शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

सीरियन तळावर अमेरिकेने क्रूझ मिसाइलने केला मोठा हल्ला

By admin | Updated: April 7, 2017 09:00 IST

सीरियात रासायनिक शस्त्रांचा वापर झाल्यानंतर खवळलेल्या अमेरिकेने गुरुवारी रात्री सीरियाच्या हवाई तळाला लक्ष्य केले.

 ऑनलाइन लोकमत 

फ्लोरिडा, दि. 7 - सीरियन नागरीकांवर रासायनिक हल्ला करण्यासाठी ज्या शायरत हवाई तळाचा वापर झाला त्याच तळाला गुरुवारी रात्री अमेरिकेने लक्ष्य केले. शायरत तळावर अमेरिकेने क्रूझ मिसाइलने मोठा हल्ला चढवला. अमेरिकेने 50 पेक्षा जास्त क्रूझ मिसाइल डागली. सीरियात रासायनिक शस्त्रांचा वापर झाल्याने आपण या कारवाईचे आदेश दिले. 
 
अमेरिकेचे राष्ट्रीय हित नजरेसमोर ठेवूनच ही कारवाई करण्यात आली असे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे. ट्रम्प अध्यक्ष झाल्यानंतर अमेरिकेने केलेली ही पहिलीच मोठी कारवाई आहे. भविष्यात निष्पाप नागरीकांवर पुन्हा विषारी गॅसने हल्ला होऊ नये यासाठी हे पाऊल उचलण्यात आले असे ट्रम्प यांनी सांगितले. सीरियातील रक्तपात, कत्तल थांबवण्यासाठी त्यांनी अन्य देशांनाही सहभागी होण्याचे आवाहन केले. 
 
हा हल्ला करुन अमेरिकेने पहिल्यांदाच थेट सीरियन सरकार विरोधात कारवाई केली आहे. सीरियाचे राष्ट्रध्यक्ष बाशर असाद या हल्ल्याला जबाबदार असल्याचे ट्रम्प यांनी सांगितले. मध्य सीरियातील बाशर सरकारच्या नियंत्रणाखाली असलेल्या शायरत तळावर अमेरिकेने हल्ला केला. रासायनिक हल्ला करण्यासाठी सीरियन हवाई दलाच्या विमानांनी याच तळावरुन उड्डाण केले होते असे अमेरिकन अधिका-यांनी सांगितले.
 
पूर्व भूमध्यसागरात तैनात असलेल्या अमेरिकन नौदलाच्या जहाजांवरुन शायरत तळावर 60 टॉमाहॉक क्षेपणास्त्रे डागण्यात आली. शुक्रवारी पहाटेच्या 3.45 च्या सुमारास शायरत तळावर स्फोटाचे मोठे आवाज सुरु झाले. या हल्ल्यात धावपट्टी, कंट्रोल टॉवर आणि दारुगोळायाचे भांडार उद्धवस्त झाले. सीरियाने आपल्याच नागरीकांवर लढाऊ विमानांव्दारे केलेल्या रासायनिक हल्ल्यात 100 जणांचा मृत्यू झाला होता. यात बहुतांश बालके होती.