींवर पलटवार

US Election 2020:  महोदय, ही अमेरिका आहे, इथे अध्यक्षांची निवड जनता करते!, डाेनाल्ड ट्रम्प यांना काेर्टाने फटकारले

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2020 06:34 IST

US Election 2020: ट्रम्प यांच्या निवडणूक प्रचारयंत्रणेतर्फे अमेरिकेतील विविध राज्यांमध्ये मतमोजणीविरोधात याचिका दाखल केल्या आहेत. तसेच निवडणूक कर्मचारी आणि अधिकाऱ्यांविरोधातही न्यायालयात धाव घेतली आहे.

वॉशिंग्टन : अध्यक्षीय निवडणूक प्रक्रिया तसेच मतमोजणीबाबत सातत्याने शंका उपस्थित करणाऱ्या विद्यमान अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना न्यू यॉर्कच्या ॲटर्नी जनरल लतीशा जेम्स यांनी चांगलेच फैलावर घेतले.ट्रम्प यांच्या निवडणूक प्रचारयंत्रणेतर्फे अमेरिकेतील विविध राज्यांमध्ये मतमोजणीविरोधात याचिका दाखल केल्या आहेत. तसेच निवडणूक कर्मचारी आणि अधिकाऱ्यांविरोधातही न्यायालयात धाव घेतली आहे. या सर्वांची एकत्रित सुनावणी करताना जेम्स यांनी ट्रम्प यांना फटकारले.‘अध्यक्ष महोदय, ही अमेरिका आहे. इथे अध्यक्षांची निवड जनता करते. अध्यक्ष जनतेची निवड करत नाहीत. त्यामुळे लोकांची इच्छा काय आहे, हे जरूर ऐकले जाईल. तुम्ही त्यात ढवळाढवळ करण्याची गरज नाही’, इतक्या स्पष्ट शब्दांत न्यू यॉर्कच्या ॲटर्नी जनरलनी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना सुनावले आहे. अनेक राज्यांत जो बायडेन यांनी आघाडी घेत असल्याचे स्पष्ट होताच डोनाल्ड ट्रम्प यांनी रडीचा डाव सुरू केला आहे. या निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर घोटाळा झाला आहे, अनेक ठिकाणी मतमोजणीतच गैरप्रकार झाले आहेत वगैरे आरोप करत ट्रम्प यांनी संपूर्ण प्रक्रियाच थांबविण्याची मागणी केली होती. निवडणुकीत गैरप्रकार झाल्याचा बागुलबुवा उभा करत ट्रम्प बेकायदेशीरपणे सत्ता हस्तगत करू पाहत आहेत, परंतु त्यांचा प्रयत्न यशस्वी होऊ दिला जाणार नाही, असेही जेम्स यांनी फटकारले. 

आदळआपट केल्यामुळे वस्तुस्थिती बदलणार नाही

न्यू यॉर्कच्या ॲटर्नी जनरल लतीशा जेम्स यांनी ट्रम्प यांना कठोर शब्दांत सुनावले. त्या म्हणाल्या की, ‘ट्रम्प यांनी कितीही आदळआपट केली. कितीही बेछूट आणि दिशाभूल करणारे आरोप केले तरी त्यामुळे वस्तुस्थितीत बदल होणार नाही. निवडणूक प्रक्रियेत कोणताही गैरप्रकार झालेला नाही. प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने पार पडली आहे. प्रक्रिया शांततेत पार पडावी यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी, कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली. निवडणूक कर्मचारी निकाल लवकर लागावा यासाठी मतमोजणीची प्रक्रिया लवकर पूर्ण करण्याचे आटोकाट प्रयत्न करत आहेत. या सर्व प्रक्रियेत कुठेही कायद्याचे उल्लंघन झालेले नाही, हे मी नि:संदिग्धपणे सांगू शकते. अमेरिकेत जनता अध्यक्षांची निवड करते, अध्यक्ष जनतेची निवड करत नाही.’

टॅग्स :Donald Trumpडोनाल्ड ट्रम्पUS ElectionAmerica Election