शहरं
Join us  
Trending Stories
1
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
2
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
3
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
4
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
5
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
6
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
7
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
8
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
9
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
10
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
11
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन
12
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?
13
'तिचे ओठ असे हलतात जणू मशीनगनच'; डोनाल्ड ट्रम्प कॅरोलिन लेविट यांच्याबद्दल काय बोलून गेले?
14
प्रत्यक्षात घडली Jolly LLB 2 सारखी घटना, ३० वर्षे साधूच्या वेशात लपून होता बांगलादेशमधील गुन्हेगार, अखेर…
15
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
16
IND vs ENG: भारताच्या विजयानंतर आशा भोसलेंची नात जनाईची मोहम्मद सिराजसाठी खास पोस्ट, म्हणाली...
17
Container Fire In Thane: पातलीपाडा उड्डाणपुलावर कंटेनरला आग, थरारक घटनेचा व्हिडीओ समोर!
18
Video - बिल भरायला नको म्हणून व्हेज बिर्याणीत टाकलं हाड, घातला गोंधळ; CCTV मुळे पोलखोल
19
"केंद्रातील मोदी सरकार व्हेंटिलेटवर…’’, सबळ कारणं देत इंडिया आघाडीच्या नेत्याचा मोठा दावा
20
IND vs ENG : सिराज-प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! टीम इंडियानं रचला इतिहास; पहिल्यांदाच असं घडलं

US Election 2020: डोनाल्ड ट्रम्प यांचे उपद्रवमूल्य कायम राहणार, निवडणूक हरले तरी रिपब्लिकन पक्षातील सर्वशक्तिमान नेते ठरणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2020 06:41 IST

US Election 2020: रिपब्लिकन पक्षाच्या पारंपरिक मतदारांनी ट्रम्प यांची पाठराखण तर केलीच शिवाय गौरवर्णीय अमेरिकी तरुणांनाही ट्रम्प यांनी आकर्षित केल्याचे दिसून येते. कारण २०१६ मध्ये मिळालेल्या मतांपेक्षा ट्रम्प यांना यंदा ५० लाखांहून अधिक मते मिळाली आहेत.

वॉशिंग्टन : अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प विद्यमान अध्यक्षीय निवडणूक हरण्याच्या बेतात असले तरी त्यांचे उपद्रवमूल्य कायम राहणार आहे. ते सहजासहजी व्हाइट हाऊसचा त्याग करतील, असे वाटत नाही. अध्यक्षपद सोडायची वेळ आली तरी त्यात ते अनेक ठिकाणी पाचर मारतील, असे बोलले जात आहे.जो बायडेन यांना ट्रम्प यांच्यापेक्षा सर्वाधिक प्रातिनिधिक मते (इलेक्टोरल व्होट्स) मिळाली असली तरी पसंतीच्या मतांमध्ये उभय नेत्यांत फारसे अंतर नाही. कोरोनासंकट हाताळण्यात आलेले अपयश, आक्रसलेली अर्थव्यवस्था, वाढती बेरोजगारी या सर्व नकारात्मक बाजू असतानाही सहा कोटी ८० लाख मतदारांनी ट्रम्प यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवला आहे, हे विशेष. रिपब्लिकन पक्षाच्या पारंपरिक मतदारांनी ट्रम्प यांची पाठराखण तर केलीच शिवाय गौरवर्णीय अमेरिकी तरुणांनाही ट्रम्प यांनी आकर्षित केल्याचे दिसून येते. कारण २०१६ मध्ये मिळालेल्या मतांपेक्षा ट्रम्प यांना यंदा ५० लाखांहून अधिक मते मिळाली आहेत.

२०२४ला उमेदवारी?यंदाच्या निवडणुकीत २३ कोटी नोंदणीकृत मतदारांपैकी १६ कोटी मतदारांनी मतदान केले. त्यापैकी जवळपास सात कोटी मतदारांचा ट्रम्प यांना पाठिंबा असल्याने रिपब्लिकन पक्षातील सर्वशक्तिमान नेते म्हणून ट्रम्प यांच्याकडे पाहिले जाईल. त्यामुळे आता जरी या निवडणुकीत हरले तरी २०२४ मध्ये पुन्हा ते अध्यक्षीय निवडणुकीच्या रिंगणात उतरलेेले पाहायला मिळाल्यास आश्चर्य वाटायला नको. अर्थात तोपर्यंत ट्रम्प यांचे वय ७८ असेल. परंतु त्यांचा सध्याचा फिटनेस पाहता रिपब्लिकन पक्षाकडून त्यांना पुढील निवडणुकीवेळी पुन्हा उमेदवारी मिळू शकते.

व्हाइट हाऊस सोडण्यापूर्वी...अध्यक्षीय निवडणुकीत हरण्याच्या बेतात असले तरी व्हाइट हाऊस रिकामे करण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडे अद्याप ७६ दिवसांचा कालावधी आहे. व्हाइट हाऊस सोडण्यापूर्वी ट्रम्प आपल्या हितशत्रूंचा पुरता बंदोबस्त करतील, अशी चिन्हे आहेत. त्यात फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हिस्टिगेशनचे (एफबीआय) विद्यमान संचालक ख्रिस्तोफर रे आणि ट्रम्प यांच्या कोरोना हाताळणीवर सतत टीका करणारे डॉ. अँथनी फौची या दोघांचा प्रामुख्याने समावेश असेल. 

टॅग्स :Donald Trumpडोनाल्ड ट्रम्पJoe Bidenज्यो बायडनUS ElectionAmerica ElectionAmericaअमेरिका