शहरं
Join us  
Trending Stories
1
जनसुरक्षा विधेयक नेमके आहे तरी काय? महाराष्ट्रात गरज काय? CM फडणवीसांनी विधानसभेत केले सादर
2
“कुठूनही पैसे आणा, पण शेतकरी कर्जमुक्ती करा, सातबारा कोरा करा”; मनसेचा बच्चू कडूंना पाठिंबा
3
"तुम्ही मला कुठेही संधी देऊ नका पण मी तुम्हाला संधी देतोय"; मुनगंटीवारांचा CM फडणवीसांना टोला
4
Kapil Sharma Cafe: प्रसिद्ध कॉमेडियन कपिल शर्माच्या कॅनडामधील कॅफेवर गोळीबार, गेल्या आठवड्यात झालेलं उद्घाटन
5
“ठाकरे बाहेरचे आहेत, महाराष्ट्राने स्वीकारले अन् आता ते...”: शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद
6
Video: 'महाराष्ट्रातून कोण आलंय? इकडे ये...', नाशिकच्या तरुणासोबत हरयाणात काय घडले? पाहा...
7
Video - हृदयद्रावक! लेक्चरमध्ये विपरित घडलं, शिक्षकाला मृत्यूने गाठलं अन्...; 'मृत्यू' कॅमेऱ्यात कैद
8
रुग्णालयात सुरू होती शस्त्रक्रिया तेवढ्यात फॉल्स सिलिंग तुटून ऑपरेशन थिएटरमध्ये पडला कुत्रा, त्यानंतर...  
9
नीलम गोऱ्हेंच्या सुरक्षा रक्षकांकडून वरुण सरदेसाईंना धक्का; उपसभापती म्हणाल्या,'माझ्यावर का खेकसताय?'
10
TCS ची दिवाळी! अपेक्षांना मागे टाकत कमावला १२,७६० कोटींचा नफा, शेअरधारकांना किती लाभांश मिळणार?
11
महाकाय किंग कोब्रा सापाची महिला वन अधिकाऱ्याने केली सुटका, सचिन तेंडुलकरने केलं कौतुक
12
98%ने घसरून थेट 96 पैशांवर आला होता हा ज्वेलरी शेअर, आता 1800% ने वधारला; करतोय मालामाल!
13
"नितीश कुमार नाम सुनके फ्लावर समझे क्या; फ्लावर नहीं फायर है..." दोन्ही सलामीवीरांना धाडलं तंबूत
14
‘दिवसातून ३ तासच वीज येते, काही तरी करा’, उत्तरदाखल ऊर्जामंत्री जय श्रीराम म्हणाले आणि निघून गेले   
15
सावधान! स्क्रीन टाईम नाही तर पालकांकडून नकळत होणाऱ्या 'या' चुकांचा मुलांवर वाईट परिणाम
16
खळबळजनक! लेकीने आई आणि बॉयफ्रेंडच्या मदतीने केली वडिलांची हत्या, नंतर पाहिला चित्रपट
17
"बाहेर ये तुला दाखवतो, तू तर बूट..." अनिल परबांनी 'गद्दार' म्हणताच शंभूराज देसाई भडकले, विधान परिषदेतच जुंपली
18
भाजपा खासदार निशिकांत दुबे यांचं पुन्हा 'ठाकरे सैनिकां'ना आव्हान, म्हणाले, "हिंमत असेल तर…’’
19
LIC, टीसीएसला धक्का, पण इंडसइंड बँक तेजीत! निफ्टी-सेन्सेक्सची घसरण सुरुच, तुमचा पोर्टफोलिओ वाचला का?
20
मराठी-हिंदी वादात शिल्पा शेट्टीची उडी, म्हणाली- "मी महाराष्ट्राची मुलगी, पण..."

CoronaVirus: अमेरिकेत तब्बल १ लाख जणांचा जाणार बळी? 'त्या' एका ऑर्डरनं चिंता वाढली

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2020 15:59 IST

Coronavirus अमेरिकेतील मृतांचा आकडा वाढण्याची भीती; प्रशासनाकडून तयारी सुरू

वॉशिंग्टन: कोरोनाचा सर्वाधिक मोठा फटका अमेरिकेला बसण्याची शक्यता आहे. अमेरिकन प्रशासनानंदेखील याची तयारी सुरू केल्याचं दिसत आहे. अमेरिकेच्या आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेनं संरक्षण विभागाकडे १ लाख बॉडी बॅग्स मागितल्या आहेत. त्यामुळे कोरोनाच्या रुग्णांचा आकडा झपाट्यानं वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. आतापर्यंत अमेरिकेत कोरोनामुळे ६ हजारहून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेनं १ लाख बॉडी बॅग्स मागितल्याची माहिती पेंटॉगॉननं गुरुवारी दिली. अमेरिकन प्रशासनानं कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी, रुग्णांवरील उपचारांसाठी संपूर्ण यंत्रणा कामाला लावली असली तरीही मृतांचा आकडा १ लाख ते २ लाख ४० हजारांपर्यंत जाऊ शकतो, अशी शक्यता व्हाईट हाऊसमधील तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. याच पार्श्वभूमीवर आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेनं तयार सुरू केली आहे. फेडरल इमर्जन्सी मॅनेजमेंट एजन्सीनं (फेमा) केलेल्या विनंतीनंतर पेंटागॉनच्या डिफेन्स लॉजिस्टिक एजन्सीनं हालचाली सुरू केल्या आहेत. 'संघराज्यांमधील आरोग्य विभागांच्या वतीनं आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेनं १ लाख बॉडी बॅग्सची मागणी केली आहे. त्यानुसार आम्ही प्रक्रिया सुरू केली आहे,' अशी माहिती पेंटागॉनचे प्रवक्ते लेफ्टनंट माईक अँड्रूज यांनी दिली.अमेरिकेत, विशेषत: न्यूयॉर्कमध्ये कोरोनाचा अतिशय वेगानं फैलाव झाला आहे. त्यामुळे पुढील दोन आठवडे अतिशय वाईट असू शकतात, असं अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मंगळवारीच म्हटलं होतं. पुढील काही दिवस अतिशय अवघड असणार आहेत. प्रत्येक अमेरिकन नागरिकानं त्यासाठी तयार राहावं, असं आवाहन त्यांनी केलं होतं. सध्या जगातील कोरोनाबाधितांची संख्या १० लाख ३० हजार १८१ इतकी आहेत. यातील जवळपास २५ टक्के रुग्ण रुग्ण अमेरिकेत आहेत. अमेरिकेतल्या कोरोनाबाधितांची संख्या २ लाख ४५ हजार ३८० इतकी असून मृतांचा आकडा ६ हजार ९५ वर पोहोचला आहे. काल एकाच दिवसात अमेरिकेत ९०० हून अधिक जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAmericaअमेरिकाDonald Trumpडोनाल्ड ट्रम्प