शहरं
Join us  
Trending Stories
1
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
2
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
3
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
4
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा
5
जगातील अवघ्या ३ लोकांकडे आहे 'ही' कार! डिझाईन पाहून प्रेमात पडाल अन् किंमत ऐकून हैराण व्हाल!
6
१७ वर्षे एकाच कंपनीत काम केले, अचानक काढून टाकले, कर्मचाऱ्याने लाखमोलाचा दिला सल्ला, पोस्ट व्हायरल
7
मोदी सरकारचा मोठा निर्णय; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिल्यांदाच पाकिस्तानात गेले 2100 भारतीय, कारण काय?
8
भाजी विक्रेत्याने जिंकली तब्बल ११ कोटींची लॉटरी; टॅक्स भरून हातात किती पैसे येणार?
9
चेज मास्टर विराट कोहलीचे व्यवसायिक साम्राज्य माहितीये का? क्रिकेटपेक्षा इथून करतो सर्वाधिक कमाई
10
Student Death: स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या सागरने आईच्या साडीनेच संपवले आयुष्य; एका तरुणीमुळे...
11
गुगल क्रोम वापरणाऱ्यांना मोठा धोका; हॅकर्सचं लक्ष तुमच्यावरच! सुरक्षित राहण्यासाठी 'ही' गोष्ट आताच करा
12
Shocking: गंमत म्हणून विवाहित महिलेनं डीएनए चाचणी केली, सासराच निघाला बाप!
13
देव तारी त्याला कोण मारी! भीषण रेल्वे अपघातात ढिगाऱ्याजवळ जिवंत सापडला चिमुकला, पण...
14
भाजपाची महिला पदाधिकारी, नेत्यांना पुरवायची मुली; बिहार निवडणुकीत वरिष्ठांनी दिली जबाबदारी
15
श्रीदेवीचा सुपरहिट सिनेमा 'मॉम'च्या सीक्वेलमध्ये दिसणार 'ही' अभिनेत्री, सेटवरील फोटो लीक
16
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
17
तो, ती आणि प्रेमाची बहार! पांड्यानं शेअर केला गर्लफ्रेंडसोबतचा खास व्हिडिओ
18
क्या बात! रितेश देशमुखच्या आईसाहेबांनी बल्बच्या प्रकाशात घेतलं ड्रॅगन फ्रूटचं पीक; सूनबाईंना कौतुक, शेअर केला व्हिडीओ
19
सोनाराच्या दुकानात ४ वर्ष काम केलं, रोज थोडं थोडं करून २.५ कोटींचं सोनं गायब केलं! कशी पकडली गेली चोरी?
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

चीनला उघड ठसन! अमेरिका तैवानला तब्बल १ अब्ज डॉलरची शस्त्रास्त्र देणार, संरक्षण विभागाची मंजुरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2022 12:51 IST

चीन आणि तैवानमधील वाढत्या तणावात आता आणखी भर पडली आहे. अमेरिका तैवानला तब्बल १.१ बिलियल डॉलर किमतीची शस्त्रास्त्र विकणार आहे.

नवी दिल्ली-

चीन आणि तैवानमधील वाढत्या तणावात आता आणखी भर पडली आहे. अमेरिका तैवानला तब्बल १.१ बिलियल डॉलर किमतीची शस्त्रास्त्र विकणार आहे. यासाठीची मंजुरी अमेरिकेच्या संरक्षण विभागानं दिली आहे. अमेरिकन संरक्षण विभागनं दिलेल्या माहितीनुसार शस्त्रांमध्ये ६० अँटी-शिप मिसाइल आणि १०० एअर-टू-एअर मिसाइलचा समावेश असणार आहे. अमेरिकेनं या पॅकेजची घोषणा गेल्या महिन्यात अमेरिकेच्या प्रतिनिधी सभेच्या अध्यक्षा नॅन्सी यांच्या तैवान दोऱ्यानंतर चीनच्या आक्रमक पावित्र्याच्या पार्श्वभूमीवर केली होती. 

