शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

अमेरिकेने चिनी नागरिकांबरोबर रोमान्स करण्यावर घातली बंदी, लैंगिक संबंध ठेवणेही गुन्हा ठरणार, कारण काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2025 10:17 IST

United State News: अमेरिकन सरकारने चीनमधील अमेरिकन सरकारी कर्मचाऱ्यांना, तसेच कुटुंबातील सदस्यांना आणि सुरक्षा पुरवण्यात आलेल्या कंत्राटदारांना चिनी नागरिकांबरोबर कोणत्याही प्रकारचे प्रेमसंबंध किंवा लैंगिक संबंध ठेवण्यास बंदी घातली आहे.

वॉशिंग्टन  - अमेरिकन सरकारने चीनमधील अमेरिकन सरकारी कर्मचाऱ्यांना, तसेच कुटुंबातील सदस्यांना आणि सुरक्षा पुरवण्यात आलेल्या कंत्राटदारांना चिनी नागरिकांबरोबर कोणत्याही प्रकारचे प्रेमसंबंध किंवा लैंगिक संबंध ठेवण्यास बंदी घातली आहे. ‘असोसिएटेड प्रेस’ (एपी)ला याबद्दल माहिती मिळाली आहे.

या प्रकरणाची माहिती असलेल्या चार जणांनी नाव न सांगण्याच्या अटीवर एपीला या धोरणाबद्दल सांगितले. हे धोरण जानेवारीमध्ये अमेरिकेचे राजदूत निकोलस बर्न्स यांनी चीन सोडण्यापूर्वी लागू करण्यात आले होते.

एजन्सींचे नियम कडककाही अमेरिकन एजन्सींनी अशा संबंधांबाबत आधीच कडक नियम लागू केले आहेत. तथापि, इतर देशांमधील अमेरिकन राजदूतांसाठी स्थानिक लोकांशी डेट करणे आणि लग्न करणे असामान्य नाही.

चीनबाहेरील अमेरिकन कर्मचाऱ्यांसाठी नियम नाहीनवीन धोरणात मुख्य भूमी चीनमधील अमेरिकन मिशन्सचा समावेश आहे, ज्यामध्ये बीजिंगमधील दूतावास आणि ग्वांगझू, शांघाय, शेनयांग आणि वुहानमधील वाणिज्य दूतावास, तसेच हाँगकाँगच्या अर्ध-स्वायत्त प्रदेशातील अमेरिकन वाणिज्य दूतावासांचा समावेश आहे. हे नियम चीनबाहेर तैनात असलेल्या अमेरिकन कर्मचाऱ्यांना लागू होत नाहीत, असेही सूत्रांनी सांगितले. 

नवीन धोरणावर गेल्या उन्हाळ्यात प्रथम चर्चा  गेल्या उन्हाळ्यात मर्यादित स्वरूपात हे धोरण लागू करण्यात आले होते.  या धोरणानुसार, अमेरिकन कर्मचाऱ्यांना चीनमधील अमेरिकन दूतावास आणि पाच वाणिज्य दूतावासांमध्ये रक्षक आणि इतर सहायक कर्मचारी म्हणून काम करणाऱ्या चिनी नागरिकांशी ‘रोमँटिक आणि लैंगिक संबंध’ ठेवण्यास मनाई होती, असेही सांगण्यात आले. 

टॅग्स :relationshipरिलेशनशिपUnited Statesअमेरिकाchinaचीन