शहरं
Join us  
Trending Stories
1
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
2
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
3
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
4
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
5
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
6
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल
7
आई-वडिलांस पोटगी देण्यास नकार; मुलाची तुरुंगात रवानगी!
8
Big Breaking : ट्रम्प यांनी रशियाचा राग भारतावर काढला! २५% कर लादला; दंडही जाहीर केला
9
IND vs ENG : "त्यांनी जे केलं ते समजण्यापलिकडचं" पिच क्युरेटरसोबतच्या वादावर काय म्हणाला गिल?
10
कुत्रा चावल्याने बकरीचा मृत्यू झाला, पण नंतर एक आख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल झालं
11
शिक्षिकेचे सैतानी कृत्य! खराब हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्याला दिले मेणबत्तीचे चटके, मालाड येथील घटना
12
सर्वसामान्यांच्या 'लालपरी'ला येणार अच्छे दिन, एसटी महामंडळाचे वर्षाला १२ कोटी रुपये वाचणार!
13
ठाणे: १८ वर्षाच्या तरुणाने खड्ड्यामुळे गमावला जीव; जीमला निघाला पण रस्त्यातच झाला अपघात
14
बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ४४ अतिरिक्त विशेष ट्रेन्सची घोषणा, पाहा वेळापत्रक
15
"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र
16
IND vs PAK, WCL 2025 Semi Final : भारतीय खेळाडूंनी पाक विरुद्ध सेमी फायनल खेळण्यासही दिला नकार
17
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
18
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
19
भिवंडी वाडा रस्त्यावर खड्ड्याने घेतला युवकाचा बळी; संतप्त ग्रामस्थांचा रुग्णवाहिका रस्त्यावर ठेवत रास्तारोको
20
Maharashtra Politics : सांगलीत जयंत पाटलांना धक्का! अण्णासाहेब डांगे यांनी सोडली साथ; भाजपामध्ये केला प्रवेश

युद्धाची भाषा नको! चर्चेने प्रश्न सोडवा, अमेरिकेचा भारत-चीनला संदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2017 13:43 IST

भारत आणि चीनमध्ये जे वादग्रस्त विषय आहेत, त्या सर्व मुद्यांवर दोन्ही देशांनी चर्चेतून तोडगा काढावा असे अमेरिकेने म्हटले आहे.

ठळक मुद्दे लडाखमधील प्रसिद्ध पँगाँग तलावाच्या काठावरुन भारतीय हद्दीत घुसखोरीचा प्रयत्न उधळून लावला.सिक्कीम सेक्टरमधील डोकलाममध्ये भारत आणि चिनी सैन्य मागच्या अनेक दिवसांपासून परस्परांसमोर उभे ठाकले आहे.

वॉशिंग्टन, दि. 16 - भारत आणि चीनमध्ये जे वादग्रस्त विषय आहेत, त्या सर्व मुद्यांवर दोन्ही देशांनी चर्चेतून तोडगा काढावा असे अमेरिकेने म्हटले आहे.  मंगळवारी भारतीय जवानांनी चिनी सैनिकांचा लडाखमधील प्रसिद्ध पँगाँग तलावाच्या काठावरुन भारतीय हद्दीत घुसखोरीचा प्रयत्न उधळून लावला. त्यानंतर अमेरिकेने ही प्रतिक्रिया दिली आहे. 

सिक्कीम सेक्टरमधील डोकलाममध्ये भारत आणि चिनी सैन्य मागच्या अनेक दिवसांपासून परस्परांसमोर उभे ठाकले आहे. त्यानंतर आता लडाखमध्ये संघर्षाची ठिणगी उडाली आहे. भारत आणि चीनने चर्चेतून सामंजस्याने तोडगा काढावा त्यासाठी आम्ही दोन्ही देशांना प्रोत्साहन देत आहोत असे स्टेट डिपार्टमेंटच्या प्रवक्त्या हीथर नॉरेट यांनी सांगितले. 

आणखी वाचा लडाखमध्ये चिनी सैनिकांची रोखली घुसखोरी 

चीनचा आर्थिकदृष्ट्या पराभव करा, उत्पादनांवर बहिष्कार टाका; रामदेव बाबांचं आवाहन 

डोकलाम प्रश्नावरुन चीनकडून सातत्याने भारताला युद्धाची धमकी दिली जात आहे. भारताने आपले सैन्य माघारी बोलवावे अन्यथा युद्ध अटळ आहे अशी भाषा केली जात आहे. दरम्यान डोकलाम आमचाच भूभाग असून, डोकलामवरुन आम्ही दावा सोडलेला नाही असे भूतान सरकारने स्पष्ट केले. चीनकडून देण्यात येणारी माहिती पूर्णपणे चुकीची असून, दिशाभूल करणारी असल्याचे भूतानने सांगितले. 

डोकलामप्रश्नी आमची भूमिका एकदम स्पष्ट आहे. 29 जून 2017 रोजी भूतानच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या वेबसाईटवर जी माहिती प्रसिद्ध केलीय ती आमची अधिकृत भूमिका आहे. डोकलाममध्ये थेट रस्ता बांधायला सुरुवात करणे हे कराराचे उल्लंघन आहे. दोन देशांमधील सीमांकन करण्याची प्रक्रिया यामुळे बाधित होईल असे भूतानने म्हटले आहे.  

डोकलाममध्ये भारत आणि चीनमध्ये रस्तेबांधणीवरुन निर्माण झालेला संघर्ष चिघळत चालला असून, चीनने डोकलाममध्ये सैनिकांची संख्या वाढवली आहे. डोकलामधील वादग्रस्त जागेपासून एक किलोमीटरच्या अंतरावर चीनने 800 सैनिकांची तैनाती केल्याचे वृत्त इंडियन एक्सप्रेसने दिले आहे. चीनने या भागात 80 तंबू टाकले आहेत. चीनने अजून इथे आपली पूर्ण बटालियन तैनात केलेली नाही. संघर्ष सुरु आहे तिथे आधीपासूनच चीनने 300 सैनिक तैनात केले आहेत. 

सिक्कीम सेक्टरमध्ये डोकलाम जवळ भारताचे 350 जवान तैनात आहेत. भारतीय चीनच्या बाजूला कोणतीही हालचाल होत नसल्याचे लष्कराने म्हटले आहे. भारतीय लष्कराने आपल्या तुकडयांसाठी दोन आठडयांचा ऑपरेशन अलर्ट कार्यक्रम घेण्याचा निर्णय घेतला आहे. सप्टेंबर-ऑक्टोंबरऐवजी ऑगस्टमध्ये हा प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात येईल. डोकलाममध्ये दोन्ही देशांचे सैन्य समोरा-समोर उभे ठाकल्याच्या घटनेला आता 50 पेक्षा जास्त दिवस झाले आहेत.