पेंटागॉनच्या सुरक्षा सल्लागार एजन्सीनं दिलेल्या माहितीनुसार अमेरिकेकडून तैवानला देण्यात येणाऱ्या शस्त्रांमध्ये साइडविंडर मिसाइल्सचा देखील समावेश आहे. याचा वापर हवेतून जमिनीवर केल्या जाणाऱ्या माऱ्यासाठी होतो. अमेरिकन सीनेटच्या स्पीकर नॅन्सी पेलोसी यांनी तैवान दौऱ्यामुळे चीनचा तीळपापड झाला आहे. चीननं तैवानच्या आजूबाजूला थेट युद्धअभ्यास सुरू केला होता. तैवाननं याचा मोठ्या प्रमाणात विरोध केला. तैवानच्या राष्ट्रपती साई इंग वेन यांनीही चीनचा स्पष्ट शब्दांत निषेध व्यक्त केला होता. यातच आता अमेरिकेकडून तैवानला मोठी मदत मिळत आहे. 

चीनच्या सैन्य अभ्यासाला प्रत्युत्तर देत तैवाननंही आमच्या हद्दीत आगळीक करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना जशास तसं उत्तर दिलं जाईल असं रोखठोक सांगण्यात आलं आहे. अमेरिकन स्पीकरच्या तैवान दौर्यामुळे चीन आणि तैवानमधील वाद विकोपाला पोहोचल्याचं म्हटलं जात आहे. 

तैवान आणि चीनबाबत अमेरिकेची रणनिती काय?तैवान हा आपलाच प्रांत असल्याची चीनची भूमिका आहे. तर तैवान स्वत:ला स्वतंत्र देश मानतो. दुसरीकडे अमेरिकेचे तैवानसोबत अधिकृतरित्या कोणतेही राजनैतिक संबंध नाहीत. चीनच्या वन पॉलिसीचं समर्थन तैवान करत आला आहे. पण अमेरिका-तैवान रिलेशन अॅक्ट अंतर्गत तैवानला शस्त्रास्त्र विक्री अमेरिका करत आला आहे. या कायद्यात अमेरिका तैवानला आत्मरक्षणासाठी मदत करेल असं नमूद आहे. यातच नॅन्सी पेलोसी यांचा तैवान दौरा चीनच्या पॉलिसीचं उल्लंघन असल्याची भूमिका चीननं घेतली होती. तरीही नॅन्सी यांनी तैवानचा दौरा केला. त्यावर संतप्त झालेल्या चीननं हा दौरा आम्हाला शस्त्र हाती घेण्यास भाग पाडणारा आहे अशी उघड धमकीच दिली होती. 

चीननं थेट अमेरिकेलाही दिली धमकीचीनच्या परराष्ट्र मंत्रालयानं नॅन्सी पेलोसी यांच्या तैवान दौऱ्यावरुन अमेरिकेला धमकी देताना अमेरिकेचं हे पाऊल म्हणजे आगीशी खेळण्याचा प्रकार आहे, असं म्हटलं होतं. याचे परिणाम खूप वाईट होतील. जे आगीशी खेळतील ते स्वत:च आपले हात आगीत पोळून घेतील, असा कडक इशारा चीननं अमेरिकेला दिला होता. इतकंच नव्हे, तर पेलोसी यांचा दौरा पाहून चीननं तैवान भोवती थेट युद्धाभ्यास सुरू केला होता. दुसरीकडे तैवाननंही युद्धजन्य परिस्थितीला तोंड देण्यासाठीची तात्काळ तयारी सुरू केली होती. आता तैवानला उघडपणे अमेरिकेकडून मदत केली जात आहे. त्यामुळे तैवान देखील चीनला आता उघडपणे कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यासाठी देश सज्ज असल्याचं म्हटलं आहे. इतकंच नव्हे, तर गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडन यांनी चीननं जर तैवानवर हल्ला केला तर अमेरिका तैवानचं रक्षण करेल असं विधान केलं होतं. 

टॅग्स :chinaचीनUSअमेरिका