शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
3
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
4
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
5
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
6
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
7
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
8
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
9
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
10
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
11
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
12
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
13
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
14
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
15
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
16
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
17
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
18
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
19
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
20
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
Daily Top 2Weekly Top 5

हाफिज सईदच्या राजकीय स्वप्नांना सुरूंग; अमेरिकेकडून MML चा दहशतवादी संघटनांच्या यादीत समावेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2018 08:42 IST

देशात २०१८ मध्ये होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुका माझी संघटना जमात-ऊद-दावा एमएमएलच्या झेंड्याखाली लढविणार असल्याचे हाफिज सईदने सांगितले होते.

नवी दिल्ली: पाकिस्तानमधील राजकीय अवकाशात हातपाय पसरू पाहणारा जमात-ऊद-दवा या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या हाफिज सईद याच्या राजकीय स्वप्नांना अमेरिकेने सुरूंग लावला आहे. अमेरिकेने मंगळवारी हाफिज सईदच्या मिल्ली मुस्लिम लीग (एमएमएल) हा पक्ष दहशतवादी संघटना असल्याचे घोषित केले. परिणामी पक्षाच्या सुकाणू समितीच्या सात सदस्यांनाही दहशतवादी ठरवण्यात आले आहे.पाकिस्तानमधील सार्वत्रिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने एमएमएल पक्षाला आंतरदेशीय व्यवहार खात्याचे ना हरकत प्रमाणपत्र सादर करण्यास सांगितले होते. जेणेकरून MML ला राजकीय पक्ष म्हणून मान्यता देता येईल. यापूर्वी आंतरदेशीय व्यवहार खात्याच्या आक्षेपामुळेच निवडणूक आयोगाने MML ला राजकीय पक्षाचा दर्जा देण्यास नकार दिला होता. त्यानंतर आता पुन्हा एकदा अमेरिकेच्या पवित्र्यामुळे MML चा अर्ज फेटाळला जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. याशिवाय, अमेरिकेने तेहरिक-ए-आझादी-ए-काश्मीर (टीएजीके) या संघटनेचाही दहशतवादी संघटनांच्या यादीत समावेश केला आहे. MML आणि टीएजीके या दोन्ही संघटना लष्कर-ए-तोयबाचा भाग आहेत. लष्कर-ए-तोयबाविरुद्धच्या कारवाईत अडथळा उत्त्पन्न करण्यासाठी या संघटनांची निर्मिती करण्यात आली आहे. त्यामुळे आजच्या कारवाईने या सगळ्याला चाप बसेल. तसेच लोकांसमोर संघटनेचा खरा चेहरा उघड होईल, असे अमेरिकेच्या दहशतवादविरोधी मोहीमेचे समन्वयक नॅथन सेल्स यांनी सांगितले.  

टॅग्स :hafiz saedहाफीज सईदPakistanपाकिस्तानAmericaअमेरिका