शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
2
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
3
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
4
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
5
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
6
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
7
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
8
आयोग नव्हे, मतदारच राजा !
9
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
10
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
11
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
12
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
13
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
14
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
15
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
16
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
17
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज
18
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
19
Aamir Kaleem World Record: आमिर कलीमची कमाल! T 20I मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
20
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई

US Election 2020:  ज्याे बायडन फाॅर्मात, डाेनाल्ड ट्रम्प काेर्टात, अमेरिका निवडणूक मैदानात जाेरदार लढाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2020 06:44 IST

US Election 2020:  बायडन यांना मिशिगन, विस्कॉन्सिन, नेवाडा आणि अरिझोना  या राज्यांनी डेमॉक्रॅटिक पक्षाच्या पारड्यात मतांचा कौल दिल्याने बायडन यांचा अध्यक्षपदाचा मार्ग अधिक सुकर झाला आहे.

वॉशिंग्टन : डेमॉक्रॅटिक पक्षाचे उमेदवार ज्यो बायडन यांनी गुरुवारी विद्यमान अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर आघाडी घेत २७० हा बहुमताचा जादुई आकडा गाठण्याच्या दिशेने जोरदार वाटचाल सुरू केली. व्हाइट हाऊसपर्यंत पोहचण्यासाठी बायडन यांना आता अवघ्या सहा प्रातिनिधिक मतांची (इलेक्टोरल व्होट्स) आवश्यकता आहे. बायडन यांना मिशिगन, विस्कॉन्सिन, नेवाडा आणि अरिझोना  या राज्यांनी डेमॉक्रॅटिक पक्षाच्या पारड्यात मतांचा कौल दिल्याने बायडन यांचा अध्यक्षपदाचा मार्ग अधिक सुकर झाला आहे. गुरुवारी रात्री उशिरापर्यंत बायडन यांना २६४ तर ट्रम्प यांना २१४ इलेक्टोरल व्होट्स मिळाल्याचे स्पष्ट झाले. ३ नोव्हेंबरला अखेरचे मतदान झाल्यानंतर अमेरिकेत मतमोजणी सुरू आहे. बुधवारी बायडन आणि ट्रम्प यांना मिळालेल्या   प्रातिनिधिक मतांमध्ये अनुक्रमे २३८ आणि २१३ असा फरक होता. त्यामुळे सगळ्यांचे लक्ष मिशिगन, विस्कॉन्सिन, नेवाडा, अरिझोना, पेनसिल्व्हेनिया, जॉर्जिया आणि नॉर्थ कॅरोलायना या सात राज्यांमधून काय निकाल येतो, याकडे लागले होते. गुरुवारी यापैकी मिशिगन, विस्कॉन्सिन, नेवाडा आणि अरिझोना या राज्यांनी बायडन यांना पसंती दिल्याचे रात्री उशिरा स्पष्ट झाले. पेनसिल्व्हेनिया, जॉर्जिया आणि नॉर्थ कॅरोलायना या राज्यांमध्ये अपेक्षेप्रमाणे डोनाल्ड ट्रम्प यांनी आघाडी घेतली आहे. मात्र, या राज्यांपैकी जॉर्जिया आणि पेनसिल्व्हेनिया या राज्यांमध्येही बायडन पिछाडी भरून काढत असल्याचे चित्र आहे. 

निवडणुकीत घाेटाळे, फेरमतमाेजणी घ्या - ट्रम्पआपला पराभव हाेताे की काय या भीतीने ग्रासलेल्या विद्यमान अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी निवडणूक निकालांप्रकरणी न्यायालयात धाव घेतली आहे. विस्कॉन्सिन मतदारसंघात अनेक निवडणूक घोटाळे झाले असून तेथे फेरमतमोजणी व्हावी, अशा आशयाची विनंती सर्वोच्च न्यायालयात करणार असल्याचे ट्रम्प यांच्या कार्यालयातर्फे सांगण्यात आले. तसेच पेनसिल्व्हेनिया आणि मिशिगन येथील मतमोजणीसंदर्भातही संशय व्यक्त करत तेथील मतमोजणी थांबविण्याची मागणी ट्रम्प करणार आहेत.

श्रीनिवास ठाणेदार मिशिगनचे आमदार!बेळगाव ते अमेरिका... अमेरिकेत शिक्षण घेऊन व्यवसायात बसवलेला जम... असे असूनही आपल्या मातीशी घट्ट नाते राखून असलेल्या श्रीनिवास ठाणेदार यांना आता  डेमॉक्रॅटिक पक्षाचे ‘आमदार’ ही आणखी एक नवीन ओळख मिळाली आहे. मिशिगनच्या प्रतिनिधीगृहात त्यांना तब्बल ९३ टक्के मते मिळाली आहेत. त्यांच्या प्रतिस्पर्ध्याला अवघी सहा टक्केच मते मिळाली. 

टॅग्स :Donald Trumpडोनाल्ड ट्रम्पJoe Bidenज्यो बायडनAmericaअमेरिकाUS ElectionAmerica Election